Animal Husbandry

शेवगा हे उपयुक्त झाड म्हणून ओळखले जाते. अगोदर पासून शेवग्याच्या मानवाच्या आहारात समावेश आहे. शेवग्याची लागवड ही बहुदा शेताच्या बांधांवर किंवा परसात केली जाते. शेवग्याच्या औषधी उपयोगामुळे शेवग्याला जादूचे झाड म्हणूनसुद्धा ओळखतात. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिजे यांचे प्रमाण उपयुक्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शेवगा लागवड ही शेंगाच्या उत्पादनासाठी केली जाते आणि जनावरांच्या आहारातील उपयुक्तता अजूनही अप्रचलित आहे.

Updated on 27 August, 2021 1:58 PM IST

शेवगा हे उपयुक्त झाड म्हणून ओळखले जाते. अगोदर पासून शेवग्याच्या मानवाच्या आहारात समावेश आहे.  शेवग्याची लागवड ही बहुदा शेताच्या बांधांवर किंवा परसात केली जाते. शेवग्याच्या औषधी उपयोगामुळे शेवग्याला जादूचे झाड म्हणूनसुद्धा ओळखतात. शेवग्याच्या पानात प्रथिने आणि खनिजे यांचे प्रमाण उपयुक्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांच्या वाढीसाठी हे उपयुक्त ठरते.महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी शेवगा लागवड ही शेंगाच्या उत्पादनासाठी केली जाते आणि जनावरांच्या आहारातील उपयुक्तता अजूनही अप्रचलित आहे.

 शेवग्याच्या पानातील पोषणतत्त्वे

 क्रूड प्रथिने – ते वीस ते पंचवीस टक्के

 पोटॅशियम- 0.24 टक्के

 कॅल्शियम-0.8 टक्के

 फास्फोरस -0.30 टक्के

 मॅग्नेशियम-0.5 टक्के

 सोडियम -0.20 टक्के

 तांबे-8.78पीपीएम

जिंक - 18 पीपीएम

 लोह- 470 पीपीएम एवढे प्रमाण आढळते.

 लागवड

1-शेवग्याची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करावे. साधारणतः लोम किंवा चिकन माती आणि 6.8तेसात च्या आसपास सामू असलेल्या पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनी मध्ये ही झाडे चांगल्या प्रमाणात वाढतात.

2-लागवड ही वाक्यांवर अथवा सऱ्यावर असावी. जेणेकरून पाणी जास्त वेळ वाचणार नाही आणि झाडांची मुळे सडणार नाहीत.

3- शेवगा चाऱ्यासाठी अनेक वर्षे चालतो त्यामुळे जमिनीला मुबलक पोषकद्रव्ये अगोदरच पुरवली जावी. जमिनीला चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी खोल नांगरणी करून घ्यावी.

4- लागवडीच्या पंधरा दिवस आगोदर पाच टन प्रती एकरीशेणखताची मात्रा द्यावी आणि जमीन व्यवस्थित करून घ्यावी. तसेच लागवडीच्या अगोदर सुपरफॉस्फेट एकरी 55 किलो टाकावे.

 चांगल्या उगवणीसाठी बियाणे रात्रभर कवकनाशक मिसळलेल्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी.

6- बियाणे उगवल्यानंतर काही रोगांची लक्षणे दिसली तर कृषी तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन आवश्यक ती  फवारणी करावी.

  कापणी

 साऱ्या साठी पहिली कापणी 80 ते 90 दिवसांनी करावी.त्यानंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसांनी घेता येतात. वर्षाला साधारणतः आठ ते नऊ कापण्या घेता येतात आणि हिरव्या चाऱ्याचे वार्षिक उत्पन्न हेक्‍टरी नव्वद ते शंभर टनांच्या आसपास मिळते.

 जनावरांना खाऊ घालण्याची पद्धत

 ज्यावेळी चाऱ्याची उपलब्धता कमी असेल अशावेळी कडब्याच्या कुट्टी सोबत देता येतो. प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेवग्याची वाळवलेली पाने  जनावरांच्या खुराकात मिसळून देता येतात. त्यामुळे खुराकावर असलेला खर्च कमी होण्यास मदत होते.शेळी आणि मेंढी यांच्याकडून शेवग्याचा हिरवा चारा कमी प्रमाणात खाल्ला जातो.त्यामुळे कुट्टी करून चारा उन्हात वाळवून घ्यावा. वाळलेल्या शेवगा,  मक्याची भरडा आणि मीठ हे घटक 80:19:1 या प्रमाणात मिसळावे व्यवस्थित मिसळण्यासाठी चार ते पाच किलो मळी प्रति 100 किलो मिश्रण वापरले जाऊ शकते.मळीमुळे आहाराचा गोडवा वाढतो आणि शेळ्या-मेंढ्या कडून चारा  जास्त प्रमाणात खाल्ला जातो.

 

शेवग्याची चारा म्हणून फायदे

  • कमीपाणीअसलेल्याठिकाणी सुद्धा वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता
  • शेवग्याचे झाड चिवट असल्यामुळे मरीचे प्रमाण कमी
  • मुबलक प्रमाणात चारा उत्पादन
  • जनावरांची प्रतिकारक शक्ती वाढते.
  • शेळ्या-मेंढ्यात वजन वाढीसाठी उपयुक्त.
  • लसूण घास पेक्षा एकरी जास्त उत्पादन.
  • चाऱ्यासाठी शेवग्याच्या पिकेएम वन आणि पीकेएम 2 या जाती उपयुक्त आहेत.

 

English Summary: use of drumstick tree for animal grass
Published on: 27 August 2021, 01:58 IST