Animal Husbandry

प्रत्येक व्यवसायाचा विचार केला तर व्यवस्थापन अचूक असणे खूप गरजेचे असते. व्यवसायामध्ये अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींचा बारकाईने नियोजन करून खर्च कमी करता येतो व मिळणारा नफ्यात वाढ करता येते. अगदी हीच बाब शेळी पालन व्यवसायाला देखील लागू पडते. शेळीपालन व्यवसाय मध्ये देखील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली आणि काही पद्धती अवलंबल्या तर नक्कीच खर्च कमी होऊन नका वाढू शकतो. त्यामुळे या लेखात आपण शेळीपालना मधील मुक्त व्यवस्थापन पद्धत जी खर्च कमी करून अधिक नफा देण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त आहे, त्याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 03 October, 2022 12:47 PM IST

प्रत्येक व्यवसायाचा विचार केला तर व्यवस्थापन अचूक असणे खूप गरजेचे असते. व्यवसायामध्ये अगदी छोट्या-मोठ्या गोष्टींचा बारकाईने नियोजन करून खर्च कमी करता येतो व मिळणारा नफ्यात वाढ करता येते. अगदी हीच बाब शेळी पालन व्यवसायाला देखील लागू पडते.

शेळीपालन व्यवसाय मध्ये देखील अगदी छोट्या-छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली आणि काही पद्धती अवलंबल्या तर नक्कीच खर्च कमी होऊन नका वाढू शकतो. त्यामुळे या लेखात आपण शेळीपालना मधील मुक्त व्यवस्थापन पद्धत जी खर्च कमी करून अधिक नफा देण्यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त आहे, त्याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Goat Weight Loss: शेळ्यांचे वजन कमी होण्याचे कारणे वाचा आणि करा उपाययोजना, टळेल आर्थिक नुकसान

 मुक्त व्यवस्थापन पद्धती

 यामध्ये शेळीपालन करताना शेतकरी शेळ्यांची जोपासना ही नापीक जमिनीवर उगवलेले गवत किंवा गायरान,नैसर्गिक पडीक जमीन किंवा झाडपाला इत्यादींवर शेळ्यांची  उपजीविका केली जाते. या पद्धतीमध्ये रानामधील झाडांची सावली तसेच नदी,नाल्याचे पाणी तसेच तळ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो

व या पद्धतीमध्ये निवारा, शेळ्यांसाठी आवश्यक चारा वैरण, खुराक आणि पाण्याची व्यवस्था केली जात नाही. या सगळ्या आवश्यक गोष्टींसाठी संपूर्णपणे शेळ्या या निसर्गावर अवलंबून असतात. ही पद्धत कमी पावसाच्या किंवा उष्ण हवामान असलेल्या भागात खूप सोयीचे आहे.

या पद्धतीत नैसर्गिक साधनांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. आर्थिक दुर्बल घटकातील शेळी पालक पारंपारिक स्वतंत्र पशू व्यवस्थापन आणि उत्पन्नाचे प्रमुख साधन म्हणून या पद्धतीचा अवलंब करतात.

नक्की वाचा:Goat Species: 'कोकण कन्याळ' देईल शेळीपालनात यशाची समृद्धी, वाचा या शेळीची माहिती

 या पद्धतीमध्ये कळपातील शेळ्यांची संख्या 50 पासून ते 200 यादरम्यान असू शकते. एकूण भांडवली गुंतवणूक, शेळ्यांच्या देखरेखीसाठी लागणारे मजूर तसेच चारा व पाणी यावरील खर्च वाचतो. तसेच शेळ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने मुक्त व्यवस्थापन पद्धती फायदेशीर असून

शेळ्या फिरत असल्यामुळे त्यांच्या शरीराला देखील व्यायाम मिळतो.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेळ्यांच्या खाण्याच्या बाबतीत असलेल्या आवडीनिवडी खूप चांगल्या पद्धतीने जोपासल्या जातात. मजुरांवरील खर्च देखील वाचतो.

 मुक्त व्यवस्थापन पद्धतीचे हे आहेत काही तोटे

 मुक्त व्यवस्थापन पद्धती मध्ये शेळ्या मोकळ्या कुरणावर चरायला जातात त्यामुळे लेंडीखत वाया जाते व खताचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाही.दुसरा तोटा म्हणजेच शेळ्यांचे प्रजनन,आहार आणि दूध उत्पादनावर नियंत्रण ठेवता येत नाही. 

नवजात करडांचे शरीराची वाढ खुंटते व मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता होते. त्यामुळे व्यापारी दृष्टिकोनातून शेळी पालन करायचे असेल तर ही पद्धत फायद्याची नाही. परंतु कमी प्रमाणात शेळीपालनासाठी ही पद्धत नक्कीच एक आर्थिक फायदा देणारी आहे.

नक्की वाचा:Goat Rearing: 'या' तीन जातींच्या शेळ्या देतील शेळीपालनात आर्थिक समृद्धी, वाचा या जातींविषयी डिटेल्स

English Summary: this is so many benificial method of goat rearing get more profit
Published on: 03 October 2022, 12:47 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)