Animal Husbandry

कोणताही व्यवसाय करताना अगोदर आपले विक्रीचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते. आपल्या करत असलेल्या व्यवसाय मध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत,त्यांची उपयुक्तता काय याचा अभ्यास करून त्यानुसार व्यवस्थापन केल्यास व्यवसायामध्ये यश येते.हेच तत्व शेळी पालन व्यवसायाला देखील लागू होते. या लेखामध्ये शेळीपालन व्यवसायामधील विक्रीचे व्यवस्थापन कोणत्या अंगांना धरून करावे याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 23 November, 2021 5:28 PM IST

कोणताही व्यवसाय करताना अगोदर आपले विक्रीचे व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे असते. आपल्या करत असलेल्या व्यवसाय मध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत,त्यांची उपयुक्तता काय याचा अभ्यास करून त्यानुसार व्यवस्थापन केल्यास व्यवसायामध्ये यश येते.हेच तत्व शेळी पालन व्यवसायाला देखील लागू होते. या लेखामध्ये शेळीपालन व्यवसायामधील विक्रीचे व्यवस्थापन कोणत्या अंगांना धरून करावे याबद्दल माहिती घेऊ.

 शेळीच्या विक्री व्यवस्थापनातील प्रमुख संधी

  • मांसची निर्यात करण्यासाठी
  • बकरी ईद साठी बोकड तयार करणे.
  • फक्त मांसासाठी शेळीपालन.
  • शेळीच्या दुधापासून दूध व दुधाच्या वेगवेगळ्या पदार्थांसाठी  उदाहरणार्थ साबण,दही,  सेंद्रिय खत इत्यादी
  • पैदाशीसाठी आणि प्रदर्शनासाठी
  • तसेच विविध प्रकारचे सन किंवा समारंभ जसे गटारी, धुलीवंदन, 31 डिसेंबर,इत्यादी प्रकारच्या बऱ्याच प्रसंगी मटणासाठी शेळ्यांना  मागणी असते.
  • लेंडी खतासाठी ही शेळीपालन महत्त्वपूर्ण आहे.

हा मूलमंत्र आहे फायदेशीर शेळीपालनाचा

1-शेळी पालनाचे सुरुवात करताना जास्तीत जास्त 20 शेळ्या व एक बोकड घेऊन करावी.

2-कधीही शेळी घेताना ती स्थानिक निवडावी आणि दोन करडे देणारी गाभन असावी.

3- बकरी ईद व पैदास बोकड उत्पादन विक्रीचे नियोजन उत्तम ठेवावे.

4- बोकडांच्या वजन वाढीवर काटेकोर विशेष लक्ष ठेवावे.

5- शेळीपालनातील गोट्याच्या आणि शेळ्यांची नोंदवहीमध्ये निरीक्षण करून नोंद ठेवावी.

6- नियमित लसीकरण व जंतांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

  • स्वच्छ मटण निर्मिती व निर्यातीवर भर द्यावा.
  • मोठ्या उद्योगात शेळ्यांचा विमा काढणे फायदेशीर ठरते.
  • विना उपयोगी शेळ्या कळपातून काढून टाकाव्यात.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या शेळी फार्म वर तुम्ही स्वतः व्यक्तिगत लक्ष ठेवणे गरजेचे असते.

शेळी पालन व्यवसायाची उपयुक्तता

  • शेळ्या व मेंढ्या मध्ये मटणासाठी वार्षिक कत्तली चे प्रमाण 38 ते 42 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेळ्यांच्या संख्येतील वाढ ही 18.83 टक्के आहे.
  • शेळी हा प्राणी उत्तम पुनरुत्पादन क्षमता व बहुउद्देशीय असा प्राणी आहे.
  • स्वादिष्ट मटण, कधीही कमी न होणारी लोकप्रियता व खाण्यासाठी कोणताही धार्मिक अडसर नाही.
  • ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी हा नवसंजीवनी असा व्यवसाय आहे.
  • कमी प्रतवारी असलेल्या चाऱ्याचे वजन वाढण्यामध्ये  मध्ये रूपांतर करण्याचा गुणहाइतर जनावरांपेक्षा चांगला असतो.
  • शेळ्या मध्ये चांगली रोगप्रतिकारकशक्ती असून दुसऱ्या जनावरांपेक्षा उष्ण भागात तग धरून राहतात.
  • हा व्यवसाय  कमीत कमी खर्चात आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींचा उपयोग करून केल्यास नक्कीच फायद्याचा होतो.
  • निर्यातीमध्ये वाढत्या संधी आहेत.
  • उत्तम मांसाचीव औषधी गुण असणाऱ्या दुधाची गरज भागवण्यासाठी शेळीपालन उपयुक्त आहे.

शेळीपालन व्यवसायातील विविध संधी

  • मागच्या पाच वर्षात मटणाच्या किमती मध्ये 75 टक्के एवढी प्रचंड वाढ झालेली दिसते.
  • अगदी सुरुवातीला कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येतो.
  • शेळ्या या आकारमानाने लहान असल्याने कमीत कमी जागेत यांचा गोठा उभारता येतो तसेच कमी चारा व एकूण सुरूवातीचा खर्च देखील खूपच कमी होतो.
  • अगदी दहा ते बारा महिन्यांमध्ये शेळ्या वयात येतात.
English Summary: the management of goat farm and get more profit from goat keeping
Published on: 23 November 2021, 05:28 IST