कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर तसेच कोंबड्यांनाशुद्ध हवेची कमतरता, समतोल आहाराची कमतरता इत्यादींमुळे कोंबड्यांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.या रोगांवर वेळीच उपाययोजना केली नाही तर कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मरतुक होऊन आर्थिक नुकसान सोसावे लागते.
या लेखामध्ये आपण कोंबड्यान वरील काही नुकसानदायक आजार त्यांची माहिती व लक्षणे तसेच करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेऊ.
कोंबड्यान वरील विविध आजार
राणीखेत
राणीखेत हा कोंबड्या वरील प्रमुख आजार असून या रोगाचा प्रादुर्भाव कोंबड्यांवर झाला तर मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची मर होऊ शकते.जवळ जवळ शंभर टक्के कोंबड्या मारतात.
राणीखेत ची लक्षणे
लहान कोंबड्यांमध्ये घरघर लागते, श्वास घेण्यास त्रास होतो, थरथरणे, अडखळणे, पाय व पंख टोकाशी लुळे पडणे, वेड्यावाकड्या हालचाली इत्यादी लक्षणे दिसतात. तसेच मोठ्या कोंबड्यांमध्ये अवघड श्वासोश्वास,भूक मंदावणे, ताप येणे तसेच पांढरी पातळ आगमन,मान वाकडी होते, अंडी उत्पादनात घट तसेच पातळ कवचाची व निकृष्ट दर्जाचे अंडी त्याची लक्षणे दिसतात.
राणीखेत आजारावर उपचार
राणीखेत आजारावर कुठलाच उपचार नाही परंतु हा रोग होऊ नये यासाठी पिल्ले पाच ते सात दिवसांचे असताना लासोटा हीलस नाकात किंवा डोळ्यात एक थेंब या प्रमाणात द्यावी. तसेच आठवी आठवड्यात व अठराव्या आठवड्यात आर 2 बो (0.5 मिली) कातडीखाली द्यावी.
रक्ती हगवण
हा रोग कॉक्सिडीया या रक्तातील परजिवापासून होतो.विष्टा मध्ये रक्त दिसते. विस्टा लालसर पातळ असते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कोंबड्याचा तुरा कोमेजते, कोंबड्या पेंगतात खाणे कमी होते,अंडी उत्पादन कमी होते, अशक्तपणा आढळतो तसेच कोंबड्यांची मर ही मोठ्या प्रमाणात होते. हा रोग पूर्णपणे नियंत्रित करता येतो.
देवी
हा रोग विषाणू पासून होतो. या रोगाची लागण झाल्यास कोंबड्याचा तुरा व डोळे मलूल होतात. पायावर पिसे नसलेल्या भागावर पिवळे फोड येतात. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी फोडांवर खपली धरते व ती पडते. या खपली तून विषाणूंचा प्रसार होतो. या रोगाची लागण झाल्यावर भूक मंदावते तसेच नाकातून द्रव्यपदार्थ वाहतो. तोंडात चिकट पदार्थ तयार होतो त्यामुळे कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरतात.
उपचार
या रोगाची लागण होऊ नये म्हणून सहाव्या व 16 व्या आठवड्यात देवी रोग प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.हा रोग झाल्यास फोड आलेली जागा पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुऊन घ्यावी..
मरेक्स
हा रोग विषाणूमुळे होतो. कोंबड्यांचे पाय लुळे पडतात. कोंबडी खाद्य खाऊ न शकल्याने कोंबड्या मरतात. हा आजार बहुतांशी लहान पिल्लांना होतो व त्यामुळे सात ते दहा आठवडे वयोगटातील पिले मरतात. मोठ्या कोंबड्यांमध्ये हा रोग पाचव्या ते सहाव्या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे कोंबड्यांचे पाय, पंख, मान लुळी पडते. वजन, श्वास घेण्यास त्रास होतो.पिसांच्या मुळाशी सूज दिसून येते. या रोगावर देखील उपाय नाही म्हणून प्रतिबंधक उपाय म्हणून पिल्ले एक दिवसाच्या असताना मरेक्स ही लस द्यावी.
गंबोरो
हा रोग विषाणूमुळे होतो. कोंबड्या पेंगतात आणि अडखडत चालतात तसेच पांढरी आगमन होते व गुद्दार जवळची पिसे विष्टेमुळे घाण होतात.
Published on: 03 January 2022, 05:47 IST