डोंगराळ आणि दुष्काळी भागात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. शेळीपालनाला फार कमी खर्च येत असतो. दोन तीन व्यक्तीही शेळीपालनाचा व्यवसाय करु शकतात. असा मोठा नफा देणाऱ्या शेळ्यांची देशभरात ७५ जाती आहेत. यातील मोजक्याच जाती आहेत ज्या आपल्याला अधिक उत्पन्न देतात. त्याच जातीच्या शेळ्यांविषयी आपण माहिती घेणार आहोत.
(Jamunapari Goat) जमुनापारी शेळी
है, या जातीच्या शेळ्या इटावा, मथूरा येथे आढळते. दूध, मांससाठी य़ा शेळ्या प्रसिद्ध आहेत. शेळ्यांमधून ही सर्वात चांगली जात मानली जाते. ह्या शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. त्याच्या शरिरावर भुरक्या रंगाचे ठिपके असतात. या शेळ्यांची शिंगे ही ८ ते ९ सेंटीमीटर असतात. तर ह्याची कान पण लांब असतात. या शेळ्या २ ते अडीच लिटर दुध प्रतिदिवस देतात.
(Barbari Goat) बरबरी शेळी - या शेळ्या आग्रा, एटा, अलीगढ मध्ये आढळतात. या शेळ्याची मांससाठी अधिक मागणी असते. या शेळ्या आकाराने लहान असतात. शिवाय या रंगाने वेगवेगळ्या असतात. या शेळ्याचे कान नळीप्रमाणे वळलेले असतात. या जातीच्या शेळ्यांमध्ये बऱ्याच शेळ्यांचा रंग हा पांढरा असतो. भुरक्या रंगाचे ठिपके त्याच्या शरीरावर असतात.
(Beetel Goat) बीटल शेळी - पंजाब मध्ये या शेळ्या अधिक प्रमाणात आढळत असतात. दूधासाठी या शेळ्या उपयोगी आहेत. यांचा रंग काळा असतो, त्यांच्या शरीरावर पांढऱ्या किंवा भुरक्या रंगाचे ठिपके असतात. या शेळ्याच्या अंगावरील केस हे छोट्या आकाराची असतात. तर यांचे कान लांब असतात खाली झुकलेले असतात.
(Kutch Goat) कच्छ शेळी - या शेळ्या गुजरातमध्ये आढळतात. या शेळ्याही दूध अधिक देत असतात, यामुळे त्यांची मागणी असते. या शेळ्यांचा आकार मोठा असतो, तर अंगावरील केस लांब आणि नाक उंच असते. या शेळ्यांचे शिंग मोठे आणि अणकुचीदार असतात.
(Gaddi Goat) गद्दी शेळी- ही हिमाचल प्रदेशात आढळणारी शेळी असून पश्मीनासाठी या शेळ्या पाळल्या जातात. या शेळ्याचे कान ८.१० सेंटीमीटर लांब असतात. या शेळ्यांचे शिंग अणकुचीदार असतात. हिमाचल प्रदेशातील कुल्लू घाटीत वाहतूकीसाठी या शेळ्यांचा उपयोग होतो.
Published on: 28 April 2020, 05:25 IST