Animal Husbandry

कडकनाथ कोंबडी ने पूर्ण जगात आपली एक खास ओळख बनवली आहे.कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची शान आहे. आदिवासी भागात ही कोंबडी कालीमासी या नावाने प्रसिद्ध आहे. या कोंबडी चे वैशिष्ट्य आहे की तिचा रंग पूर्ण काळा असतो आणि या कोंबडीचेमांसहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

Updated on 14 November, 2021 1:38 PM IST

कडकनाथ कोंबडी ने पूर्ण जगात आपली एक खास ओळख बनवली आहे.कडकनाथ कोंबडी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची शान आहे. आदिवासी भागात ही कोंबडी कालीमासी या नावाने प्रसिद्ध आहे. या कोंबडी चे वैशिष्ट्य आहे की तिचा रंग पूर्ण काळा असतो आणि या कोंबडीचेमांसहे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

.या कोंबडीच्या औषधी गुणधर्मांमुळेतिला खूप मागणी असते. या कारणामुळेच कडकनाथ कोंबडीचे पालन करणे हा एक चांगलाआर्थिक कमाई चा मार्ग बनू शकतो.

 इंडियन क्रिकेट टीम चे पूर्व  कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कडकनाथ कोंबडी पालन करतो.आता ही कोंबडी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात शिवाय देशातील बऱ्याच राज्यांमध्ये पाळली जाते. कडकनाथ कोंबडीची उत्पत्ती ही मध्यप्रदेश राज्यातील झाबुआ जिल्ह्यात झाली आहे. मध्यप्रदेश राज्यातील कडकनाथ कोंबडी ला जीआय टॅग मिळाला आहे. कडकनाथ जातीची कोंबडी ही रंगाने काळी, तसेच तिचे मांस देखील  काळे असते. या कोंबडीचे मांसात आयर्न आणि प्रोटीन जास्त प्रमाणात असते. तसेच या कोंबडीच्या मांसामध्ये फॅटआणि कोलेस्ट्रॉल फार कमी प्रमाणात असते.त्यामुळे हृदय आणि डायबिटीस रुग्णांसाठी फार उपयुक्तआहे. ह्या कोंबडीच्या मांससेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्व मिळतात. या कोंबडी पालनाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा लाखो रुपये कमवू शकता.

 सरकारी मदत

 मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ सरकार कडकनाथ कोंबडी पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहेत. छत्तीसगड राज्यात  53 हजार रुपये जमा केल्यावर सरकार कडून तीन हप्त्यांत 1000 छोटी पिल्ले, 30 कोंबड्या मावतील एवढे शेड आणि सहा महिन्यांपर्यंत पुरेल एवढे खाद्य मोफत दिले जात आहे. तसेच या कोंबड्यांचे लसीकरण आणि आरोग्य विषय असलेली सगळी जबाबदारी सरकार घेते. एवढेच नाही तर या कोंबड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांचे मार्केटिंगची जबाबदारी देखील सरकार कडे आहे.तसेच मध्यप्रदेश सरकार देखील विविध योजना राबवित आहे.

 कडकनाथ कोंबडी पालनाचे आर्थिक गणित

 कडकनाथ कोंबडी पालन आला  प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहेत आणि सरकारकडून मदत ही दिली जात आहे.

जर तुम्हाला कडकनाथ कोंबडी पालन करायचे असेल तर कृषी विज्ञान केंद्रांकडूनपिल्ले घेऊ शकतात.कडकनाथ कोंबडी हे साडेतीन ते चार महिन्यात विक्रीसाठी तयार होते. कडकनाथ कोंबडीचे लहान पिल्ले म्हणजेच चिक्स 70 ते 100 रुपये यादरम्यान मिळते. या कोंबडीच्या एका अंड्या चा भाव 20 ते 30 रुपयांपर्यंत आहे.बाजारामध्ये कडकनाथ कोंबडीची किंमत कमीत कमी तीन ते चार हजार रुपये असते. कडकनाथ कोंबडीच्या मांसाचा विचार केला तर सर्वसाधारणपणे सातशे ते हजार रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होते.हिवाळ्यामध्ये हाच भाव एक हजार ते बाराशे रुपये प्रति किलोपर्यंत असतो.

English Summary: through kadaknaath hen keeping dhoni earn more profit goverment give subsiy for hen keeping
Published on: 14 November 2021, 01:38 IST