Animal Husbandry

सध्या पशुधनावर 'लम्पी स्किन डिसीज' या भयंकर आजाराचे संकट कोसळले असून संपूर्ण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतात या रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महाराष्ट्रमध्ये सुद्धा 50 पेक्षा जास्त ठिकाणी पशुधनाला या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाकडून खूप काही प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.

Updated on 07 September, 2022 11:53 AM IST

सध्या पशुधनावर 'लम्पी स्किन डिसीज' या भयंकर आजाराचे संकट कोसळले असून संपूर्ण भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतात या रोगाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. महाराष्ट्रमध्ये सुद्धा 50 पेक्षा जास्त ठिकाणी पशुधनाला या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाकडून खूप काही प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे.

त्यामुळे पशुपालकांनी पशुधनाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण या आजाराविषयी थोडक्यात माहिती घेऊ.

 लंपी आजाराची स्वरूप

 सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा आजार जनावरांना होणारा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजाराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा आजार शेळ्या आणि मेंढ्यांना होत नाही. तसेच जनावरांपासून मानवास देखील होत नाही.

परंतु नर आणि मादी अशा सर्व वयोगटातील जनावरांमध्ये हा आजार आढळतो. मोठ्या जनावरांपेक्षा लहान वासरांमध्ये याचे प्रमाण तुलनेने अधिक असते.या आजाराचा मृत्युदर एक ते पाच टक्क्यांपर्यंत आढळून येतो.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो काळजी घ्या! दुधाचे दर वाढले आणि लम्पीच्या संसर्गही वाढला, दुग्ध उत्पादनामध्ये झाली घट...

 या आजाराचे वाहक

 या आजाराचा प्रसार मुख्यत्वे करून चावा घेणारे माशा, चिलटे तसेच डास व गोचीड यांच्या माध्यमातून होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रादुर्भावित जनावराचा स्पर्श हा निरोगी जनावराला झाला तर निरोगी जनावर देखील प्रादुर्भावित होते.

तसेच त्या जनावराला याचा प्रादुर्भाव झाला आहे अशा जनावराच्या डोळ्यांमधून जे काही पाणी पडते त्या माध्यमातून, तसेच तोंडातील लाळ व नाकातील स्राव जर चाऱ्यावर पडले आणि असा चारा जर निरोगी जनावरांना खाल्ला तर जनावराला देखील या आजाराचा प्रादुर्भाव होतो.

नक्की वाचा:News:दूध उत्पादन घटण्याची शक्यता?देशात लंपीचे थैमान, देशात 50 हजार गाईंचा मृत्यू

 जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे

 या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या जनावराला अगोदर मध्यम स्वरूपाचा तर काही वेळेस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. जनावरांच्या नाकातून आणि डोळ्यातून पाणी यायला लागते व जनावरांचे खाणे पिणे कमी होते. दूध देणाऱ्या जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.

सगळ्यात महत्वाचे लक्षण म्हणजे शरीरावर अंदाजे दोन ते पाच सेंटीमीटर व्यास असलेले कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी प्रमुख्याने डोक्यावर, मानेवर तसेच पाय आणि कासेभोवती मोठ्या प्रमाणात येतात. तसेच जनावरांच्या घशामध्ये आणि तोंडात,

फुप्फुसांमध्ये आणि श्वसन नलिकेत फोड येतात.  तोंडामध्ये जे काही पुरळ येतात त्यामुळे जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ स्त्रवते. तोंडामध्ये जे काही व्रण तयार होतात त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास समस्या निर्माण होते.

जनावरांच्या डोळ्यांमध्ये देखील व्रण तयार होतात. त्यामुळे जनावरांची दृष्टी बाधित होण्याची शक्यता असते. जनावरे प्रचंड प्रमाणात अशक्त होतात व वजन कमी व्हायला लागते. जर एखाद्या गाभण जनावरांना हा आजार झाला तर जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो.

नक्की वाचा:दूध उत्पादनासाठी म्हशींच्या 'या' 4 जातीं ठरत आहेत फायदेशीर

 प्रतिबंधात्मक उपाययोजना

 सध्यातरी भारतामध्ये या रोगावर लस उपलब्ध नसून शेळ्यांसाठी देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येऊ शकतो.

ज्या गावांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव आहे अशा गावापासून 5 किलोमीटर त्रीजेत येणाऱ्या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय आणि म्हैस वर्गातील जनावरांना पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. परंतु जनावराला रोग होऊच नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या जनावरांना संसर्ग झाला आहे अशा जनावरांना काटेकोरपणे विलगीकरण केले पाहिजे.

जर जनावरे उपचारांना प्रतिसाद देत नसतील तर खासगी पशुवैद्यकीय यांनी सरकारी यंत्रणेला ताबडतोब कळवले पाहिजे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे त्यावर उपचार नाही परंतु प्रादुर्भाव झालेल्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्याने इतर जिवाणूजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते

त्यामुळे अशा जनावरांच्या उपचारासाठी अँटिबायोटिक्स,दाहनाशक,  तापनाशक,वेदनाशामक औषधे,रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व अ, ई आणि बी तसेच शक्तिवर्धक लिव्हर टॉनिक इत्यादी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने पाच ते सात दिवस उपचार केल्यास बहुतांशी जनावरे पूर्णपणे बरी होण्याची शक्यता असते.

नक्की वाचा:सावधान! महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लंपी रोगाचा फैलाव, 11 लाखांहून अधिक जनावरे बाधित

English Summary: this is some important symptoms to lumpy skin disease in animal
Published on: 07 September 2022, 11:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)