Animal Husbandry

शेतकरी आपले आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीसह पशुपालनाचा व्यवासय करत असतात. परंतु पशुपालनाचा व्यवसाय अंत्यत जिकरीचा व्यवसाय आहे.

Updated on 16 August, 2020 6:01 PM IST


शेतकरी आपले आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेतीसह पशुपालनाचा व्यवासय करत असतात. परंतु पशुपालनाचा व्यवसाय अंत्यत जिकरीचा व्यवसाय आहे. जनावरांची निगा, आहाराकडे नीट लक्ष द्यावे लागते. दुधाळ प्राण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यांना वेळेवर खाद्य दिले पाहिजे, दुधाची वेळ निश्चित असली पाहिजे. गोठा नियमित साफ केला गेला पाहिजे. लसीकरण वेळेवर झाले पाहिजे हे जर आपण व्यवस्थित केले नाहीतर आपल्याला मोठा तोटा सहन करावा लागतो. परंतु दुधाचा व्यवसाय आहे एकट्या दुकट्या माणसांचा व्यवसाय नाही. यासाठी पुरेसे मनुष्यबळ लागत असते. दूध देणारे अनेक पशु असल्यास आपली खुप तारांबळ उडत असते. पण आपण जर या व्यवसायात यांत्रिकीकरण केले तर आपले बरेचसे कष्ट वाचतील.

आता तुम्हाल की यात कोणतं यांत्रिकीकरण आणता येईल. अहो, यात आपल्याला दुध काढण्यासाठी माणसे गढी माणूस लावावा लागतो. यात आपला वेळ आणि पैसाही अधिक जात असतो. पण यात आपण यंत्राचा वापर केला तर आपला वेळ आणि पैसा देखील वाचणार आहे. आज आपण अशाच एका यंत्राविषयी माहिती जाणून घेणार आहोत.  ही मशीन आहे मिल्किंग मशीन हे एक दूध काढणारे मशीन आहे. याच्या मदतीने दूध काढणे खूप सोपे होत असते. विशेष म्हणजे या मशीनमुळे दुधाची उत्पादकता वाढते.
दरम्यान ही मशीन आधी डेन्मार्क आणि नेदरलँडमध्ये याचा वापर होत होता. आता पुर्ण जगातील पशुपालक दुग्धव्यवसाय करणारे हे यंत्र वापरत आहेत. या यंत्रामुळे जनावरांच्या स्तनांना कोणतेच नुकसान होत नाही.

 


या यंत्राचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे सिंगल बकेट मिल्किंग मशीन - या यंत्राच्या साहाय्याने साधरण १० ते १५ जनावरांचे दूध अधिक सहजपणे आणि जलदपणे काढल्या जाते.
डबल बकेट मिल्किंग मशीन - या यंत्राच्या साहाय्याने १५ ते ४० जनावरांच्या दूध काढले जाते. हे यंत्राला एक ट्रॉली असते, यामुळे एका जागेवरुन दुसऱ्याजागेवर हे यंत्र सहजपणे नेता येते.

काय आहेत वैशिष्ट्य़े 

  • दरम्यान या यंत्राच्या मदतीने दूध काढल्यास दूधात कोणत्याचप्ररकारची घाण नसते.
  • कमी वेळात अधिक दूध काढले जाते. यंत्राद्वारे काढण्यात आलेले दूध हे थेट डब्ब्यात काढले जाते.
  • या यंत्राच्या देखभालीचा खर्च कमी असतो. दुधाचे उत्पादन साधरण १० ते १५ टक्के वाढते.
  • काही मिनीटात दीड ते दोन लिटर दूध काढले जाते.
  • कमी ऊर्जा लागते आणि चांगल्या गुणवत्तेचे स्वच्छ दूध मिळते.
  • दरम्यान या यंत्राचा देखरेखीचा खर्च हा फक्त ३०० रुपये आहे.

 


मिल्किंग मशीन्स असते अनुदान (Subsidy on Milking Machines)
देशातील अनेका राज्यातील सराकर या यंत्रासाठी म्हणजे, मिल्किंग मशीनसाठी अनुदान देते. यासह हे मशीन खरेदी करण्यासाठी काही बँका कर्जही देत असतात. यासाठी पशुपालक आपल्या जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी बँकेच्या कृषी आणि पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करु शकतात. दरम्यान दूध काढताना जनावरांना गोजारावे. सुरुवातीला जनावरे या यंत्राच्या आवाजाने दचकतील पण काही दिवसांनंतर जनावरांना या यंत्रांची सवय होईल.

English Summary: The Milking machine will make milking easier, increase productivity
Published on: 16 August 2020, 05:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)