Animal Husbandry

बरेच शेतकरी शेती करीत असताना सोबत विविध प्रकारचे जोडधंदे करतात.आता आपल्याला माहित आहेच कि जोडी धंद्यांमध्ये पशुपालन आणि कुक्कुटपालन आणि त्यानंतर नंबर लागतो तो शेळीपालनाचा व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.

Updated on 08 June, 2022 12:09 PM IST

बरेच शेतकरी शेती करीत असताना सोबत विविध प्रकारचे जोडधंदे करतात.आता आपल्याला माहित आहेच कि जोडी धंद्यांमध्ये पशुपालन आणि कुक्कुटपालन आणि त्यानंतर नंबर लागतो तो शेळीपालनाचा व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात.

अलीकडे बरेच शेतकरी आता या तीन जोडधंद्या व्यतिरिक्त वराहपालन, ससेपालन इत्यादी व्यवसायाकडे वळत आहेत.या जोडधंद्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसोबत एक आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्त्रोत निर्माण होतो.

या सगळ्या जोड व्यवसायांच्या यादीमध्ये आता असाच एक शेती पूरक जोडधंदा पुढे येत आहे आणि तो म्हणजे बटेर पालन हा व्यवसाय होय. अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी बटेर पालनाबद्दल पुरेशी माहिती नाही.

परंतु चांगले प्रशिक्षण आणि व्यवस्थित माहिती घेऊन जर हा व्यवसाय केला तर नक्कीच शेतकऱ्यांना या माध्यमातून कमीत कमी खर्चात आणि जागेत उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत निर्माण होईल. या लेखात आपण बटेर पालन व्यवसायाची थोडक्यात माहिती घेऊ.

नक्की वाचा:'हा' शेतीपूरक व्यवसाय सुरु करा अन कमी खर्चात लाखों कमवा, वाचा सविस्तर

 बटेर पालन व्यवसाय

आपल्याला माहित आहेच की,सध्या बाजारांमध्ये अंडी आणि मांस त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.तसे पाहायला गेले तर कोरोना नंतर नागरिक स्वतःच्या आरोग्याबद्दल खूपच जागरूक झाले आहेत.

या सगळ्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आता कुकुट पालना सोबतच बटेर पालनात आपले नशीब आजमावत आहेत. जर आपण बटेर पालन या व्यवसायाचा विचार केला तर पोल्ट्री फार्मिंग त्या तुलनेत त्याला खूपच कमी खर्च लागतोपरंतु या कमी खर्चात नफा जास्त देण्याची क्षमता या व्यवसायात आहे.

यामध्येलक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये बटेर पक्षाच्या शिकारीवर बंदी आहे,परंतु तुम्हाला सरकारची परवानगी घेऊन हा धंदा करता येतो.यामध्ये बरेच शेतकरी आता बटेर पालन करीत असून जपानी लहान पक्षी अर्थात क्रॉस बीड ची निवड करीत असून त्याला परवानगी आहे.

आता बटेर पक्षाच्या मांसाचा विचार केला तर ते कोंबडीच्या मांसाच्या तुलनेत जास्त चवदार आणि पौष्टिक तत्त्वांनी परिपूर्ण आहे. तसेच त्यामध्ये फॅटचे प्रमाण नगण्य असून ज्या लोकांना जास्त वजनाची समस्या आहे असे लोक वजन कमी करण्यासाठी याच्या मांसाचा वापर आहारात करू शकतात.

नक्की वाचा:Sheep Farming: मेंढीपालन सुरु करा अन कमवा लाखों; वाचा याविषयी

सध्याचा पण भारताचा विचार केला तर बटेर पालन हा व्यवसाय बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये खूप जोमाने वाढत आहे.तुम्हाला शेती करीत असताना जास्त यावर लक्ष देण्याची गरज नसून अगदी सहजरीत्या शेतकरी हा व्यवसाय करू शकतात.

बटेर पक्षी हा आकाराने खूप लहान असून त्याला पाळण्यासाठी खूप कमी जागेची आवश्यकता असते. तसेच त्यांना परिपक्व होण्यासाठी खूप कमी वेळ लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना नफा देखील लवकर मिळतो.

जर तुम्हाला बटेरचे एका आठवड्याचे लहान पक्षी विकत घ्यायचे असेल तर ते तुम्हाला 20 रुपयांना मिळते.सात आठवड्यांपर्यंत त्याचे संगोपन व्यवस्थित केल्यानंतर त्याचे वजन 300 ग्रॅम जेव्हा होते तेव्हा ते 50 रुपयांपर्यंत सहज विकले जाते.

बटर पक्षाला प्रौढ होण्यासाठी 45 ते 50 दिवस लागतात. याची मादी लहान पक्षी अंडी घालू शकते.मादी एका वर्षात  280 ते तीनशे अंडी घालते.या अंड्यामध्ये फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे बरेच लोक आता आहारामध्ये याचा वापर करीत असून आवडीने ते खातात. बटेर पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आयसीएआर अर्थात कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांमध्ये देखील दिले जाते.

नक्की वाचा:Business Idea: फक्त 50 हजारात सुरु करा 'हा' शेती पूरक व्यवसाय; कमवा बक्कळ

English Summary: this small agri related bussiness give more profit to farmer and financial security
Published on: 08 June 2022, 12:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)