दुधाळ जनावरांना मध्ये बऱ्याचदा प्रजननक्षमते विषयी समस्या आढळून येतात. यामध्ये जनावर व्यायल्यावर जार न पडणे, जनावर वेळेवर माजावर न येणे, मुका माज, गाय भरल्यावर गाभण न राहणे इत्यादी प्रजनन संस्थेचे विकार जर जनावरांना असले तर पशुपालकांचे खूप आर्थिक नुकसान होते.
जर माहितीनुसार विचार केला तर भारतामध्ये दरवर्षी पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचे नुकसान या व्याधींमुळे होते. तसं पाहायला गेलं तर या व्याधी खनिज पदार्थांची कमतरता, आवश्यक संप्रेरकाचा अभाव अथवा कमतरता किंवा प्रजनन अवयवाची कमी वाढ इत्यादी कारणांमुळे येतात. काही वनौषधींचा या व्याधींवर यशस्वीपणे उपयोग करता येतो. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.
जनावरांमधील प्रजननक्षमता वाढवणाऱ्या उपयुक्त वनौषधी
1- कोरफड- कोरफड आपल्याला सगळ्यांना माहिती असून ही सर्वत्र आढळणारी लंब काटेरी पानाची वनस्पती आहे. ही वनस्पती बलवर्धक असून वेदनाशामक आहे. कोरफडीच्या रसाने सूज कमी होते तसेच सूक्ष्म जंतूंना मारक आहे. कोरफडीचा गर सुकल्यावर ती डिंका सारखी कडक होते. हिचा रंग काळसर असल्यामुळे तिला काळबोळ असे देखील म्हटले जाते. या काळबोळ मध्ये जनावर माजावर येण्यासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती वाढवण्याचे गुण आहेत.
2- अग्नि शिका- ही वनस्पती जनावरांच्या प्रजननक्षम संप्रेरकाच्या स्त्रावासाठी उत्तेजक आहे.
3- गोखरु- ही वनस्पती प्रामुख्याने मूत्र संस्थेवर उपयोग या वनस्पती आहे. या वनस्पतीच्या काटेरी फळांमध्ये भाकड जनावर माजावर येण्यासाठी आवश्यक असलेले इंट्रोजीन या संप्रेरकाची निर्मिती करण्याची क्षमता असते.
4- पुत्र जीवा- या वनस्पतीला हिंदी भाषेमध्ये जिओ पोता या नावाने ओळखतात. या वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असल्याने या वनस्पतीमुळे गर्भ काळात आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती करतात व गर्भाच्या वाढीला सहकार्य करतात.
5- अश्वगंधा- शुक्राणू च्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी औषधी म्हणजे अश्वगंधा होय. या वनस्पतीच्या वापरामुळे वीर्यातील शुक्राणूंची संख्या वाढते.
6- शतावरी- मादी व नर प्रजनन संस्थेच्या विविध रोगांवर शतावरीचा उपयोग केला जातो. शारीरिक दुर्बलता, वीर्यातील शुक्राणूंची संख्या कमी असणे इत्यादी विकारावर शतावरीचा उपयोग होतो.
7- शिलाजित- शुक्राणू ची दुर्बलता, मधुमेह, मूत्रसंस्थेचे विकार इत्यादी रोगांवर ही अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पती होय.
ह्याच्या सेवनामुळे शुक्राणू व वीर्य यामध्ये वाढ होणारे संप्रेरक जनावरास उपलब्ध होऊन त्याचे दुर्बलता कमी होते.
( टीप- कुठलाही औषधोपचार करण्यापूर्वी पशुवैद्यकीय यांचा सल्ला अवश्य घ्यावा )
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:अरे वा! 'या' योजनेअंतर्गत मिळते बिनव्याजी एक लाखांपर्यंत कर्ज, वाचून घ्या सविस्तर माहिती
Published on: 15 May 2022, 09:24 IST