Animal Husbandry

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन हा व्यवसाय अनेक शेतकरी करतात पण उन्हाळ्यात कोंबड्यांची काळजी त्यांच्या व्यवस्थापनात आहारात बदल करणे खूप गरजेचे असते. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात.

Updated on 10 February, 2022 1:26 PM IST

शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन हा व्यवसाय अनेक शेतकरी करतात पण उन्हाळ्यात कोंबड्यांची काळजी त्यांच्या व्यवस्थापनात आहारात बदल करणे खूप गरजेचे असते. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात.

उन्हाळ्यामध्ये त्यांना योग्य प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये या बदलाला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती प्रतिकार ते तयार होत नाहीत. त्यामुळे या लेखात आपण उन्हाळ्यामध्ये त्यांचे संगोपन कसे करावे याची माहिती घेणार आहोत जसा मार्च एप्रिल महिना जवळ येतो तसेच वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढत वाढत जाते व शरीराचे देखील तापमान वाढते.हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी शरीरातील ऊर्जा आणि पाणी हे लवकर वापरले जाते या कारणामुळे कोंबड्या उष्माघाताचा बळी पडतात जेव्हा वातावरणातील तापमान हे 38 ते 40 सेल्सिअस पर्यंत असते तेव्हा कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवू लागतो.

18 क्रमांक ते 33 ते 23 अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात मानले जाते. या पेक्षा कमी किंवा जास्त तापमान त्यांच्यासाठी आणि हानिकारक असते. तापमानाशी जुळवून घेण्यासाठी कोंबड्याआपल्या हालचाली कमी करतात उन्हाळ्यात त्यांच्या हालचाली मंदावतात कोंबड्याखुराड्यात पंख पसरून बसतात कडक उन्हाळ्यामध्येचोचउघढीठेवून कोंबड्या जास्तीत जास्त उष्णता बाहेर फेकण्यास मदत करतात.कोंबड्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसल्यामुळेत्यासतत पाणी पीत राहतात पाणी पीत राहतात त्यामुळे उन्हाळ्यात त्यांना 24 तास पाण्याची सोयकिंवा व्यवस्थाकराविर ज्यावेळीपरिसरातील तापमान अंश एक सेल्सिअसने वाढत जाते तेव्हा कोंबड्या 1.5 टक्के कमी खाद्य खातात जेव्हा तापमान 38 अंश सेल्सिअस या घरात असते तेव्हा खाण्याचे प्रमाण चार ते पाच टक्क्यांनी कमी होते

त्यामुळे याच यावरून असा निष्कर्ष निघतो की उन्हाळ्यामध्ये खाद्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरात असलेली आवश्य प्रथिने जीवनसत्त्वे खनिजे त्यांना मिळत नाहीत किंवा शरीरात त्यांची कमतरता भासते यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो व त्यांचे शरीर रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास असक्षम ठरतात पोल्ट्री शेड चे बांधकाम पूर्व-पश्‍चिम असावी जेणेकरून सूर्यकिरणे त्वरित आत शिरणार नाहीत पोल्ट्री शेड ला व त्याच्या छताला पांढरा रंग द्यावा जेणेकरून पूनाची तीव्रता कमी होईल व सूर्याच्या किरणांना परिवर्तित होण्यास  मदत होईल उन्हाळ्यामध्ये कोंबडी आपले पंख पसरून बसतात त्यामुळे एक कोंबडीला एक चौरस फूट जागा मिळेल असे नियोजन करावे. पोल्ट्रीमध्ये खिडक्यांना पडदे लावावे हे पडदे हलक्या रंगाचे असावे व त्यावर सतत पाण्याचे शिंपण करावे पोल्ट्री शेडच्या छतावर कोल्हा पाला टाकावा  व त्यावर सतत 

पाणी टाकावे जेणेकरून पत्रातून येणाऱ्या उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल हवा खेळती राहावी म्हणून शेडमध्ये कुलर बसवावे किंवा पंखी बसवावेत शेडमधील तापमानाचा अंदाज घेण्यासाठी थर्मामीटर बसवण्याचे नियोजन करावे पाणी उन्हाळ्यामध्ये शरीरातील ऊर्जेचा ऱ्हास होतो त्यामुळे कोंबड्या सतत पाणी पितात यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या भांड्यांची  संख्या पंचवीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढवावीदिवसातून पाच सहा वेळा भांडे स्वच्छ धुऊन त्यात थंड पाणी भरावे पाण्यामध्ये जर काही इलेक्ट्रोलाईट घालून पाणी प्यायला दिले तर उत्तमच.

English Summary: the management technology of poultry in summer condition for more profit
Published on: 10 February 2022, 01:26 IST