शेळीपालनाचे उत्पन्न आहे कळपामध्ये जन्माला येणाऱ्या करडावर अवलंबून असते. शेळी गाभण राहून दोन वर्षाला तीन वेळेस व्यायली पाहिजे. शेळीपालनामध्ये गाभण शेळी चे आरोग्य व तिच्या व्यवस्थापन याला खूप महत्त्व आहे. या लेखात आपण गाभण शेळ्यांच्या व्यवस्थापना विषयी माहिती घेऊ.
सगळ्यात महत्त्वाचे गाभण शेळ्यांचे आहार व्यवस्थापन
- चांगल्या वजनाचे सशक्त करडू जन्माला यावे यासाठी गाभण काळामध्ये योग्य व्यवस्थापन करावे.
- शेळ्यांना वाळलेला,ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे.
- सहज पचणारा योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे.
- गाभण काळातील शेवटचे किमान एक महिना विण्याच्या अगोदर समतोल आहाराचा पुरवठा करावा. गोठ्यातच फिरण्याची सोय असणे गरजेचे आहे.
- गाभण काळात शेवटच्या तीन ते चार आठवड्यामध्ये गर्भाशयातील पिल्लांचा उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्यावर दररोज 250 ते 350 ग्रॅम खुराक द्यावा.
- स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. थंड आणि पावसाचे पाणी देऊ नये त्यामुळे शेळी सर्दी सारखे आजाराला बळी पडतात.
- पावसाळ्यामध्ये गाभण शेळ्यांना सुका चारा द्यावा.
गाबन शेळ्यांचे गोठा व्यवस्थापन
- गोठ्यामध्ये गाबन शेळ्यांना वेगळे जागेत ठेवावे.
- पावसापासून तसेच आद्रता युक्त हवे पासून बचाव करण्यासाठी गाभणशेळ्यांचा गोठ्यात ऊबदार वातावरण राहावे म्हणून दोन ते चार उंचीपर्यंत 100 ते 200 पावरचे बल्ब लावावेत.
- रात्रीच्यावेळी गोठ्यामध्ये वाळलेले गवत, उसाचे पाचट अंथरावे. जेणेकरून जमिनीतील गारवा व ओलसरपणा याचा गाभण शेळ्यांना त्रास होणार नाही.
- मलमूत्र मुळे ओलसर झालेल्या जागेवर आठवड्यातून एक दोन वेळा चुन्याची भुकटी टाकावी. त्यामुळे गोठ्यात असलेली जिवाणू, विषाणू यांचा प्रादुर्भाव गाबन शेळ्यांवर कमी होतो.
शेळ्या गाभण राहण्याची लक्षणे
- गाबन राहिलेली शेळी पुढील 21 दिवसात परत माजावर येत नाही.
- तीन महिन्यानंतर शेळीचे पोट वाढू लागते तसे शेळीचे वजन वाढलेले दिसून येते.
- गाभण राहिल्यानंतर शेळीची त्वचा तजेलदार होते.
- शेवटच्या गाभण काळात शेळीचा खास दुधाने भरलेला दिसून येतो.
English Summary: this is first step of sucsess in goat rearing is precaution of goat in pregnancy period
Published on: 08 March 2022, 02:23 IST
Published on: 08 March 2022, 02:23 IST