बायबल च्या काळापासून भटकंतीत शेळी मानवाशी निगडित आहे. शेळी हा प्राणी मुख्यत: दूध, मटण आणि लोकर याकरिता सर्वत्र परिचित आहे. इस्राईल मध्ये सुद्धा खूप पूर्वीपासून शेळी पालन केले जात आहे
येथील विशेष बाब म्हणजे ज्या पशु पालकाकडे व शेतकऱ्याकडे शेळी अथवा मेंढी यांचा मोठा कळप आहे त्यांना समाजात आर्थिक दृष्ट्या प्रबळ व धनवान समजले जायचे, इजराइल मध्ये आजही शेळी व मेंढी पालन केले जाते यात दुग्ध युक्त प्रक्रिया याकडे विशेष लक्ष दिले जाते.
आजच्या घडीला पाहिला तर इस्राईलला शेळीपालन यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होते येथील शेळीपालनाच्या यशाचं गमक म्हणजे दुधावर प्रक्रिया व दूधप्रक्रिया युक्त पदार्थ यांची गुणवत्ता यांनाविपणनच्यादृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. यात गुणवत्तेस विशेष प्राधान्य आहे. तंत्रज्ञान विकास आणि त्याचा वापर बाजारपेठेतील मागणी व पुरवठा या दोनी मध्ये इस्राईल जगातील सर्व देशांसाठी एक जागतिक स्पर्धक आहे.
इस्राईल शेळी मधील वार्षिक दूध उत्पादन 11.1 कोटी लिटर इतकी आहे जवळपास 2400 कुटुंब हे शेळी अथवा मेंढी पालन करत आहेत. देशातील शेळी व मेंढ्या यांची संख्या पाहता ती पाच लाख 20 हजार इतकी आहे. यातील बरेच पशुपालक शेतकरी शेळी व मेंढी यांच्या दुधावर स्वतःकडेच प्रक्रिया करतात. इस्राईल मधील शेळी पालन आणि कृषी पर्यटन यांची उत्तम सांगड आहे.
शेळीपालनासाठी शेतकरी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करतात. देशाच्या उत्तर भागातील शेतकरी व्यापक शक्ती पद्धतीचा अवलंब करतात यात शेळ्यांचा मोठा कळप असतो आणि त्यांचे संगोपन पारंपारिक पद्धतीने केले जाते त्यामध्ये यांत्रिकीकरण व आधुनिक तंत्र यांचा इतकासासमावेश नसतो अशाप्रकारे जवळजवळ वीस हजार शेळ्यांचेसंगोपन केले जाते शेळी पालनाचे दुसरी पद्धत बंदिस्त शेळीपालन यात शास्त्रशुद्ध पद्धतीने शेळ्यांचे संगोपन केले जाते.
आहारातील प्रत्येक घटकांवर विशेष भर देऊन आधुनिक तंत्र व यांत्रिकीकरणाचा वापर या पद्धतीने जवळ-जवळ तीस हजार शेळ्यांचे संगोपन केले जात आहे.शेळी पालनाचे तिसरी आणि वरील दोन्ही पद्धतीचा सुवर्ण मध्य असलेली पद्धत म्हणजे अर्ध बंदिस्त शेळीपालन यात दोन्ही पद्धतीतले तंत्र वापरले जाते यात 40 हजार शेळ्यांचे संगोपन केले जाते तंत्रज्ञानाच्या अफलातून प्रगतीमुळे शेळीपालनाच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे, बंदिस्त शेळीपालन याचा विचार करता दूध काढण्यासाठी अद्यावत प्रणालीचा वापर आणि सर्व शेळ्यांची इत्यंभूत माहिती संगणक प्रणालीचा उपयोग करून भविष्यातील वापरासाठी संचयित केली जाते यांचा फायदा शेळ्यांचे व्यवस्थापन व बाजारपेठ यासाठी होतो.संतुलितआहार याची निर्मिती व पुरवठा मोठमोठ्या खाद्यनिर्मिती केंद्रांवरून दररोज शेतकऱ्यांच्या बंदिस्तशेळीपालन करणाऱ्या गोठयांवर केला जातो.
शेळीपालन हा इस्राईलमधील अत्यंत स्पर्धात्मक आणि उच्चतम गुणवत्तेचा अबाधित ठेवलेला व्यवसाय आहे.शेतकऱ्यांनी स्वच्छ व गुणवत्ता पूर्ण आणि दूध उत्पादनात वाढ व्हावी यासाठी इस्राईल कृषी मंत्रालयाकडून संशोधन आणि विकास विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात.इस्राईली दुग्ध महामंडळाने शेळीच्या दुधासाठी दुधातील घटक यात फॅट 3.76% इतकी तर प्रथिने 3.37% इतकी असावी असे निर्धारित केले आहे.
Published on: 10 February 2022, 01:34 IST