Animal Husbandry

जन्म होण्याच्या अगोदर वासरू त्याच्या आईच्या गर्भाशयात असते. तिथेच त्याचे हळूहळू वाढ होत असते. गाईचा गाभण काळ सरासरी 280 दिवस आणि म्हशीचा तीनशे दहा दिवस असतो. गर्भाची वाढ गर्भधारणा झाल्यापासून पाहिजे सहा महिने अतिशय संथ गतीने होत असते.

Updated on 23 November, 2021 5:24 PM IST

जन्म होण्याच्या अगोदर वासरू त्याच्या आईच्या गर्भाशयात असते. तिथेच त्याचे हळूहळू वाढ होत असते. गाईचा गाभण काळ सरासरी 280 दिवस आणि म्हशीचा तीनशे दहा दिवस असतो. गर्भाची वाढ गर्भधारणा झाल्यापासून पाहिजे सहा महिने अतिशय संथ गतीने होत असते.

परंतु सहाव्या, आठव्या आणि नवव्या महिन्यात मात्र गर्भाची वाढ अतिशय झपाट्याने होते.त्यामुळे गाईंना शेवटच्या तीन महिन्यांत पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, स्फुरद आणि जीवनसत्व मिळाले नाही तर जन्मलेले वासरू अशक्त दिसते नंतर वासरू जन्माला आल्यानंतर देखील त्याचे संगोपन व्यवस्थित करणे गरजेचे असते. या लेखात आपण वासरांच्या संगोपन पद्धतींविषयी माहिती घेणार आहोत.

नवजात वासरांचे संगोपन पद्धती

  • मातृत्व पद्धत अथवा पारंपारिक पद्धत- या पद्धतीत वासराला जन्मल्यापासून आईचे दूध पिण्यास गायीसोबत सोडतात.तसेच गाईचे दूध काढण्याच्या वेळी वासरू सोडतात. वासरू सोडल्यामुळे गाय पान्हासोडते. थोडावेळ गाईचे दूध वासराला पिऊ दिले जाते आणि लगेच बाजूला करून वासराला बांधून ठेवतात. नंतर दूध काढणी झाल्यावर वासराला परत मोकळे सोडून दूध पिऊ दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने बहुतेक वासरांसाठी एका सडातील दूध ठेवले जाते आणि तीन सडातील दूध काढले जाते. परंतु या पद्धतीमध्ये स्वच्छ दूध उत्पादनात अडथळा येतो. कधीकधी वासराने दूध जास्त पिल्यामुळे अपचनाचा त्रास होतो. दूध कमी केल्यामुळे वासरू उपाशी देखील राहू शकतात. वासरू नसेल तर गाय दूध देत नाहीत. या पद्धतीमध्ये तोटा असा होतो की वासराला पुरेसे दूध मिळते का नाही याचा अंदाज लावता येत नाही.
  • दाई पद्धत-
    • या पद्धतीत वासराला जन्मल्यापासूनच गायी व म्हशी पासून वेगळे करून आणि कृत्रिम पद्धतीने म्हणजे बाटलीने किंवा तोटी असलेल्या छोट्या भांड्याने दूध पाजतात.
    • या पद्धतीचा फायदा म्हणजे या पद्धतीत वासराला आवश्यकतेनुसार दूध पाजता येते.
    • दुधाची निर्मिती स्वच्छ होते.
    • वासरू नसले तरी गाई दूध देतात.
    • आर्थिक दृष्ट्या ही पद्धत परवडणारी आहे.
    • या पद्धतीमध्ये वासरे चांगली वाढतात. निरोगी राहतात व फक्त एकच काळजी घ्यावी लागते आणि ती म्हणजे दुध वासरांना पाजताना दुधाचे तापमान वासराच्या शरीरा एवढे ठेवून पाजावे.
    • स्वच्छतेचे काटेकोर पालन करता येते.
  • वासराला दूध पाजून झाल्यानंतर लगेच भांडे गरम पाण्याने स्वच्छ धुवावे आणि कोरडी करावे.त्यामुळे भांड्यांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही.
  • वासरांना दूध पाजते वेळी त्यांचे तोंड जर चिकट झाले तर पाण्याने स्वच्छ करावे. अन्यथा चिकट पणामुळे मुंग्या तोंडावर फिरू शकतात.
  • दूध पाजताना वासराला ठसका  येणार नाही याची काळजी घ्यावी. जर वासराला दूध पाजताना ठसका आला तर दूध फुप्फुसांमध्ये जाऊन फुफ्फुसदाह होऊ शकतो.
  • वासरांची शिंगे काढावीत.शिंग कळ्या जाळण्यासाठी कॉस्टिक पोटॅश किंवा कॉस्टिक सोडा च्या काड्या शिंग कळी वर फिरवल्यास कळी जळून जाते. शिंगे काढल्यामुळे भविष्यात होणाऱ्या इजा, शिंगांचा कर्करोग या समस्या टाळता येतात.
  • वासराचा जन्म झाल्यानंतर त्यांना नंबर द्यावेत. नंबर देण्यासाठी वासराच्या गळ्यात पत्राचा बिल्ला तयार करून बांधावा.याशिवाय वासराच्या कानाच्या आतील भागावर नंबरचा बिल्ला मारावा.
English Summary: the two ways of care of new born calf and take precaution
Published on: 23 November 2021, 05:24 IST