Animal Husbandry

कुठलाही ऋतू म्हटला म्हणजे त्याचा ऋतु चे परिणाम जनावरांच्या आरोग्यावर पडताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूत जनावरांची योग्य काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते कारण थंडीच्या वाढत्या प्रमाणामुळे जनावरांमध्ये निमोनिया, लाळ्या खुरकूत तसेच अतिसार यासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो.

Updated on 25 January, 2022 5:30 PM IST

 कुठलाही ऋतू म्हटला म्हणजे त्याचा ऋतु चे परिणाम जनावरांच्या आरोग्यावर पडताना दिसतात. त्यामुळे प्रत्येक ऋतूत जनावरांची योग्य काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे असते कारण थंडीच्या वाढत्या प्रमाणामुळे जनावरांमध्ये निमोनिया, लाळ्या खुरकूत तसेच अतिसार यासारख्या जीवघेण्या आजाराचा धोका संभवतो

त्यासाठी जनावरांचे थंडीपासून रक्षण करणे महत्त्वाचे असते. म्हणून वेगवेगळ्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागणार आहे. हिवाळ्यामध्ये जनावरांच्या आहारावर विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे. या लेखात आपण थंडीमध्ये जनावरांची काळजी कशी घ्यावी? याबद्दल माहिती घेऊ.

 थंडी मध्ये संतुलित आहारावर भर द्यावा….

 पावसाळ्यामध्ये तसेच हिवाळ्यात जनावरांची योग्य ती काळजी घ्यावीच लागते. त्यामुळे थंडीला सुरुवात होताच जनावरांना मोकळ्या जागेत नबांधता गोठ्यात बांधायला हवे. तशी व्यवस्था नाही करता आली तर कमीत कमी जनावरांच्या अंगावर ऊबदार ब्लॅंकेट, किंवा पोते टाकायला पाहिजे.

खाली जर फरशी असेल तर रात्रीच्या वेळी त्या फरशीवर गवत टाकणेगरजेचे आहे जेणेकरून उबदारपणा टिकून राहील त्यासोबतच संतुलित आहार देणे अत्यंत गरजेचे आहे जेणेकरून जनावरांना ऊर्जा मिळू शकेल.शरीर जितके तंदुरुस्त असेल तितकी जनावरांना थंडी कमी वाटते. त्यासोबतच जनावरांचे प्रतिकारशक्तीही वाढते आणि रोगाची लढण्याची क्षमता विकसित होत असते.

 हिवाळ्यात लसीकरण वेळेवर करणे आवश्यक……

जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, खनिज मिश्रण यासारख्या गोष्टींचा समावेश असायला हवा. पशुवैद्यक संतुलित आहार तसंच तेल पाजण्याची शिफारस करतात. तथापि आपण फक्त अधिक दुधाळप्राण्यांना तेलदेऊ शकतात. लाळ्या खुरकूत आलेल्या जनावरांना तेल देणे हे धोक्याचे आहे. 

त्यामुळे इतर आजारांमध्ये वाढ होऊ शकते. त्यासाठी वेळेवर लस देणे हा चांगला पर्याय आहे. जनावरांना होणारा न्युमोनिया टाळण्यासाठी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करणे आज एकमेव पर्याय आहे. दिवसभर ऊन आणि सकाळ संध्याकाळ थंड वातावरण असेल तर मग अशा वेळी त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. अतिसार यासाठी जनावरांना बतिसा पावडर ही जनावरांच्या खाद्यामध्ये दिली तरी चालणार आहे त्यामुळे त्यांचे पचन संस्था मजबूत राहते.

English Summary: this five disease attack on animal in winter session take precaution and management
Published on: 25 January 2022, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)