Animal Husbandry

पशुपालन व्यवसाय म्हटले म्हणजे या माध्यमातून मिळणारे दुधाचे उत्पादन हा एक प्रमुख व आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अनेक शेतकरी म्हैस पालन आणि गाईंचे पालन करतात. जर आपण वाढीव उत्पादनाचा विचार केला तर गोठ्यामधील गाईची जात ही जातिवंत असणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध व्यवसायासाठी गाईंची निवड करताना खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.

Updated on 09 October, 2022 10:26 AM IST

पशुपालन व्यवसाय म्हटले म्हणजे या माध्यमातून मिळणारे दुधाचे उत्पादन हा एक प्रमुख व आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अनेक शेतकरी म्हैस पालन आणि गाईंचे पालन  करतात. जर आपण वाढीव उत्पादनाचा विचार केला तर गोठ्यामधील गाईची जात ही जातिवंत असणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध व्यवसायासाठी गाईंची निवड करताना खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.

जर आपण गाईंचा विचार केला तर अनेक प्रकारच्या संकरित गाईंचे पालन केले जाते. परंतु यामध्ये अनेक देशी गाई अशा आहेत ज्या संकरित गाईंना देखील तोडीस तोड आहेत

. त्यामुळे देशी गाईंचे पालन देखील खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते. म्हणून आपण या लेखांमध्ये एक अशाच देशी गाईच्या महत्त्वपूर्ण जातीविषयी माहिती घेणार आहोत.जी शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देऊ शकते.

नक्की वाचा:'लम्पी स्कीन'ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये बदल; मिळणार इतकी रक्कम

 लाल कंधारी गाय ठरेल पशुपालकांसाठी वरदान

 जर आपण गाईच्या जातींचा विचार केला तर यामध्ये लाल कंधारी ही जात खूप महत्त्वपूर्ण असून ही देशी गाईची जात आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणात लाल कंधारी गाईचे पालन केले जाते. विशेष म्हणजे ही गाय महाराष्ट्रातील असल्यामुळे तिला आपल्याकडे हवामान अधिक मानवते असे देखील म्हटले जाते.

त्यामुळे पशुपालक लाल कंधारीचे पालन अगदी सहजरीत्या  करू शकतात. जर या गाईचा विचार केला तर ही गाय महाराष्ट्रातील कंधार तालुक्यात अधिक आढळत असल्यामुळे या जातीला लालकंधारी असे म्हटले जाते. तसे पाहायला गेले तर या गाईची किंमत ही गाईचे आरोग्य आणि दूध उत्पादन यावर अवलंबून असते.

नक्की वाचा:जनावरांचे दूध वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी विकसित केला सर्वोत्तम आहार; 100 टक्के दूध उत्पादनात होणार वाढ

परंतु या क्षेत्रातील तज्ञ सांगतात की या गायीची किंमत 40 ते 50 हजारांच्या आसपास असते. लाल कंधारी गाईचे संगोपन कमी खर्चात केले जाऊ शकते तसेच मिळणारे दूध उत्पादन हे जास्त मिळत असल्याने लाल कंधारीचे संगोपन शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरते. हे गडद तपकिरी तसेच गडद लाल रंगाची असतात व कान लांब असतात.

या क्षेत्रातील जाणकारांच्या मते ही गाय वर्षातील 235 ते 275 दिवस दूध देते. तसेच लाल कंधारी गायीचा भाकड काळ हा 130 ते एकशे नव्वद दिवस असू शकतो. लाल कंधारी जातीच्या गाई या पंचेचाळीस महिन्यात पहिल्यांदा प्रजननास तयार होतात.

नक्की वाचा:Important: दुग्ध व्यवसायात अधिक फॅट आणि अधिक दूध उत्पादन हवे असेल तर पाळा 'या' जातीची म्हैस

English Summary: this is deshi cow veriety is give more milk production to farmer
Published on: 09 October 2022, 10:26 IST