शेळीपालन व्यवसाय हा कमी जागेत आणि कमी खर्चात करता येत असल्यामुळे बरेच तरुण शेतकरी मित्र आता या व्यवसायाकडे वळत आहेत. शेळीपालन व्यवसायाची सगळी यशाची मदार ही शेळीच्या जातिवंत जातींच्या निवडीवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर आपण या लेखामध्ये शेळ्यांच्या काही महत्त्वपूर्ण जातींची थोडक्यात माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Goat Species: 'कोकण कन्याळ' देईल शेळीपालनात यशाची समृद्धी, वाचा या शेळीची माहिती
शेळ्यांच्या महत्त्वपूर्ण जाती
1- मालवा- ही शेळीची जात जात मध्यप्रदेश राज्यातील असून भोपाळ या ठिकाणी प्रसिद्ध आहे. केशरी पांढरा रंगाचे असते व शिंगे देखील असतात.
मालवा जातीच्या नराचे वजन 50 ते 80 किलो तर मादीचे शेळीचे वजन 40 ते 50 किलो दरम्यान असते. मालवा जातीचा बोकड हा कुर्बानीसाठी खूप प्रसिद्ध असून 100 किलो पेक्षा सुद्धा जास्त नर बोकडाचे वजन असते.
2-पतिरा- शेळ्यांची ही जात गुजरात राज्यामध्ये आढळते. पतिरा जातीची शेळी रंगाने पांढरी असून तोंडावर गुलाबी छटा व कान गुलाबी असतात. तसेच डोळ्यांच्या सभोवताली सुरकुत्या दिसतात. पतिरा जातीच्या नराचे वजन 50 ते 60 किलो पर्यंत असते व मादी शेळीचे वजन 35 ते 50 किलो असते.
पतिरा शेळीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही जात दुर्मिळ असून महागडी व सुंदर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
3-सोजत- सोजत ही जात राजस्थान मध्ये आढळते. रंगाने पांढरी असून डोळ्यावर व कानांवर डाग असतात. सोजत जातीच्या शेळीचे वैशिष्ट्य म्हणजे या शेळीमध्ये ज्या शेळीचे कान गुलाबी असतात
तिला खूप किंमत मिळते. बकरी ईदच्या निमित्ताने या जातीच्या बोकडांना जास्त किंमत मिळते. सोजत जातीच्या नराचे वजन 50 ते 70 किलो पर्यंत असते तर मादी शेळीचे वजन35 ते 45 किलोपर्यंत असते.
Published on: 02 October 2022, 03:21 IST