शेळीपालन व्यवसाय आता शेतीला एक मुख्य जोडधंदा म्हणून नावारुपास येत आहे. शेळीला गरीबाची गाय म्हटले जाते. योग्य नियोजन केल्यास कमी खर्चात आणि कमी जागेत शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे वृद्धिंगत करता येतो. या व्यवसायामध्ये छोटे छोटे पण महत्त्वाचे बारकावे असतात. ते आपण समजून घेणे महत्त्वाचे असते. या लेखात आपण शेळीपालनाचे शास्त्र म्हणजे एकंदरीत आर्थिक गणित कसे असते ते समजावून घेऊ.
शेळीपालनामध्ये शेळी आणि कळपातील बोकड यांचा अर्थशास्त्र समजून घेणे फार महत्त्वाचे असते. साधारणपणे शेळी पालन करणाऱ्या बऱ्याच जणांना आपल्याकडची शेळी ही कोणत्या जातीची आहे, हे बहुतांशी माहीत नसते. उस्मानाबादी शेळी सोडली तर आपण एकंदरीत शेळीला गावरान शेळी म्हणून संबोधतात. शेळीपालनामध्ये शेळी कोणत्या जातीचे आहे, तिचा प्रजननाचा विचार केल्याशिवाय शेळीपालनात व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. तसे पाहायला गेले जे शेतकरी ५ ते १० शेळ्या पाळतात त्यांना किंवा ते शेतकरी जास्त फायद्याचा तोट्याचा विचार करत नाहीत. कारण त्यांच्या शेळ्या बिनखर्चिक पाळल्या जात असतात.
कमी संख्येत असणाऱ्या शेळ्या सहजपणे आपण शेतात काम करत असताना जरी बांधावरती किंवा एखादा नाल्याकडे चांगले गवत आहे, अशा ठिकाणी बांधून दिल्या तरी त्यांचे पोषण चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच त्यांच्या चाऱ्याचा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना जो काही उत्तर मिळते तो त्यांचा आर्थिक फायदा होत असतो. कमी संकेत शेळ्या पाळणाऱ्या शेळी पालकांना आपल्या शाळांना किती पिल्ले होतात किंवा किती व्हायला पाहिजेत याचा कधी विचारच करत नाहीत. कालांतराने एकाच वेळेला एकच पिल्लू व्हायला लागते. परिणामी त्याचे वजनही कमी भरते याला शेळीच्या वंशाचा ऱ्हास असे म्हणतात. त्याची कारणे समजून घेऊ.
आपल्या कमी संख्या असलेल्या शेळ्यांमध्ये कमीत कमी पाच ते सात शेळ्या आणि एक ते दोन बोकड असतात. आपण नेमके काय करतो की, शेळीच्या पोटी बोकड जन्माला आले की आपण जुनी बोकड विकून टाकतो आणि पुढे आपल्याकडे असलेले बोकड मोठे झाले की, त्यांचा त्याच कळपातल्या शेळ्या आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेली शेळ्यांचे संबंध येतो. थोडासा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते बोकड्या शेळीचे मुल आहे आणि त्यातल्या काही शेळ्यांचा भाऊ आहे. शरीरसंबंधाच्या बाबतीत माणूस जसा विचार करतो तसाच शेळ्या करत नाहीत. परंतु त्यांच्या बाबतीत आपण तसा विचार केला पाहिजे आणि आपल्याच खंडातल्या बोकडांचा आपल्याच कळपातील शेळ्यांची म्हणजेच एकाच कुटुंबातील शेळ्यांची संबंध येऊ नये, याची दक्षता घेणे फार गरजेचे असते. असे न केल्यास त्या शेळ्यांचा वंश दर्जेदार होत नाही व कालांतराने त्यांची क्षमता कमी होऊन जाते.( कृषी रहस्य- डी. सचिन)
यावर रामबाण उपाय म्हणजे बोकडांची अदलाबदल केली पाहिजे एकाच कळपातला बोकड त्याच कळपात ठेवू नये. असे जर केले तर शेळीपालन फायदेशीर ठरू शकते. शेळीपालक शेतकरी वर्षभरात आवश्यक तेव्हाच बोकडे विकतात आणि काही बोकडे केवळ बकरी ईदसाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेव्हा अशा बोकडांना प्रचंड मागणी असते. वेळप्रसंगी जास्त पैसे देऊन खरेदी करण्याची तयारी असते. धार्मिक भावना तीव्र असल्यामुळे असे भाविक लोक पैसे देण्यासाठी बिलकुल मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे काही शेतकरी केवळ बकरी ईदसाठी म्हणून खास बोकड सांभाळतात. तेव्हा अशा बोकडांना २० ते २२ हजार रुपयांपर्यंत किंमत येते.
शेळीपालनातील बोकड कसा असावा
कळपातील बोकड हा सुदृढ आणि जातीचे गुणधर्म दर्शविणारा असावा. तसेच तो चपळ असावा. जर दोन जुळे बोकड असतील तर एक सुदृढ चांगला बोकड पैदाशीसाठी निवडावा. त्यामुळे येणार्या पिढ्यांमध्ये जुळे किंवा तिळे करडे देण्याच्या प्रमाणात वाढ होते. पैदाशीच्या बोकड ची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी. पैदाशीचा बोकड च्या मा नेवर आयाळ असावी, तसेच तो उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा. पैदाशीसाठी ठेवलेल्या बोकड मध्ये कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीच्या बोकड चा जन्मा हा जातिवंत माता-पित्यांना पासून झालेला असावा. साधारणपणे दीड ते दोन वर्षाच्या बोकड ला 25 ते 30 शेळ्यांच्या पैदा शीला वापरावे. दर दोन वर्षांनीकळपातील पैदाशीच्या बोकड बदलावा.
Published on: 01 October 2020, 04:20 IST