Animal Husbandry

शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये प्रजनन संस्थेचे आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्याढचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते.या लेखात आपण शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये असलेल्या गर्भाशयाच्या आजारांविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 07 November, 2021 1:56 PM IST

शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये प्रजनन संस्थेचे आजार होतात. ते आजार लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे बर्‍याचदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.तसेच महागडा औषधोपचार करूनही हे आजार पूर्णपणे बरे होत नाहीत. त्यामुळे अशा आजारांची लक्षणे ओळखून पशुवैद्यकाच्या साह्याने उपचार करणे गरजेचे असते.या लेखात आपण शेळ्या आणिमेंढ्यांमध्ये असलेल्या गर्भाशयाच्या आजारांविषयी माहिती घेणार आहोत.

शेळ्या आणि मेंढ्या मधील गर्भाशयाचे आजार

अ)शेळी-मेंढीअडणे-

1- शेळी मेंढी यांच्या नैसर्गिक प्रसूतीच्या वेळेस करडू/ कोकरूबाहेर येण्यास अडचण होणे यास शेळी मेंढी अडणेअसे म्हणतात.

2- अडून जास्त काळ झाल्यास शेळी मेंढीच्या जीविताला धोका होऊ शकतो. करडास कोकरास बाहेर ओढण्याचा प्रयत्न करु नये. योनिमार्ग लहान असणे,गर्भाशयास पीळ पडणे,प्रसूतीच्या कळा न देणे, गर्भाशयाचे मुख अर्धवट किंवा न उघडणे तसेच शेवटच्या महिन्यांमध्ये पौष्टिक व समतोल आहार न मिळाल्याने करडांचे- कोकरांचे पाय किंवा डोके दुमडणे, शरीर आकाराने मोठे,सूजणे किंवा विचित्र वाढ झालेली असणे, नैसर्गिक स्थितीत असणे इत्यादी कारणांमुळे प्रमुख्याने शेळी-मेंढी अडते.

उपाय

 प्रसूतीच्या वेदना सामान्य असतील पण अधिक वेळ लागत असेल किंवा करडांचा कोकरांचा शरीराचा भाग बाहेर आला असेल तर जनावर अडलेअसे समजावे व त्वरित तज्ज्ञ पशुवैद्यक आला औषधोपचारासाठी बोलवावे.

प्रतिबंधात्मक उपाय

  • गाबनशेळी– मेंढीला शेवटच्या महिन्यांमध्ये पौष्टिक व संतुलित आहार तसेच दररोज चालण्याचा व्यायाम द्यावा.
  • मागच्या प्रसुतीच्या वेळेस शेळी-मेंढी आढळल्यास चालू प्रसूतीच्या वेळेस विशेष काळजी घेणे.
  • मातीच्या गर्भाशयात अनावश्यक हात घालू नये किंवा करडाचे बाहेर आलेला शरीराचा भाग ओढूनये, त्यामुळे ते दगावण्याची दाट शक्यता असते.

) वार अडकणे-

1- वार अडकल्यावर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने शास्त्रीय पद्धतीने शेळी व मेंढी चे व्यवस्थापन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

 रडू गर्भाशयात असताना त्याच्या भोवती जी आवरण असते त्याला वार म्हणतात. वार अडकणे म्हणजे गर्भाशयाची व वारेची फुले न सुटणे, फुले न सुटण्याची महत्त्वाच्या अनेक कारणे आहेत.

  • यामध्ये शेळीमेंढी च्या आरोग्य,क्षार जीवनसत्त्वांची व हिरव्या चाऱ्याची कमतरता,गर्भाशयात जीवाणूंचा प्रादुर्भाव, कोकरा मध्ये झालेले बदल, शेळी आणि मेंढी गाभडणे, अनुवंशिक दोष, कालावधी पूर्व प्रसूती आणि कालावधीनंतर प्रसूती, व्यायामाची कमतरता यामुळे सुद्धा वारअडकते.
  • वार जर आठ किंवा बारा तासानंतर सुद्धा गर्भाशयातच राहिली तर वार सडून त्यातरोगजंतूंचा प्रादुर्भाव होतोव त्यामुळे गर्भाशयाचा दाह होतो.

उपचार

  • शेळी किंवा मेंढी व्यायल्यानंतर वार आठ किंवा बारा तासांच्या आत न पडल्यास पशुवैद्यकांच्या मदतीने औषधोपचार करावा.
  • जर वार लोंबत असेल तर त्याला दगड,विटकर, चप्पल बांधू नये किंवा हाताने ओढू नये. त्यामुळे गर्भाशयास इजा पोहोचते व रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे वार लोंबत असेल तर तो एक ते दोन सेंटिमीटर अंतर ठेवून कापून टाकावा व तो कुत्रा किंवा इतर जनावर खाणार नाही याची काळजी घ्यावीकिंवा तो खड्ड्यात पुरून टाकावे.
  • शेळी किंवा मेंढी व्यायल्यानंतर तिला शारीरिक वेदना व जोराची भूक लागते. त्यासाठी व्यायल्यानंतर तिला शक्तिवर्धक व पचनास सुलभ असा पोषक आहार द्यावा त्यामुळे दूध उत्पादन देखील वाढते.

 प्रतिबंधात्मक उपाय

  • गाभण शेळी मेंढी शेवटच्या महिन्यात संतुलित आहार द्यावा. त्यात खनिज मिश्रण,हिरवा चारा तसेच सुका चारा यांची कमतरता नसावी.
  • गाभण शेळी मेंढी शेवटच्या दोन महिन्यात चालण्याचा व्यायाम द्यावा. व्यायल्यानंतर करडास किंवा कोकरासत्वरित चीक पाजावा. त्यामुळे वार पडण्यास मदत होईल.
English Summary: the uterus disease in goat and sheep management of that disease
Published on: 07 November 2021, 01:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)