Animal Husbandry

सध्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळा सुरू आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 42 अंश याच्यापुढे आहे. त्यामुळे वातावरणातील उकाड्यामुळे सर्व जण हैराण झाले आहेत.

Updated on 02 May, 2022 10:06 PM IST

सध्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळा सुरू आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 42 अंश याच्यापुढे आहे. त्यामुळे वातावरणातील उकाड्यामुळे सर्व जण हैराण झाले आहेत.

. या उष्णतेचा परिणाम हा माणसांनाच नाही तरशेतातील पिकांना,जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात होतो. ज्या जनावरांना चरण्यासाठी मोकळे रानावर सोडले जाते,  अशा जनावरांच्या बाबतीत ही समस्या जास्त भेडसावते. या उष्णतेचा परिणाम हा  व्यक्तीप्रमाणे जनावरांवर देखील होऊन उष्माघाताचा  धोका संभवतो. त्यामुळे जनावरांचे प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण जनावरांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. ज्याद्वारे आपण जनावरांना उष्णतेचा होणारा त्रासओळखू शकतो.

 ही लक्षणे दिसली की समजा जनावराला ताप आला

 सध्या राज्यामध्ये उष्णतेची लाट सुरू असून राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांच्या सुरक्षेसाठी काही सूचना जारी केले आहेत. ज्यामध्ये जनावरांची उष्णतेपासून संरक्षण केले जाऊ शकते. यानुसार एखाद्याजनावराला जास्त ताप आला तर समजावे कि जनावरांना उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात झाला आहे. यामध्ये जनावरालाधाप लागणे,तोंडातून लाळ बाहेर पडणे, अस्वस्थता दिसून, भूक न लागणे आणि जास्त पाणी पिणे, लघवीचे  प्रमाण कमी किंवा जास्त होणे, हृदयाचे ठोके जलद होणे इत्यादी लक्षणे दिसतात.

 उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी हे सात उपाय आहेत महत्वाचे

1- प्राण्यांना हवेशीर गोठ्यात कींवा झाडाच्या थंड सावली खाली बांधा. जनावरांचा थेट सूर्यप्रकाश आशी संबंध येणार नाही अशा ठिकाणी जनावरांची बांधायचे सोय करा.

2-गोठ्याच्या भिंती ना थंड ठेवण्यासाठी ओल्या पिशव्या टांगल्या जाऊ शकतात. बाहेरील गरम हवेचा झोत आत जाण्यासाठी वेळोवेळी पाण्याची फवारणी करून बाहेर लावलेले पोते किंवा पिशव्या ओले ठेवणे महत्त्वाचे आहे.

3- जर शक्य झाले तर गोठ्यामध्ये पंखा किंवा कुलरच्या वापर करणे खूपच फायद्याचा ठरू शकतो.

4- उष्णतेमुळे जनावरांना पाण्याची कमतरता शरीरात भासू नये म्हणून जनावरांनादिवसातून कमीत कमी चार वेळा थंड पाणी द्यावे.

5- प्राण्यांमध्ये म्हशीना दिवसातून दोनदा थंड पाण्यानेअंघोळ घातली तर उष्णतेपासून बचाव करता येतो.

6- जनावरांना चरायला नेताना पहाटे किंवा संध्याकाळी उशिरा सोडावीत.

7- तसेच आहारामध्ये संतुलित आहाराची कमतरता भासू देऊ नये.

 जनावरांना ताप आल्यास करा हा उपचार

 जर उष्णतेचा जनावरांना संसर्ग झाला तर त्यावर उपचार करणे गरजेचे असते. या बाबतीतले काही उपाय बिहार पशुसंवर्धन विभागाने शेअर केले आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी जनावरांना उष्णतेचा त्रास झाल्यावर थंड ठिकाणी ठेवावे किंवा त्यांच्यावर थंड पाणी शिंपडू शकतात. जर शक्य असेल तर शरीरावर बर्फ घासणे एक प्रभावी उपचार आहे. तसेच पुदिना आणि कांद्याचा अर्क जनावरांना देण्यासाठी गुणकारी आहे. थंड पाण्यात साखर, भाजलेली बार्ली आणि मीठ यांचे मिश्रण पीने हादेखील उष्णता टाळण्यासाठी प्रभावी उपाय आहे.

तसेच जनावरांना आराम मिळत नसेल तर पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.( स्त्रोत- किसानराज)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:केंद्र आणी राज्य सरकारला आलेल अपयश लपविण्यासाठी जणतेच्या भावनेशी खेळल जातंय

नक्की वाचा:मे महिन्यात उन्हाळ्यापासून लोकांची होतेय सुटका! मात्र अमरावती मध्ये उष्माघाताने घेतले बळी

English Summary: this is seven tips give protection to animal from heat wave like as buffalo,cow
Published on: 02 May 2022, 10:06 IST