Animal Husbandry

जर आपण गेल्या तीन दशकांचा विचार केला तर मत्स्य व्यवसायातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ताई आणि तलावांमधील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे सहाशे किलोग्रॅम हेक्टर हुन 2 हजार किलोग्रॅम हेक्टरपेक्षा अधिक पोचली आहे.

Updated on 20 March, 2022 1:59 PM IST

जर आपण गेल्या तीन दशकांचा विचार केला तर मत्स्य व्यवसायातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ताई आणि तलावांमधील सरासरी राष्ट्रीय उत्पादनाची पातळी सुमारे सहाशे किलोग्रॅम हेक्टर हुन 2 हजार किलोग्रॅम हेक्टरपेक्षा अधिक पोचली आहे.

जर मत्स्य उत्पादनाचा विचार केला तर पंजाब आणि हरियाणा तसेच पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांनी आणि उद्योजकांनी सहा ते आठ टन प्रति वर्ष इतकी उत्पादन पातळी गाठली आहे. जर आपण मत्स्यशेतीचा विचार केला तर शेतीशी निगडित इतर पद्धतीशी खूपच सुसंगत अशी ही पद्धत आहे. मत्स्य शेतीत विकास करायचा असेल तर माशांच्या जातींची योग्य निवड फारच महत्त्वपूर्ण ठरते. किंबहुना मत्स्यशेतीच्या यशासाठी ते महत्त्वाचे आहे. या लेखामध्ये आपण  मत्स्य शेती उपयुक्त अशा माशांच्या काही जाती अभ्यासणार आहोत.

नक्की वाचा:तरुण शेतकरी मित्रांनो शेती करायचे ठरवले आहे आणि द्राक्ष बाग लावायची आहे का? तर या गोष्टींची नक्की घ्या काळजी

 मत्स्यशेतीत उपयुक्त माशांच्या जाती

      इंडियन मेजर कार्प

 या प्रकारांमध्ये भारतीय माशांच्या जातींचा समावेश होतो.

1- कटला- ही माशाचे जात पृष्ठभागाकडील अन्न खाते. जर या माशाचा वाढीचा विचार केला तर पहिल्या वर्षीदीड किलोपर्यंत वाढतो व त्याची लांबी 38 ते 45 सेंटिमीटर पर्यंत असते.

2- रोहू- या जातीचा मासा मत्स्य तलावातील मध्यभागातील अन्न खातो. या जातीच्या माशा चे प्रमुख अन्न आहे वनस्पती प्लवंग, चिखल मध्ये असलेले सेंद्रिय पदार्थांच्या अन्नकण आणि पाणवनस्पती हे आहे. हा मासा सातशे ते आठशे ग्रॅम पर्यंत वाढतो तसेच त्याची लांबी 35 ते 40 सेंटिमीटर असते.

3- मृगळ- हा मासा शेततळ्यातील सेंद्रिय अन्न पदार्थ खातो. त्यासोबतच पाणवनस्पतींचे बारीक तुकडे,  शेवाळे व प्राणी प्लवंग खातो.

नक्की वाचा:हम भी किसीसे कम नही! शेतकऱ्याची लेक झाली एमपीएससीच्या माध्यमातून पीएसआय, वाचा सविस्तर

 कॉमन कॉर्प

 यामध्ये भारतीय भाषा व्यतिरिक्त फायरिंग देशातून मासे आणले जातात व त्या आपल्या भारतीय हवामानातसोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात.असे बर्‍याच प्रकारचे मासेआपल्याकडे मत्स्य शेतीसाठी वापरले जातात.जसे भारतीयजातीचे मासे साचलेल्या पाण्यातप्रजनन करीत नाहीत परंतु या प्रकारातील विदेशी मासेसाठलेल्या पाण्यात देखील प्रजनन करतात.

1- सिल्वर कार्प- या जातीचा मासा नील-हरित शैवालव त्यासोबत वनस्पती प्लवंग खातो.ही जात लवकर वाढणारी म्हणून प्रसिद्ध आहे.

2- सायप्रिनस- मत्स्य शेतीत या जातीच्या माशांचा वापर करणे फायदेशीर असते. या जातीच्या माशांचे तीन उपजाती मत्स्यशेतीसाठीवापरले जातात.यामध्ये खवल्या, मिरर कार्प व लेदर कार्प यातील प्रमुख उपजाती आहेत ज्या मत्स्यशेतीसाठी फायदेशीर आहेत.

3- गवत्या किंवा ग्रास कार्प-या माशांचे खाद्य प्रामुख्याने गवत आणि पान वनस्पती हे आहे. तलावातील मत्स्यशेती मध्ये तलावात वाढणाऱ्या गवतनियंत्रणासाठी हा मासा उपयोगी ठरतो.

English Summary: tselection of proper species of fish for fish farming is crucial for succsess
Published on: 20 March 2022, 01:59 IST