Animal Husbandry

जर आपण शेळीपालन व्यवसाय असा विचार केला तर अगदी कमीत कमी खर्चात आणि कमी जागेत उत्तम रित्या नफा देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिले जाते. शेळीपालन व्यवसाय याकडे आता बरेच सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत. बरेच शेतकरी कुटुंब एक ते दोन शेळ्याचे पालन करत असे. परंतु आता शेळीपालनाला एक व्यावसायिक स्वरूप येत असून मोठमोठे शेड उभारून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेळीपालन व्यवसाय करण्यात येत आहे.

Updated on 25 August, 2022 2:57 PM IST

परंतु पशुपालन व्यवसाय असो की शेळीपालन यामध्ये तुम्ही घेत असलेल्या पशूंची किंवा शेळ्यांची प्रजात कोणती आहे म्हणजे कोणत्या जातीची शेळी आहे?त्यापासून मिळणारे उत्पादन किती मिळेल? हे देखील तपासणे तितकेच गरजेचे आहे. या लेखात आपण शेळ्यांच्या दोन महत्त्वपूर्ण प्रजाती जाणून घेणार आहोत.

नक्की वाचा:व्यवसाय करायचाय पण भांडवल नाही बोलणारांसाठी ही बातमी! आता शेळी पालनासाठी मिळणार 4 लाख रुपये...

शेळीपालनासाठी उपयुक्त शेळ्यांच्या या दोन प्रजाती

1- नंदीदुर्गा शेळी- जर आपण या शेळीच्या जातीचा विचार केला तर ही कर्नाटक राज्यात आढळते. या शेळीचा चेहरा, तिची पायाचे खूर आणि डोळ्यांची पापणी काळ्या रंगाचे असते. नंदीदुर्गा शेळ्या या प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळल्या जातात. या जातीच्या शेळ्यांची महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेया जुळ्या करडांना जन्म देतात.

त्यामुळे सहाजिकच दुप्पट नफा होतो. नंदीदुर्गा मादी शेळीचे वजन 25 ते 42 किलोच्या दरम्यान असते तर नराचे वजन 56 किलोपर्यंत असते. त्यामुळे या जातीपासून मिळणारे मांस उत्पादन साहजिकच जास्त प्रमाणात मिळते.

नक्की वाचा:Sanen Goat: जास्त दूध उत्पादनासाठी सानेन शेळी ठरतेय अव्वल; पालनातून शेतकऱ्यांना मिळणार चांगले उत्पादन

2- भाखरवाली शेळी- शेळीची ही प्रजात जम्मू काश्मीर राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या जातीच्या शेळी चा रंग पांढरा आणि काळा अशा दोन्ही प्रकारचा असूनया शेळीची शिंगे खाली वाकलेले असतात. जर आपण या शेळीचा विचार केला तर ही दूध आणि मांस या दोन्हीसाठी मोठ्या प्रमाणात पाळणे फायदेशीर ठरते.

जर आपण या शेळीच्या दूध क्षमतेचा विचार केला तर दररोज सरासरी 900 मिली दूध ही शेळी देते. या जातीच्या मादी शेळीचे वजन 50 किलो आणि नराचे वजन 60 किलो पर्यंत असते. या शेळीपालनातून भरपूर नफा मिळू शकतो.

नक्की वाचा:Poultry Farming: 250 अंडी देणारी प्लायमाउथ रॉक कोंबडी पाळा; कमी खर्चात मिळणार जास्त नफा

English Summary: this is two goat species is so profitable in goat rearing
Published on: 25 August 2022, 02:57 IST