Animal Husbandry

शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तोटा होण्याची शक्यता फारच कमी असते. शेळीचे दूध, मांसआणि त्याच्या चामड्यापासून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.जर आपण बाजाराचा विचार केला तर बोकडाला नेहमी चांगली मागणी असते

Updated on 01 January, 2022 5:33 PM IST

शेळीपालन हा एक असा व्यवसाय आहे ज्यामध्ये तोटा होण्याची शक्यता फारच कमी असते. शेळीचे दूध, मांसआणि त्याच्या चामड्यापासून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.जर आपण बाजाराचा विचार केला तर बोकडाला नेहमी चांगली मागणी असते

भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली अंतर्गत केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने  शेळीपालनात सहाय्यभूत ठरेल असे एक मोबाईल ऍप तयार केला आहे. याद्वारे शेतकऱ्यांना शेळीपालना विषयी इत्थंभूत माहिती मिळेल जसे की जाती, शेळी पालन विषयी योजना इत्यादींचे देखील माहिती मिळते. अलीकडच्या काळात शेळीपालन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे मुख्य साधन बनत असल्याचे म्हटले जाते. कारण शेळी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्तीचा खर्च येत नाही आणि शेतकरी इतर शेती कामांसहतेसुरू करू शकतात. सरकार आणि पशु शास्त्रज्ञही या दिशेने सतत काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय शेळी संशोधन संस्थेने  (CIRG) शेळी पालन ॲप तयार केले आहे. जालना शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी हे मोबाईल ऍप महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते.

 भारतीय शेळीच्या जाती

 या मोबाईल ॲप मध्ये भारतीय शेळ्यांच्या जाती बद्दल खूप सविस्तरपणे माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जर तुम्हाला शेळी फक्त मांसासाठी ठेवायच्या असतील सर तुम्ही कोणत्या जाती निवडा किंवा कोणत्या जाती दुधासाठी अधिक चांगल्या असतील याचे सुध्दा विश्लेषण आहे.

 कृषी उपकरणे आणि चारा उत्पादन

 शेळीपालनात कोणत्या कृषी उपकरणाची गरज आहे किंवा चारा कसा तयार करावा, याची माहिती शेळी पालन मोबाईल ॲप मध्ये देण्यात आली आहे. चारा उत्पादन आणि शेती तयार करण्यासाठी कोणती उपकरणे आवश्यक आहेत याची माहिती देखील देण्यात आली आहे.

 शेळीच्या आरोग्याविषयी माहित

 या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था कशी केली जाईल, हे सांगण्यात आले आहे तसेच या ॲपद्वारे शेळी पालक शेतकरी शेळीमध्ये होणाऱ्या सामान्य रोगांच्या लक्षणं विषयी माहिती मिळू शकतात आणि त्यांना रोखण्यासाठी वेळीच उपाय योजना करू शकतात.

 हे ॲप्लिकेशन कसे आणि कुठे मिळवायचे?

शेळी पालन साठी प्रथम आपल्याला गुगल प्ले स्टोअर वर जावे लागेल. त्यानंतर CIRG Goat Farming असे टाइप करा. त्यानंतर ॲप्लिकेशन सापडेल. एप्लीकेशन हिंदी,इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू भाषेत उपलब्ध आहे.

English Summary: this mobile application is more useful and benificial in goat rearing
Published on: 01 January 2022, 05:33 IST