भारतात मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते राज्यात देखील दिवसेंदिवस पशुपालक शेतकऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे अनेक पशुपालक शेतकरी पशुपालन करण्यासाठी गाईं-म्हशीची खरेदी विक्री करत असतात. पशूची खरेदी-विक्री करण्यासाठी पशुपालक शेतकरी बाजारात भेट देत असतात. मात्र आता बाजारात जाऊन पशूची खरेदी विक्री करण्याचे काही कारणच उरले नाही आपण आता पशूची खरेदी विक्री आपल्या घरातूनच घरबसल्या करू शकता. हो बरोबर ऐकत आहात तुम्ही आता ऑनलाईन घरबसल्या पशूची खरेदी विक्री करणे शक्य झाले आहे.
बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा शिरकाव झालेला नजरेला पडत आहे. पशुपालन क्षेत्रात देखील नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होताना नजरेस पडत आहे, अशाच नवीन तंत्रज्ञानपैकी एक आहे मोबाईलचे विकसित तंत्रज्ञान. आता मोबाईलद्वारे पशु खरेदी विक्री करणे शक्य झाले आहे. शेतकरी मित्रांनो जसे आपण ऑनलाइन विविध वस्तूंची खरेदी विक्री करत असतो त्या प्रकारे आता पशूची खरेदी-विक्री सुद्धा केली जाऊ शकते. पशु ची खरेदी विक्री Animall.In या वेबसाईटवर सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटची सर्वात महत्त्वाची विशेषता म्हणजे या वेबसाईटवर विक्रीसाठी लिस्ट केल्या गेलेल्या पशुची संपूर्ण माहिती आपणास दिलेली असते. त्यामुळे या वेबसाईटचा माहितीसाठी देखील मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. या वेबसाईटवर विक्रीसाठी लिस्ट केलेल्या पशुची देखील सर्व माहिती उपलब्ध करून दिलेली असते.
Animall. In या वेबसाईटची वैशिष्ट्य
Animall. In ही वेबसाईट पशुपालक शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. या वेबसाईटवर पशूंची खरेदी-विक्री सहज रित्या केली जाऊ शकते. तसेच या वेबसाईटवर पशूंच्या विविध रोगांची माहिती मिळते. शिवाय या वेबसाईटवर पशुवैद्यकाचा सल्ला देखील मिळतो. या वेबसाईटची अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वेबसाईटवर विविध स्पर्धा आयोजित केलेल्या असतात, या स्पर्धेत आपण देखील सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकता. वेबसाईटवर पशुपालनासंबंधित अनेक सेवा दिल्या गेल्या आहेत वेबसाईटवर दुधाचा हिशोब, गाई-म्हशींच्या किमतींची माहिती मिळते शिवाय डॉक्टरांशी आपण कॉल करून बोलू सुद्धा शकतो.
आता सर्वात मोठा प्रश्न वेबसाईटवर खरेदी आणि विक्री कशी
या वेबसाईटवर पशुपालक शेतकरी गाई म्हशी बैल इत्यादी जनावरांची खरेदी आणि विक्री करू शकतात. या वेबसाइटची सर्वात मोठी विशेषता म्हणजे आपण येथे जनावरे वेगवेगळ्या निकषद्वारे खरेदी करू शकता. आपण पशूच्या दूध देण्याची क्षमता, पशु ची जात वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टीची पडताळणी करून पशु खरेदी करू शकता. या वेबसाईटवर पशूच्या मालकांची माहिती उपलब्ध असते. त्यामुळे आपणास खरेदी करताना कुठलीही अडचण भासत नाही. आपण संबंधित व्यक्तीला डायरेक्ट कॉल करून देखील पशूची खरेदी करू शकता. तसेच जर आपणास पशूची विक्री करायची असेल तर त्यासाठी पशूची आणि तुमची सर्व माहिती वेबसाईटवर भरावी लागते. तसेच विक्री करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जनावराचा फोटो देखील वेबसाईटवर द्यावा लागतो. या वेबसाईटचा उपयोग करण्यासाठी आपणास या वेबसाईटवर आपले स्वतःचे खाते देखील उघडावे लागते. एकंदरीत या वेबसाईटमुळे पशुपालक शेतकर्यांना मोठा फायदा होताना दिसत आहे.
Published on: 08 January 2022, 12:40 IST