Animal Husbandry

कधी कधी काही घटना अशा घडतात की या घटना पाहून किंवा ऐकून खूप आश्चर्यचकित व्हायला होते. अगदी यामध्ये विश्वासच बसत नाही अशा काही तरी घटना घडतात. परंतु निसर्गाचा एक नियम आहे की कुठलीही घटना घडण्यामागे काहीतरी एक कारण असते.

Updated on 14 May, 2022 11:09 AM IST

कधी कधी काही घटना अशा घडतात की या घटना पाहून किंवा ऐकून खूप आश्चर्यचकित व्हायला होते. अगदी यामध्ये विश्वासच बसत नाही अशा काही तरी घटना घडतात. परंतु निसर्गाचा एक नियम आहे की कुठलीही घटना घडण्यामागे काहीतरी एक कारण असते.

हे तेवढेच खरे असते. कारण कुठल्याही कारणावाचून कुठलीही घटना घडणे शक्यच नाही. यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू देत किंवा  नैसर्गिक परंतु कारण हे असतेच. आतापशुपालन व्यवसायामध्ये गाय किंवा म्हशीचे दूध काढणे एवढे सोपे काम नाही.यासाठी आता बरेच शेतकरी मिल्किंग मशिनचा वापर करतात. परंतु हाताने दूध न काढता किंवा मिल्किंग मशिनचा वापर(Use Of Milking Machine)करताना एखादी गाय दूध देत असेल तर? ऐकायला ही अशक्य वाटणारी गोष्ट आहे.

परंतु अशीच एक घटना समोर आली आहे. सध्या अशाच एका गाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडिओ  जोरदार व्हायरल होत आहे. या गाईचे दूध काढण्यासाठी हाताची किंवा मिल्किंग मशीन ची गरज नाही. या लेखामध्ये आपण या अजब घटने बद्दल माहिती घेऊ.

 हाताचा किंवा मिल्किंग मशिनचा वापर करता गाय देते दूध

 सध्या सोशल मीडियावर एक गाईचा व्हिडिओ व्हायरल होत असून या गाईचे दूध(Milk Of Cow)काढण्यासाठी हात किंवा मिल्किंग मशीन ची गरज नाही.

अगदी गायीच्या सडाखाली दुधाचे भांडे धरली की ही गाय मनानेच दुध दयायला सुरुवात करते. ही गाय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील संवत्सर या गावातील आहे. या गावातील मगन किसन भारुड या शेतकऱ्यांनी सहा महिन्यापूर्वी ही जर्सी गाय खरेदी केली होती. साधारण मागच्या एक महिन्यापूर्वी ती व्यायली व तिला एक वासरू झाले. तेव्हापासून या गाईचे दूध काढण्यासाठी सडाला हात लावण्याची गरज भासत नाही. हा प्रकार पाहून गाई चे मालक मगन भारुड हेदेखील आचार्य चकित झाले होते. तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील हा एक चमत्कार वाटत होता. संपूर्ण गावात आणि परिसरात या गाईचे चर्चा होऊ लागली. खरं पाहायला गेलं तर या प्रसंगातून गाय आणि वासरू यांच्यातील असलेलं प्रेम सिद्ध होते. जसं आईचा मुलगा जेव्हा रडतो तेव्हा आईला जसा पान्हा फुटतो तसंच काहीसं या गायीच्या बाबतीत होत असावे.

 याबाबतीत पशु वैद्यकीय अधिकार्यांचे मत(Opinion Of Doctor)

 हे गाय मनाने दूध देण्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप दहे यांनी माहिती देताना म्हटले की, गाईने वासराला जन्म दिल्यानंतर लूज मिल्कर असल्याने असे प्रकार होऊ शकतात.

त्यामुळे हा चमत्कार वगैरे काही नसून यात आश्चर्य वाटण्यासारखे किंवा घाबरून जाण्यासारखे देखील काही कारण नाही.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:शेतकऱ्यांचा रास्त प्रश्न! कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो 15 ते 18 रुपये असताना शेतकरी 10 ते 12 रुपये प्रति किलोने कांदा का विकणार?

नक्की वाचा:Pm Shramyogi Maandhan: सरकारकडून प्रति महिना मिळते 3,000 रुपये पेन्शन, वाचा सविस्तर या योजनेबद्दल

नक्की वाचा:Cumin Farming: जिऱ्याच्या शेतीतून होऊ शकते चांगली कमाई, जाणून घेऊ जिऱ्याच्या शेतीबद्दल थोडक्यात माहिती

English Summary: this is amazing incident about miking of cow in ahmednager district sawantsar village
Published on: 14 May 2022, 11:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)