जनावरांना सकस चारा आहारात उपलब्ध करून देणे म्हणजे जनावरांची एकंदरीत आरोग्य आणि त्यांच्यापासून मिळणारे दुधाचे उत्पादन यामध्ये नक्कीच वाढ होते हे एक सूत्र आहे. बरेच शेतकरी जनावरांना कडवळ, ज्वारी, बाजरी किंवा मक्याचा सुका चारा, मोठ्या प्रमाणात बांधावर चे गवत याचा वापर करतात. दुभत्या जनावरांना बाजारातून मिळणाऱ्या पशुखाद्याचा सर्वात जास्त वापर केला जातो.परंतु या सगळ्या गोष्टी मधून जनावरांना पौष्टिक घटक किती प्रमाणात मिळतात हे देखील पाहणे महत्त्वाचे असते.
तसेच चारा आणि पशुखाद्य यासाठी होणारा खर्च देखील अफाट असतो. शेतामध्ये लागवड करून पिकवणाऱ्या चाऱ्याला खर्च आणि वेळ दोन्ही जास्त लागतात. या समस्येवर उपाय म्हणून चारा निर्मिती साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर या समस्येवर तोडगा निघणे शक्य आहे.
आपल्याला सगळ्यांना हायड्रोपोनिक तंत्रज्ञान माहिती आहे किंवा अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसेलही. परंतु या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी वेळेत सकस चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकतो. या लेखात आपण हायड्रोपोनिक चारा निर्मिती तंत्र म्हणजे काय ते समजून घेऊ.
नक्की वाचा:Cattel Fodder: अशा पद्धतीने घ्या 'या' पूरक पशुखाद्याचे उत्पादन,वाढेल दुध उत्पादन आणि नफा
सगळ्यात आधी समजू हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स चारा उत्पादन म्हणजे कुठल्याही प्रकारचा मातीचा वापर न करता मका, बाजरी, ज्वारी किंवा इतर चारा वर्गीय पिकांच्या माध्यमातून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी जागेत कमी पाण्याचा वापर करून हिरवा चारा निर्माण करणे होय.
हायड्रोपोनिक चारा निर्मिती साठी लागणारी साधने आणि प्रक्रिया
या तंत्रज्ञानाने चारा निर्मिती करण्यासाठी हरितगृह यालाच आपण हायड्रोपोनिक यंत्र असे म्हणू शकतो. त्यानंतर चारा पिके ( गहू, बाजरी आणि मका इत्यादी),
प्लास्टिक ट्रे ( साधारणपणे तीन बाय दोन फूट आकाराचे ), तसेच पाणी देण्याची यंत्रणा यामध्ये मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांचा समावेश होईल.
या पद्धतीमध्ये फक्त सात ते आठ दिवसांमध्ये कमीत कमी 20 ते 25 सेंटीमीटर उंचीचा चारा तयार होता. एकंदरीत एका वर्षाचा विचार केला तर पन्नास चौरस फूट जागेमध्ये एका वर्षात 36 हजार पाचशे किलो चारा निर्मिती आपण करू शकतो.
यासाठी वर्षाला 36 हजार 500 लिटर पाणी लागेल. यामध्ये चारा निर्मिती करत असताना मजूर फार कमी लागतात तसेच मशागत करावी लागत नसल्यामुळे लागवडीवर जो काही खर्च होतो तो फार कमी प्रमाणात होतो.
प्लास्टिक ट्रे मध्ये पाण्याचा कौशल्यपूर्ण वापर करून चारा पीक उत्पादित करणे शक्य असल्यामुळे या तंत्रज्ञानात चारा निर्मिती करणे शक्य होते.
नक्की वाचा:काय सांगता! आता मोबाईल अॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
कमीत कमी पंधरा हजार रुपये खर्चून तयार होऊ शकतो हायड्रोपोनिक चारा निर्मिती यंत्र सांगाडा
हायड्रोपोनिक चारा यंत्र हे विदेशी बनावटीचे व महाग असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणात परवडण्याजोगे नाही.
यावर पर्याय म्हणून भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन सामग्रीचा म्हणजेच बांबू, तट्या, प्लास्टिक ट्रे, 50 टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून बाहत्तर चौरस फूट जागेत बसतील असे पंचवीस बाय दहा बाय दहा फूट आकाराचे सांगाडा यंत्र 15 हजार रुपये खर्चात तयार करता येते. या माध्यमातून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवी चारा निर्मिती करता येते.
हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती प्रक्रिया
1- या तंत्राने चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, ज्वारी इत्यादींचा वापर करण्यात येतो. या धान्याच्या बियाण्याला सोडियम हायपोक्लोराईट (0.1 मिली प्रति लिटर )या द्रावणांमध्ये सूक्ष्म जिवाणू पासून संरक्षण होण्याकरता बीजप्रक्रिया करून घ्यावी.नंतर हे धान्य बारा तास भिजत ठेवावे व नंतर 24 तास तरट्याच्या पोत्यात मोड येण्यासाठी ठेवावे.
2- त्यानंतर प्लास्टिक ट्रे मध्ये मोड आलेले धान्य( तीन बाय दोन फूट बाय तीन इंच उंची ) पसरून ठेवावे व प्रती दुभत्या जनावरांसाठी10 ट्रे याप्रमाणे जनावरांच्या संख्येवर ट्रे ची संख्या ठरवावी.
3- हे प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील सात ते आठ दिवस ठेवणे गरजेचे असते. यामध्ये एक इंची विद्युत मोटारीला लॅटरल चे कनेक्शन देऊन फॉगर सिस्टिम वापरून प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सहा ते सात वेळा पाणीपुरवावे. दोनशे लिटर पाणी दिवसासाठी पुरेशी असते.
4- यंत्रणा सगळे स्वयंचलित असून पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येऊ शकते. फक्त पाण्याचा वापर करून या चाऱ्याची सात ते आठ दिवसात 20 ते 25 सेंटी मीटर पर्यंत वाढ होते.
नक्की वाचा:Animal Care: करा 'या' उपायोजना आणि टाळा जनावरांमध्ये होणारी जंतबाधा, वाचा माहिती
Published on: 22 July 2022, 01:33 IST