Animal Husbandry

पशुपालन हा शेती व्यवसायाला पूरक असा जोडधंदा आहे. पशुपालन यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होतो. पशुपालन धंदा हा दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे वाढवून दूध उत्पादनासाठी काय करता येईल, याची माहिती असणे फार आवश्यक असते.

Updated on 28 September, 2020 5:17 PM IST


पशुपालन हा शेती व्यवसायाला पूरक असा जोडधंदा आहे. पशुपालन यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा होतो. पशुपालन धंदा हा दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे वाढवून दूध उत्पादनासाठी काय करता येईल, याची माहिती असणे फार आवश्यक असते. दूध व्यवसायातील पंचसूत्री विषयी माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत.

गाई-म्हशींच्या कासेचे आरोग्य राखण्यासाठी दूध काढणारी व्यक्ती ही निरोगी असणे आवश्यक असते. दूध काढताना हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. हाताची नखे जास्त वाढू देता कामा नये. नखे वेळेवर काढून घ्यावी. एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्यांनी दूध काढू नये. साधारण आपण दूध काढताना अंगठा वाकवून दूध काढतो पण तसे दुध काढू नये. कारण त्यामुळे सडास अंतर्गत भागात जखमा होऊन जंतूसंसर्ग होण्याची शक्यता जास्त बळावते. म्हणून मूठ बंद करून दूध काढावे. दूध काढताना ते पूर्णपणे काढावे. जर कासेत दूध शिल्लक राहिले तर काससुजी होऊ शकते. तसेच दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ पाण्याने धुवावी. काल धुण्यासाठी स्वच्छ पाण्यात एक टक्का पोटॅशिअम परमॅग्नेट मिसळावे.

पहिल्या काही धारांमध्ये जीवाणूंचे प्रमाण जास्त असते.  त्यामुळे असे दूध कासेला किंवा हाताला लावू नये. काससुजी झालेली गाय सर्वात शेवटी पिळावी. धार काढल्यानंतर सडांची क्षिद्रे  अर्धा तास उघडी राहतात, त्यामुळे जनावराला अर्धा तास खाली बसू देऊ नये.  दूध काढल्यानंतर जनावराला वैरण टाकल्यास जनावर खाली बसत नाही आणि गोठ्यातील शेण मातीतील जंतू कासेत प्रवेश करण्यास प्रतिबंध होतो.  गाभण गाय आटवत असताना प्रत्येक सडात पुरेशा प्रमाणात प्रतिजैविक सोडावे. वासरांचे संगोपन वेगळे करावे. लांब सडक ऑल वतिका असलेल्या गाई किंवा म्हशी  घेऊ नयेत.

- निरोगी प्रजनन संस्था

 जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपात याची चाचणी करून घ्यावी. नोंदणीकृत व जबाबदार पशु वैद्यकाकडून कृत्रिम रेतन करावे. वार अडकल्यास स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये.  तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयाची जाण्याची शक्यता बळावते. जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याची प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेची आरोग्य टिकून राहते. गर्भाशयाचे गंभीर आजार झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे करावे.  गर्भपात झालेले गर्भ आणि वार गोठ्या पासून लांब करून टाकावे. आजारी जनावरांना योग्य उपचार करावेत.

  निरोगी पचनसंस्था

 वैरण जमिनीवर न टाकता गव्हाणीत टाकावे. वैरणीची कुट्टी करून टाकले कधीही फायद्याचे असते. कुट्टी करत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. फार बारीक तुकडे करू नयेत. जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळका चारा देऊ नये. एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. जनावरांना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे वैरण द्यावी. जनावरांना उकीरड्यावर चालू देऊ नये तसेच जनावराला स्वच्छ व ताजे पाणी प्यायला द्यावे. गोठ्यातील सर्व जनावरांचे नियमितपणे जंतूनाशक करावे. समतोल आहार देण्याचा प्रयत्न करावा. पचनसंस्थेच्या सांसर्गिक रोगात पासून ग्रस्त जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. पचनसंस्थेच्या कुठल्याही विकारावर तात्काळ उपाययोजना करावी.

  गोठा स्वच्छ ठेवणे

 गोठा स्वच्छ, कोरडा, हवेशीर व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा असल्यास जंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा. शेण  मूत्र साठू देऊ नये. आजारी जनावरांची विष्ठा, मूत्र, उरलेल्या चार जाळून टाकावा. आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्य झाल्यास जनावरांना रोज धुवून  स्वच्छ करणे चांगले असते, त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव सहसा होत नाही. रक्ताभिसरणाला चालना मिळून ताजेपणा वाटतो.

 


स्वच्छ दूधनिर्मिती

 रोगी व अ स्वच्छ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही. दूध स्वच्छ नसल्यास टिकवण क्षमता कमी होऊन दूध नासते.  म्हणून जनावरे निरोगी व सशक्त असावे.  दूध काढताना प्रत्येक सडातील  ४ ते ५ धारा वेगळ्या भांड्यात काढाव्यात.  हे दूध इतर दुधात मिसळून नये. दूध काढताना जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धुळ मुक्त असावे.  दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेले असावेत.  दुधाचे भांडे धुण्याच्या  सोड्याने गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत दूध काढून झाल्यानंतर ते गोठ्यातून त्वरित हलवावे. वरीलप्रमाणे जर आपण गोठ्याची आणि पशूंची काळजी घेतली तर दूध उत्पादने चांगल्या प्रकारे वाढू शकते.

English Summary: Want to succeed in dairy business? Then implement these five formulas
Published on: 28 September 2020, 05:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)