शेतीस जोडव्यवसाय म्हणून शेतकरी वर्ग शेळीपालन करत असतो. जे की शेळीपालन करण्यास खर्च ही कमी येतो तसेच जागा ही कमी लागते. गाई तसेच म्हैस याना जसे जास्त प्रमाणत खाद्य चारा लागतो मात्र शेळी ला जास्त प्रमाणत चारा लागत नाही. शेळी ला पुरेसे तसेच कमी खाद्य दिल्याने त्यांचे आरोग्य ही चांगले राहते तसेच त्या चांगल्या प्रकारे जगतात. जरी आपण एखाद्या गाईला जेवढ्या प्रमाणत खाद्य देतो तेवढ्याच खाद्याच्या प्रमाणात जवळपास दहा शेळ्या जगून निघणार आहेत. शेळीपालन म्हणले की अनेक प्रकारच्या शेळ्या येतात जशा की बिटल शेळी, शिरोही, उस्मानाबादी, तोतापुरी, देशी शेळी असे अनेक प्रकार आहेत. पण तुम्ही कधी काठेवाडी शेळीबद्धल ऐकले आहे का? आज आम्ही काठेवाडी शेळी शेळीपालनासाठी किती फायदेशीर ठरणार आहे याबद्धल सांगणार आहोत.
काठेवाडी शेळी ची खास वैशिष्ट्य :-
आपणास काठेवाडी शेळी जर पाळायची असेल तर ती तुम्ही आठ ते दहा वर्षाची घेऊन फायदा नाही कारण या जातीचे निम्मे आयुष्य बंदिस्त गोठ्यामध्ये च गेले जाते जे की तिथून पुढे जर तुम्ही ती शेळी बंदिस्त गोठ्यात ठेवली तर त्याचे आरोग्य बिघडते. कारण काठेवाडी शेळी ही दिवसाला दोन ते अडीच लिटर दुध जे की त्यापेक्षा जास्तच देते. जर तुम्हाला शेळीपासून जास्त उत्पन्न पाहिजे असेल तर काठेवाडी शेळी ची जात एक नंबर आहे. कारण दिवसाला काठेवाडी जातीची शेळी दोन ते अडीच लिटर पेक्षा जास्त दूध देते त्यामुळे त्या दुधातून सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. तसेच शेळीपालन लोकांना वाटते की लवकर करडे मोठी व्हावीत तसेच जास्त किमतीला विकली जावीत तर यासाठी तुम्ही काठेवाडी शेळी ची जात अवश्य निवडा.
काठेवाडी शेळीपासून लोकांना वाटतेय अडचण :-
दुसऱ्या जातीच्या ज्या शेळ्या आहेत जसे की बिटल जास्त, उस्मानाबादी जातीची शेळी, शिरोही जातीची शेळी, तोतापुरी जातीची शेळी आणि देशी शेळी अशा अनेक जातींच्या शेळीच्या अंगावर कमी प्रमाणत केस असतात मात्र काठेवाडी जातीच्या शेळीच्या अंगावर खूप केस असतात थोडक्यात पाहायला गेले तर केसाळू शेळी असते त्यामुळे लोकांना या केसांचे काय करायचे ही अडचण वाटते. पण या केसांमुळे आपणास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. जसे जसे केस वाढतील तसे तसे तुम्ही ट्रीमर च्या मदतीने ते केस काढू शकता. आपण जो केस कापायला ट्रीमर वापरतो तो नाही तर शेळ्यांसाठी वेगळा ट्रीमर असतो तो वापरावा.
काठेवाडी शेळीची विक्री या ठिकाणी चालते :-
तुम्हाला जर काठेवाडी जातीची शेळी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला चाळीसगावात जावे लागेल जे की ज्या दिवशी तेथील बाजार असेल त्यावेळी तुम्हाला शेळी भेटेल. याव्यतिरिक्त भुसावळ तसेच गुजरात मधील भावनगर येथे सुद्धा मोठ्या।प्रमाणात काठेवाडी शेळी पाहायला भेटतात. या गावामधून तुम्ही काठेवाडी शेळी खरेदी करू शकता.
Published on: 24 February 2022, 05:39 IST