Animal Husbandry

कुठल्याही व्यवसायाचा किंवा उद्योगाचा विचार केला तर तो व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी व्यवसायातील संधी कोणत्या आहेत, विक्रीचे व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल सखोल आणि तंतोतंत माहिती असेल तर विक्रीचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते.

Updated on 15 December, 2021 1:22 PM IST

कुठल्याही व्यवसायाचा किंवा उद्योगाचा विचार केला तर तो व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी व्यवसायातील संधी कोणत्या आहेत, विक्रीचे व्यवस्थापन आणि व्यवसायाच्या उपयुक्ततेबद्दल सखोल आणि तंतोतंत माहिती असेल तर विक्रीचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते.

हेच तत्व शेळीपालन व्यवसायाला देखील  लागू पडते. शेळीपालन व्यवसायामध्ये जर आपण योग्य आणि अचूक विक्री व्यवस्थापन केले तर आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. या लेखात आपण शेळीपालनाच्या विक्री व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊ.

 शेळीपालनातील विक्री व्यवस्थापनातील विविध संधी

  • मांसाची निर्यात
  • बकरी ईद साठी बोकड तयार करणे
  • फक्त मांसासाठी शेळीपालन
  • दूध व दुधाच्या वेगवेगळे पदार्थासाठी शेळी पालन करणे.
  • शेळीच्या पैदाशीसाठी अथवा प्रदर्शनासाठी
  • धुलीवंदन, गटारी अमावस्या, 31डिसेंबर सारख्या दिवसांमध्ये मटणाला चांगली मागणी असते, पर्यायाने शेळ्यांना  देखील मागणी वाढते.
  • तसेच लेंडी खतासाठी देखील  शेळीपालन फायदेशीर ठरते.

शेळी पालन व्यवसाय मध्ये आपल्याला दिसून येते की ईद साठी बोकड विक्रेते शेळीपालन करताना दिसून येतात.परंतु बऱ्याचदाईदच्या वेळेस बोकड यांची आवक वाढल्याने अपेक्षित भाव मिळत नाही व दुर्दैवाने बऱ्याचदातोट्यात व्यवसाय येतो. जर आपण शेळी पालन करत असताना बाजारपेठेचा व्यवस्थित अभ्यास केला तरआपल्या लक्षात येते की,स्थानिक बाजारात एक वर्षाच्या आतले व 20 ते 25 किलोग्रॅम वजनाच्या बोकडाच्या मांसा साठी  मागणी आहे. याच्या उलट पाहिले तर ईदसाठी एक वर्षाच्या पुढच्या व जास्तीत जास्त वजन असणारे बोकडांची खरेदी केली जाते. याचा अर्थ ईद साठी तयार केलेला बोकड ईदच्या बाजारात विकला गेला नाही तर पुढच्या इदपर्यंत सांभाळण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागते आणि याच ठिकाणी शेळी पालकांचा निर्णय चुकतो.

जन्माला येणार्‍या करडा पैकी विक्री करण्यासाठी खालील प्रकारे नियोजन करावे.

  • दहाते 15 टक्के बोकड पैदाशीसाठी विकावे.
  • दहा ते 15 टक्के बोकड ईद साठी तयार करावेत.
  • 40 ते 50 टक्के बोकड स्थानिक बाजारात विक्रीसाठी तयार करावे.
  • बोकडांची विक्री करताना शक्यतो वजनानुसार करावी त्याकरता बोकडाचे वजन × प्रचलित मटणाचा दर/2 या सूत्राचा अवलंब करावा.

फायदेशीर शेळीपालनाचा मूलमंत्र

  • शेळीपालन व्यवसाय सुरुवात करतांना सुरुवातीस जास्तीत जास्त 20 शेळ्या एक बोकड अशी करावी.
  • दोन करडे देणारी गाबन स्थानिक शेळी निवडावी.
  • चारा हा घरचा असावा व त्यासाठी योग्य नियोजन करावे.
  • बकरी ईद व पैदास बोकड उत्पादन विक्री नियोजन
  • बोकडाचे वजन वाढीवर विशेष लक्ष द्यावे.
  • नियमित लसीकरण व जंतांची निर्मूलन करावे.
  • स्वच्छ मटन निर्मिती व निर्यातीवर भर द्यावा.
  • शेळ्यांचा विमा काढणे उपयुक्त असते.
  • उपयोगी नसलेल्या शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या गोट फार्म फार्मर व्यक्तिगतरीत्या व्यवस्थित लक्ष ठेवावे.
English Summary: well selling management is most important in goat rearing
Published on: 15 December 2021, 01:22 IST