Animal Husbandry

दूध हा एक असा पदार्थ आहे ज्याला लहान मुले,तरुण आणि वृद्ध व्यक्ती म्हणजे सगळ्याच वयाचे व्यक्ती सेवन करतात. दुधाला एक पौष्टिक पेय आहार मानले जाते.भारत हा जगातील प्रमुख दूध उत्पादक देश आहे.दरवर्षी 14 करोडटन दुधाचे उत्पादन भारतात होते.

Updated on 09 November, 2021 10:11 AM IST

 दूध हा एक असा पदार्थ आहे ज्याला लहान मुले,तरुण आणि वृद्ध व्यक्ती म्हणजे सगळ्याच वयाचे व्यक्ती सेवन करतात. दुधाला एक पौष्टिक पेय आहार मानले जाते.भारत हा जगातील प्रमुख दूध उत्पादक देश आहे.दरवर्षी 14 करोडटन दुधाचे उत्पादन भारतात होते.

भारताला दूध उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या भारतात काही डेअरी ब्रांड योगदान देत आहेत. भारतातील जवळजवळ सात कोटी शेतकरी परिवार डेअरी उद्योगाची जोडले गेले आहेत. भारतातील काही कंपन्यांनी जागतिक स्तरावर स्वतःची विशिष्ट ओळख बनवले आहे. भारतामध्ये डेरी उद्योगाचा वार्षिक टर्न ओव्हर  11.35 लाख कोटी रुपये आहे. या लेखात आपण  भारतातील पाच डेरी उद्योग क्षेत्रातील कंपन्या विषयी माहिती घेणार आहोत.

 या आहेत भारतातील प्रमुख डेरी ब्रॅण्ड्स( कंपनी)

  • सीड्स फार्म डेअरी ब्रांड- शेतकरी कुटुंबातील किशोर इंदुकुरीयांनी डेअरी उद्योग सुरू करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.ज्याला सीड्स फार्म या नावाने ओळखले जाते.या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांनासबस्क्रीप्शन च्या आधारावर भेसळमुक्त दूध ग्राहकांना पुरवनेसुरू केले. 2012 मध्ये त्यांनी कोयमतुर त्याचे 20 गाई खरेदी केल्या आणिहैदराबाद मध्ये डेअरी फार्म सुरू केला. या डेरी फार्म चा वार्षिक उलाढाललाखात आहे.
  • मिल्क मॅजिक डेरी ब्रांड- मध्यप्रदेश येथील शेतकरी मोदी यांनी दूध डेरी व्यवसायात मोठी सफलता मिळवले आहे. मोदी यांनी घरगुती बी2सीडेअरी उत्पादन ब्रांड मिल्क मॅजिक  लॉन्च केला. हा ब्रँड निर्यातक्षम मूल्यवर्धित डेअरी उत्पादनाची किरकोळ आणि होलसेल  विक्री करतो.
  • हेरिटेज डेअरी ब्रँड- आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 80 लाख रुपये सुरुवातीला गुंतवणूक करून डेअरी व्यवसायाला सुरुवात केली. त्यांच्या या व्यवसायाला हेरिटेज या नावाने ओळखले जाते.हेरिटेज फुड्स ने लाखो शेतकऱ्यांसोबत काम केले आहे. हेरिटेज कंपनी ताजी दूध दही, दूध पावडर, स्वादयुक्त दूध सोबतच अनेक डेरी उत्पादनांचे निर्मिती करते. ग्रामीण दूध संकलन केंद्रे आणि हेरिटेज फार्मर वेल्फेअर ट्रस्ट त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.
  • मिस्टर मिल्क डेअरी ब्रांड- पुणे येथील रिअल इस्टेट कंपनी मित्तल समूहाचे संस्थापक नरेश मित्तल यांनी दूध उत्पादन आता स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ब्रांड ला मिस्टर मिल्क ब्रांड च्या नावाने ओळखले जाते.
  • 2016 मध्ये पुणे येथे मित्तल हॅप्पी काऊ डेरी फार्म सुरू करण्यासाठी प्रेरित केले होते.त्याचा उद्देश होता की, ग्राहकांना उच्च गुणवत्ता असणारे दूध उपलब्ध करून देणे.आज पर्यंत मिस्टर मिल्क ने 1.8 कोटी रुपयांचा महसूल कमविला आहे.तसेच 2020 ते 21या आर्थिक वर्षात 200 टक्क्या पर्यंत वाढ नोंदवली आहे.
  • ज्ञान डेरी ब्रँड- ज्ञान डेअरी ब्रांड 2007 या वर्षात जय अग्रवाल यांनी लॉन्च केला. जय अग्रवाल हे लखनऊ येथील आहेत. जय अग्रवाल यांचा अगोदर तंबाखू व्यवसाय होता. त्यामध्ये त्यांना यश मिळाले नव्हते. त्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी आपल्या भावासोबत काही वर्षांपूर्वी खरेदी केलेली शटडाऊन डेरी चे नूतनीकरण आणि नवीन रचना करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ज्ञान डेरी चालू केली.
English Summary: this is the top five dairy brand in india they are help to farmer in progress
Published on: 09 November 2021, 10:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)