Animal Husbandry

पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चांगल्या उत्पादनासाठी दुग्धजन्य जनावरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. जनावरांतील काही महत्वाचे रोग व त्यांवरील उपचारांविषयी आज माहिती घेणार आहोत.

Updated on 22 August, 2022 2:56 PM IST

पशुपालन व्यावसायामध्ये पशुपालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चांगल्या उत्पादनासाठी दुग्धजन्य जनावरांची (Dairy animals) काळजी घेणे महत्वाचे आहे. जनावरांतील काही महत्वाचे रोग व त्यांवरील उपचारांविषयी आज माहिती घेणार आहोत.

1) संसर्गजन्य रोग

संसर्गजन्य रोग विशेषता विषाणू आणि जिवाणूंमुळे होतो. निरोगी जनावरांच्या शरीरात श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावराशी संपर्क आणि माणसांद्वारे रोगकारक जंतू प्रवेश करतात.

शेतकऱ्यांनो जनावरांतील हा संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय (Preventive measures) म्हणून नियमित लसीकरण करून घ्या. यामध्ये अँथेक्स, काळा पाय, लाळ्या-खुरकत रोग, बुळकांडी रोग, स्तनदाह व पायकूज यांचा समावेश होतो.

2) घटसर्प

गाय म्हैस, शेळी मेंढी, लहान वासरे इत्यादि सर्व वयोगटातील जनावरात हा आजार दिसतो. विशेषता म्हशींमद्धे आजाराचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आहे. आजार पसरविणारे जंतू जमिनीत, जनावरांच्या श्‍वसनसंस्था आढळतात. आजारी जनावराचे नाक, तोंडातून येणाऱ्या स्त्रावातून किंवा स्त्रावाने संपर्कात आलेला चारा, पाणी व दूषित पाण्याने सुद्धा आजार पसरतो.

लक्षणे

सडकून ताप येतो. जनावर थरथर कापते. घशाखाली आणि गळ्यावर सूज येते. त्याअगोदर बाधित जनावरे श्‍वसन करताना घरघर आवाज येतो. डोळे लाल होतात, श्‍वासोच्छासाचा (breathing) वेग वाढतो. जनावर जमिनीवर पडून रहाते. श्‍वास घेण्यास त्रास होतो, जनावरे जीभ बाहेर काढतात. नाक, तोंडातून पाण्यासारखा स्त्राव येतो.

उपचार

आजारी जनावराला तीव्र स्वरूपाचा किंवा काही वेळेस अतितीव्र स्वरूपात हा आजार होत असल्याने औषधोपचार करूनही जनावर १० ते ७२ तासात दगावू शकते. यामुळे लसीकरण करावे. मे ते जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सर्व जनावरांना प्रतिबंधक लस टोचण्याची गरज असते.

3) तिवा

गाय म्हशींमध्ये हा तिवा आजार दिसतो. तीन दिवस सडकून ताप येतो. हा विषाणूजन्य आजार चावणाऱ्या माशा पसरवतात. जनावर काळवंडते, थरथरते, सुस्त होते. एका पायाने लंगडते, ताठरते. मान, छाती, पाठ व पायाचे स्नायू आकुंचित पावतात.

उपचार

आजारावर कुठलीही लस उपलब्ध नाही. आजार चावणाऱ्या माशा, डासांमुळे पसरत असल्यामुळे त्यांचे निर्मुलन करावे. गोठा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवावा.

आजारामुळे जनावरांचा मृत्यू जरी होत नसला तरी तीन दिवसांच्या आजारपणामुळे जनावर खंगते. यामुळे जनावरांवर त्वरित उपचार करून घ्या.

4) निमोनिया

जिवाणू, विषाणू, बुरशी व अस्वच्छता इत्यादी विविध कारणांमुळे होणारा आजार (disease) आहे. आजार प्राणीवर्ग गाय, म्हैस, शेळी, मेंढी, घोडा, गाढव, वराह इत्यादींना होतो. जनावरांना थंडी वाजून ताप येतो. श्‍वाच्छोश्‍वासाचा वेग वाढतो. श्‍वास घेताना घरघर आवाज येतो.

जनावरांना खोकला येतो. सुरवातीच्या अवस्थेत नाकपुड्यातून पाण्यासारखा स्त्राव येतो. त्यानंतरच्या अवस्थेत पांढरा, पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव येतो. डोळ्यातून पाणी वाहते. डोळे निस्तेज व मलूल बनतात.

उपचार 

जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा ठेवावा. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे बांधावे. जनावरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्यावर झूल पांघरा.

5) सर्रा

पावसाळ्यात गाय, म्हैस, (Cow, Buffalo) शेळी, मेंढी, घोडा व उंट यामध्ये आजार आढळतो. टॅबानस नावाच्या चावणाऱ्या माशा हा आजार पसरवतात. जास्त ताप येतो. जनावर गोल गोल फिरते. अडखळत चालते. झाडावर, भिंतीवर डोके आदळते.

उपचार

अशावेळी आजाराची लक्षणे इतर जीवघेण्या आजाराशी मिळतीजुळती असल्याने तज्ञ पशुवैद्यकाकडून या आजाराची खात्री करून ताबडतोब उपचार करा. गोठा स्वच्छ व कोरडा ठेवा.

English Summary: Treat infectious diseases Animals saved burning
Published on: 22 August 2022, 02:49 IST