शेळीपालन व्यवसाय म्हणजे कमीत कमी जागेत आणि कमीत कमी खर्चात चांगला नफा देणारा व्यवसाय होय. आपल्याला माहित आहे की, कुठल्याही व्यवसायामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व बारीकसारीक गोष्टींची व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे असते व हीच गोष्ट शेळी पालन व्यवसायाला देखील लागू होते.
शेळीपालन व्यवसाय हा सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरत असून काही गोष्टींची काळजी घेतल्यास शेळीपालन व्यवसाय हा खूप आर्थिक नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरेल यात शंका नाही. या लेखात आपण शेळीपालन व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.
शेळीपालनात यश मिळवायचे तर या गोष्टींवर ठेवा लक्ष
1- तुम्ही जेव्हा शेळीपालन व्यवसायात उतराल तेव्हा कायम तुम्ही शेळ्यांच्या नवीन जातींची माहिती व त्या जातींचा अभ्यास करत रहाणे खूप गरजेचे आहे.
तसेच शेळ्यांच्या बाजारपेठेत कुठल्या शेळ्यांना चांगली मागणी आहे किंवा एकंदरीत स्वरूप काय आहे? याचा सतत अभ्यास करत राहणे व त्यानुसार गोठ्यामध्ये दरवर्षी वेगळ्या जातीचा नर आणून त्यांची पैदास करणे खूप गरजेचे आहे.
2- दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शेळी वेतावर येते तेव्हा शेळीला एक महिना आणि शेळी व्यायल्यानंतर एक महिना गोठ्यामध्ये एक वेगळा कप्पा तयार करावा व
त्या ठिकाणी तिची राहण्याची व्यवस्था करावी. असे केल्याने शेळ्यांचे दूध देण्याची क्षमता वाढते व नवजात करडू आणि शेळी यांच्यामधील जे काही मातृत्वाचे नाते असते ते अधिक घट्ट होते व नवजात पिल्ले सशक्त व निरोगी राहतात.
3- तसेच तुमच्या गोठ्यातील शेळ्यांची महिन्याला एक तारीख निश्चित करून नियमित आरोग्य तपासणी करून घेणे खूप गरजेचे आहे व त्यासोबतच तुमच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शेळ्यांना लसीकरण नियमितपणे करणे खूप महत्त्वाचे ठरते.
4- तुमच्या गोठ्यातील एक महिना वयाच्या करडांना व शेळ्यांना दर तीन महिन्यानंतर जंतनाशक यांचा वापर करून घ्यावा.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध
5- स्वच्छता हा एक खूप महत्त्वपूर्ण भाग असून यावर शेळ्यांचे आरोग्य अवलंबून आहे त्यामुळे शेळ्या राहत असलेल्या गोठ्याची स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे आहे.
6- तसेच तुमच्या गोट फार्म वर होत असलेला खर्च व्यवस्थितपणे एका वहीत नोंदणी करून ठेवावा. त्यासोबतच शेळ्यांचा जन्म आणि मृत्यू तसेच तुम्ही विक्री केलेल्या शेळ्यांची योग्य प्रकारे एका वहीत नोंदणी ठेवावी.
7- तसेच शेळ्यांना तुम्ही ज्या ठिकाणाहून पाणी प्यायला द्याल त्या ठिकाणची जागा स्वच्छ असावी व शेळ्याना पिण्याचा मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा करावा. पाणी साठवण करत असलेल्या टाक्या किंवा हौद नियमितपणे स्वच्छ करून घ्यावे.
8- जर तुम्हाला शेळीपालनामध्ये जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही अर्धा वाटा पद्धतीने शेळ्या सांभाळायला दिल्या तर या पद्धतीतून तुम्हाला खुप काही खर्च न करता उत्पन्न मिळत असते. या पद्धतीने तुम्ही 25 शेळ्या शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन केले तर ते फारच फायद्याचे व जास्त नफा देणारी ठरते.
9- तुमच्या फार्म मध्ये असलेल्या करडांचे वजन 15 किलोच्या पुढे होते अशा करडांना 100 ग्रॅम कडबाकुट्टी तसेच वाळलेला चारा द्यावा.एवढेच नाही तर पुढील प्रत्येक पाच किलो वजनास 50 ग्रॅम या दराने हे प्रमाण वाढवावे. शेळ्याना देण्यात येणाऱ्या चाऱ्यामध्ये जर तुम्ही झाडाचा पाला किंवा कोवळी पाने व शेंगा खायला दिल्या तर शेळ्या आवडीने खातात.
Published on: 16 September 2022, 01:39 IST