शेतकरी आणि बैल ते कधीही न तुटणारे अतूट नाते आहे. शेतीमध्ये कितीही प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी आजही दारापुढे बैल जोडी दिसतेस. एकेकाळी बैलान शिवाय शेती करणे अशक्य होते.आजही बहुतांश प्रमाणातशेतीकामासाठी बैलांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो.
.परंतु महागाईच्या काळात बैलांचे भाव खूप प्रमाणात वाढले आहेत. अशावेळी बैल खरेदी करताना तो चांगला आहे हे कसे ओळखावे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.या लेखात आपण बैल खरेदी करताना तो चांगला आहे हे कसे ओळखावे?याबद्दल माहिती घेणार आहोत.
बैल चांगला आहे हे कसे ओळखावे?
- सगळ्यात आगोदर बैल खरेदी करतानात्याचे कान,नाक,दात, डोळे आणि खूरया प्राथमिक गोष्टी तपासाव्या.त्यासोबतच बैलाची त्वचा,त्याची पाठ,कांदा व शेपूट इत्यादी गोष्टी तपासून घ्यावेत.
- बैल घेताना त्याची शेपटी पाहून घ्यावी.शेपटी ही सरळ असावी ती मध्ये वाकलेली नसावी.
- बैलाची काम करण्याची क्षमता त्याच्या वजनावर अवलंबून असते. तसेच स्नायूंची वाढ कशी झाली यावर ते अवलंबून असतं. बैलांना दररोज संथ आणि सतत दहा तास काम करावे लागत असेल तर बैलाची ओढण्याची ताकद त्याच्या शरीराच्या वजनाच्या 1/8 आणि 1/10असावी.याचा अर्थ बैलाचे वजन 300 किलो असेल तर त्याची ओढण्याची ताकद 30 किलो असते. बऱ्याच वेळा बैल स्वतःच्या वजनाइतके ताकत तिचे वजन ओढू शकतात.
- बैलाच्या ताकती सोबतच बैलाचा देखणेपणा ही महत्वाचा आहे. यामध्ये त्याची शिंगयांना फार महत्त्व आहे. बैल खरेदी करताना शेतकऱ्यांनी सिंग बघून घ्यावीत. बैलाची दोन्ही शिंगे एकसारखी असावी.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बैलाचा खांदा पाहणे हे होय.नांगर ओढणे असो वा बैलगाडीओढणे असोहे सगळे काम बैलाच्या खांद्यावर अवलंबून असतात.बैलाच्या खांद्यावर कुठल्याही प्रकारचे तडे आणि गाठ आलेली नसावी. खांद्याची कातडी शेतकऱ्यांनी तपासून घ्यावी तसेच खांद्यावर सूज नाही ना याची खात्री करणे गरजेचे आहे.
- या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर बैलाची चाल ही महत्त्वाचे आहे. बैल खरेदी करताना त्याला चालवून बघावे. बैल चालताना त्याचा पाय सरळ पडला पाहिजे. बऱ्याचदा पहिले त्याचा उजवा पाय डावीकडे आणि डावा पाय टाकत चालतो.
- अशा वेळी समजावे की बैला मध्ये काहीतरी दोष आहे. बैलाच्या मागच्या पायाला वात असण्याची शक्यता असते. वाताची पाहणी करणे तसे कठीण आहे पण शंका आल्यास बैलाला सकाळी चालून बघावे. सकाळी चालताना वातझालेला बैल पायाला झटका देऊन चालतो.
- बऱ्याचदा गाय,म्हैस,बैल यांच्या नाकपुड्या नेहमी ओल्या दिसतात.त्यांच्या नाकावर नेहमी पाण्याचे थेंब साचलेली दिसतात. खरं म्हणजे जनावरांचे ओले नाकत्यांच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
- बैल हा काटक प्राणी असल्यामुळे अगदी खडकाळ माळरानात ही बैलगाडी सोडतो कारण त्यामागे त्यांची खूर महत्त्वाचे असते. जर बैलाची खूर निरोगी नसेल तर बैल लंगडायलालागतो.त्या चालीवर परिणाम होतो व त्याचा परिणाम कामावर ही दिसून येतो.त्यामुळे खूर पाहून घेणे महत्त्वाचे आहे.
Published on: 18 October 2021, 11:57 IST