पशुपालन यामध्ये जनावरांचे खाद्य यांना खूप महत्त्व आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी होते. तसेच बऱ्याचदा पशुखाद्याची कमतरता भासते. अशावेळी पशुपालकांनी घरगुती पशुखाद्य जर तयार केले तर दूध उत्पादनात घट येण्याची शक्यता कमी होते तसेच जनावरे सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल. या लेखात आपण घरच्या घरी संतुलित पशुखाद्य कसे तयार करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
100 किलो संतुलित पशुखाद्य बनवण्यासाठी लागणारे घटक
- दाणे-मका, ज्वारी, गहू आणि बाजरी यांचे प्रमाण साधारणता 34 किलो पर्यंत असावे.
- पेंड( भुईमूग व मूग पेंड)- यांचे प्रमाण साधारणतः 29 किलो आवश्यक आहे. यापैकी कोणतेही एक पेंट दाण्यामध्ये मिसळून घ्यावे.
- टरफले/ भुसा ( गहू, हरभरा, डाळी, भात ) यांचे प्रमाण साधारणता 34 किलो आवश्यक आहे.
- खनिज मिश्रण दोन किलो आणि मीठ एक किलो द्यावे.
- वरील सर्व घटक पदार्थ एकत्र मिसळून व भरडा करावा. हा भरडा जनावरांना संतुलित पशुखाद्य म्हणून देऊ शकतो.
भरडा मिश्रित संतुलित पशुखाद्य चे प्रमाण
- गाईसाठी दीड किलो आणि म्हशी साठी दोन किलो प्रति दिवस
- जगाई दुधावर आहेत अशा गाईंना एक लिटर दुधामागे 40 ग्रॅम
- दुधावर असणाऱ्या म्हशी साठी एक लिटर दुधामागे 500 ग्रॅम अधिक संतुलित पशुखाद्य द्यावे.
- गाबन गाय किंवा म्हैस सहा महिन्यापेक्षा जास्त- दीड किलो प्रति दिवस संतुलित पशुखाद्य द्यावे.
- वासरांना त्यांचे वय आणि वजन यानुसार साधारणत एक ते अडीच किलो प्रति दिवस पशुखाद्य द्यावे.
- पाणी गरजेनुसार आणि ऋतूनुसार ऐंशी ते शंभर लिटर प्रति जनावर द्यावे.
- हिरवा चारा-मका, विशिष्ट गवत व पाने 15 ते 20 किलो प्रति जनावर
- वाळलेला चारा, कडबा किंवा काड- सात ते आठ किलो प्रति जनावर
- वाळलेला चारा व हिरवा चारा कुट्टी करून द्यावा.
शेळ्या-मेंढ्या साठी संतुलित आहार
- भुईमुगाची ढेप 25 किलो
- गव्हाचा कोंडा 33 किलो
- मका, बाजरी व ज्वारी भरडलेली 40 किलो
- खनिज पदार्थांचे मिश्रण एक किलो
- मीठ एक किलो
- वरील सर्व पदार्थ बारीक भरडून एकत्र करून शेळ्यांना संतुलित खाद्य म्हणून देता येतात.
- दररोज प्रति शेळी अर्धा किलो संतुलित खाद्य द्यावे.
( संदर्भ- ॲग्रोवन )
Published on: 21 October 2021, 01:41 IST