Animal Husbandry

राज्यात लम्पी त्वचारोग हा केवळ गायी, म्हैसवर्गातील जनावरांमध्ये होत आहे.

Updated on 16 September, 2022 3:34 PM IST

राज्यात लम्पी त्वचारोग हा केवळ गायी, म्हैसवर्गातील जनावरांमध्ये होत आहे. हा आजार जनावरांपासून माणसात संक्रमित होत नाही. त्यामुळे मानवी आरोग्यास कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिला आहे. लम्पी रोगावरील जनावरांचे लसीकरण राज्य सरकारकडून मोफत करण्यात येत असून,

शेतकर्‍यांनी घाबरून न जाता वेळीच लसीकरण व औषधोपचार करून जनावरांची काळजी घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो.

हे ही वाचा - शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतमजुरांना दरमहा ४ हजार मानधन लागु करा! राजु शेट्टी

लम्पीबाबत राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने सुरुवातीपासूनच आवश्यक ती खबरदारी घेतल्यामुळे राज्यात जनावरांच्या मृत्यू दराचे प्रमाण कमी राखण्यात आतापर्यंत यश आल्याचेही ते म्हणाले.

पशुसंवर्धन आयुक्तालयात मंगळवारी (दि. 13) आयोजित पत्रकार परिषदेत सिंह म्हणाले, सद्यस्थितीत लम्पीचा 21 जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला असून, 2 हजार 664 पशुधन बाधित झाले आहे. त्यापैकी औषधोपचाराने 1 हजार 520 पशुधन बरे झाले असून, 43 जनावरे मृत झाली आहेत. उर्वरित

जनावरांवर उपचार सुरू आहेत.राज्यात मंगळवारी आणखी पाच लाख लसी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाकडून 50 लाख लसींच्या उपलब्धतेसाठी निविदा प्रसिद्ध होत आहेत. पुढील आठवड्यात ती लसही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लसीचा

राज्यात कोठेही तुटवडा नसल्याचेही त्यांनी सांगितले.अडचण आल्यास संपर्क साधा : लम्पी रोगाबाबत शेतकर्‍यांना क्षेत्रियस्तरावर अडचण आल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-2330-418 किंवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेचा टोल क्रमांक 1962 वर संपर्क साधावा.

English Summary: Vaccination against lumpy vitiligo is free
Published on: 16 September 2022, 12:36 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)