Animal Husbandry

जर पंजाब राज्यातील पशुपालनाचा विचार केला तर गाई पालना मध्ये जास्तकरून होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी गाईंचा अंतर्भाव दिसतो तर म्हशीमध्ये मुऱ्हा व निली रावी या जाती पाहायला मिळतात. पंजाब शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पशुपालन व्यवसाय मध्ये झोकून देऊन व आवडीने काम करतात.

Updated on 03 March, 2022 1:52 PM IST

जर पंजाब राज्यातील पशुपालनाचा विचार केला तर गाई पालना मध्ये जास्तकरून होल्स्टिन फ्रिजीयन, जर्सी गाईंचा अंतर्भाव दिसतो तर म्हशीमध्ये मुऱ्हा व निली रावी  या जाती पाहायला मिळतात. पंजाब शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पशुपालन व्यवसाय मध्ये झोकून देऊन व आवडीने काम करतात.

त्यामुळे त्यांनी या व्यवसायामध्ये खूपच प्रगती साधली आहे. या लेखामध्ये आपण पंजाब मधील पशुपालक कोणत्या प्रकारचे नियोजन आणि सूत्र वापरतात जेणेकरून त्यांचा व्यवसाय फायद्याचा होतो, हे जाणून घेऊ.

 पंजाब मधील पशुपालकांचे दुग्ध व्यवसायातील महत्त्वाची सूत्रे

  • उत्तम चाऱ्याची निर्मिती- जर पंजाब मधील शेतकऱ्यांचा विचार केला तर ते युरोपमध्ये उपलब्ध असणाऱ्या पौष्टिक रायग्रासचीलागवड करतात. जर या चाऱ्याचा विचार केला तर यामध्ये 16 टक्के प्रथिने असल्यामुळे दूध उत्पादन वाढीला मदत होते. पंजाब मध्ये चांगल्या प्रतीचे लसूणघास चे बियाणे देखील उपलब्ध होते. यामध्ये 21 टक्के प्रथिने असतात.
  • मुरघास निर्मिती यंत्रणा- वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी मुरघासाच्या स्वरूपात साठवणूक करण्यासाठी ट्रॅक्‍टरचलित सायलेज बेलिंग यंत्र पंजाब मधील शेतकरी वापरतात. वर्षभर पुरेल इतका मुरघास तयार करून ठेवतात. या यंत्रणेमुळे मुरघास निर्मिती केल्याने कार्यामधील पोषणमूल्ये वाढीस मदत होते.
  • टोटल मिक्स राशन वॅगन- टोटल मिक्स राशन म्हणजे गाई, मशीन व इतर जनावरांना हिरवा कोरडा चारा,सायलेज,खाद्य, भरडा,चुनीपेंड, बायपास फॅट,मिनरलप्रीमिक्स इत्यादी घटक एकत्र एकजीव करून खायला दिले जातात. या प्रकारामध्ये सर्व पोषक घटक वेगवेगळे न देता एकत्र करून दिले जातात.टोटल मिक्स राशन हे गाई, म्हशी तसेच शेळी व मेंढी तसेच इतर रवंथ करणाऱ्या जनावरांना ही खाऊ घालता येते. यामुळे गाई व म्हशीचेपचनशक्ती सुधारते, कोठीपोटाचा सामू सुधारून आम्लता कमी होण्यास मदत होते. पशुखाद्य किंवा आंबोण किंवा चारा हे घटक संपूर्ण मिसळून दिल्यामुळे कोठी पोटातील पचन करणाऱ्या जिवाणूंना सर्व प्रकारची पोषणतत्वे उपलब्ध होतात.
  • बीटा कॅरोटीन, गाभण जनावर ओळखणारी यंत्रणा- जनावरांच्या रक्तामध्ये असलेले बीटा कॅरोटीन ची कमतरता ओळखणारी उपकरण पशुपालकांकडे उपलब्ध झाली आहे. यासोबतच प्रेग्नेंसी टेस्ट किट ज्यामध्ये केवळ 28 दिवसांची गाभण गाय किंवा म्हैस ओळखणे शक्य होते.अशा यंत्रणेचा आता गोठ्यात आवश्यकता आहे.
  • गाई आणि म्हशीसाठी ग्रूमिंग ब्रश- दुभत्या जनावरांच्या शरीरातील रक्ताभिसरण जितके चांगले तितके दूध उत्पादन वाढण्यास मदत होते. यासाठी स्वयंचलित ग्रूमिंग ब्रश गोठ्यात लावल्यास गाई व म्हशी ओळीने  आपले अंग या ग्रूमिंग  ब्रशच्या साह्याने खरारा करतात.
  • हवा खेळती राहण्यासाठी वायुविजन यंत्रणा-उन्हाळ्यामध्ये जनावरांना तापमान वाढीचा त्रास संभवतो. त्याचा दूध उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे गोठ्यामध्ये जर पंखे लावले तर हवा खेळती राहण्यास मदत होते. गोठ्यामध्ये जर एका बाजूने हवा सोडून दुसऱ्या बाजूने हवेचा वेग नियंत्रित करून बाहेर सोडल्यास आतील दूषित हवा बाहेर जाऊन नवीन ताजी हवा आत येण्यास मदत होते. यासाठी विविध क्षमतेचे पंचे उपलब्ध झाले आहे.
English Summary: this crucial technique of punjaab farmer for animal husbundry that growth milk production
Published on: 03 March 2022, 01:52 IST