Animal Husbandry

पशुपालन व्यवसायामध्ये अधिक नफा हवा असेल तर प्रत्येक बाबतीत आवश्यक व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक शेतकरी बंधूंना करावे लागते. आपल्याला माहित आहेच की, पशुपालन व्यवसायाचा डोलारा हा दूध उत्पादनावर अवलंबून असतो. त्यामुळे वाढीव दूध उत्पादनासाठी जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन तसेच आहार व्यवस्थापन व इतर व्यवस्थापनाकडे खूप काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे असते. या सगळ्या गोष्टींमध्ये जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असून त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होत असतो.

Updated on 17 September, 2022 11:41 AM IST

नक्की वाचा:Goat Rearing: शेतकरी बंधूंनो! घ्याल 'या' गोष्टींची काळजी तर शेळीपालन व्यवसाय गाठेल यशाचे शिखर

या सगळ्या पार्श्वभूमीवर जनावरांना विविध प्रकारचे आजार होत असतात. यामध्ये जर आपण कासदाह या आजाराचा विचार केला तर हा आजाराचा संबंध थेट जनावरांच्या कास किंवा सडाशी असल्यामुळे याचा परिणाम दूध उत्पादनावर देखील होतो.

हा आजार खूप गंभीर असून याच्यावर त्वरित लक्षणे ओळखून उपचार करणे खूप गरजेचे आहे. या लेखात आपण गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने नैसर्गिक उपचाराची शिफारस केली आहे,  त्याविषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:Fodder Management: 'हे'3 प्रकारचे गवत म्हणजे दूध उत्पादनवाढीची हमखास खात्री, वाचा माहिती

कासदाह आजारावरील नैसर्गिक उपचार

1- लागणारे साहित्य-यासाठी तुम्हाला लिंबू, चुना, हळद आणि कोरफड आवश्यक असते. या वस्तू वापरून संबंधित औषध तयार करता येते. यासाठी 250 ग्रॅम कोरफड, 50 ग्रॅम हळद व 15 ग्रॅम चुना एकत्र करावे व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची एक चांगली पेस्ट तयार करावी.

यातील एका मूठभर पेस्टमध्ये 150 ते 200 मिलि पाणी घालावे व त्याचे एक पातळ मिश्रण तयार करून घ्यावे. त्यानंतर जनावराचा सड किंवा कास स्वच्छ पाण्याने धुऊन स्वच्छ करावी व ते तयार केलेले मिश्रण पूर्ण कासेवर म्हणजेच सडावर लावून घ्यावे व हे मिश्रण दिवसातून दहा वेळा सलग पाच दिवस लावावे.

एवढेच नाहीतर दोन लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारावे. बऱ्याचदा कासदाह झालेल्या जनावरांच्या दुधामध्ये लालसरपणा किंवा रक्त येते. असे होत असेल तर वरील उल्लेख केलेल्या मिश्रणामध्ये दोन मूठ कढीपत्ता व गूळ यांची पेस्ट दिवसातून दोन वेळा जनावरांना चारावी.

नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो वासरांची वाढ 'या' कारणाने खुंटते; घ्या अशी काळजी

English Summary: this is home remedy is useful in kassdaah disease in cow and buffalo
Published on: 17 September 2022, 11:41 IST