Animal Husbandry

भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि शेतीबरोबरच शेतकरी पशुपालन देखील करतात. देशातील दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी यामुळे दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फायदेचा सौदा बनला आहे. भारतात, 55 टक्के दूध म्हणजे 20 दशलक्ष टन दूध म्हशीच्या संगोपनातून येते. आमच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला म्हशींच्या 5 जातींबद्दल सांगू ज्या सर्वाधिक दूध देतात. म्हशींची जात चांगली राहिल्यास दुधाचे उत्पादन अधिक होईल आणि शेतकरी जास्त उत्पन्न मिळवू शकेल.चला तर मग जाणुन घेऊया सर्वात जास्त दुध देणाऱ्या म्हशीबद्दल.

Updated on 12 September, 2021 1:30 PM IST

भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि शेतीबरोबरच शेतकरी पशुपालन देखील करतात.  देशातील दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी यामुळे दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फायदेचा सौदा बनला आहे.  भारतात, 55 टक्के दूध म्हणजे 20 दशलक्ष टन दूध म्हशीच्या संगोपनातून येते. आमच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला म्हशींच्या 5 जातींबद्दल सांगू ज्या सर्वाधिक दूध देतात.  म्हशींची जात चांगली राहिल्यास दुधाचे उत्पादन अधिक होईल आणि शेतकरी जास्त उत्पन्न मिळवू शकेल.चला तर मग जाणुन घेऊया सर्वात जास्त दुध देणाऱ्या म्हशीबद्दल.

तुम्हांला माहित आहे का,जगात सर्वाधिक म्हशींची लोकसंख्या भारतात आहे

 जगात सर्वाधिक म्हशींची लोकसंख्या भारतात आहे. देशाचा एक भाग म्हशींच्या संगोपनाशी संबंधित आहे.  भारतात म्हशींच्या 26 जाती आहेत, त्यापैकी म्हशींच्या 12 जाती नोंदणीकृत आहेत, ज्या जास्तीत जास्त दूध देतात.  यामध्ये मुऱ्हा, निलीरावी, जाफराबादि, नागपुरी, पंढरपुरी, बन्नी, भदावरी, चिलका, मेहसाणा, सुरती, टोडा या जातीच्या म्हशींचा समावेश आहे.  2020 च्या पशुगणनेत देशात म्हशींची लोकसंख्या 109.9 दशलक्ष इतकी नोंदली गेली आहे. भारतात उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक म्हशी आहेत, त्यानंतर राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि बिहार ही राज्ये आहेत.चला तर मग जाणुन घेऊया सर्वाधिक दुध उत्पादन देणाऱ्या म्हशीच्या जातीविषयी.

मुर्रा म्हैस: दुधाची उत्पादन क्षमता 1850 लिटर

मुर्राह जातीची म्हैस सर्वाधिक दुध देणारी मानली जाते.  त्याची सरासरी उत्पादन क्षमता प्रति वेत 1750 ते 1850 लिटर पर्यंत असते. मुऱ्हाच्या दुधात चरबीचे प्रमाण सुमारे 9 टक्के आहे. हरियाणाच्या रोहतक, हिसार आणि जींद जिल्ह्यात आणि पंजाबच्या नाभा आणि पटियाला जिल्ह्यात म्हैसची मुर्रा जात प्रामुख्याने आढळते.तिचा रंग गडद काळा आहे आणि शेपटी, खुर आणि खालच्या भागात पांढरे डाग आढळतात. या म्हशीची शिंगे लहान आणि वाकलेली असतात. आता देशातील बर्‍याच राज्यांनी मुऱ्हा या जातीच्या म्हशीच संगोपन करण्यास सुरवात केली आहे.

पंढरपुरी म्हैस : दुधाची उत्पादन क्षमता 1800 लिटर

 महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी यासारख्या भागात पंढरपुरी जातीच्या म्हशी आढळतात,ह्या म्हशीचे नाव सोलापूर जिल्यातील पंढरपूर वरून पडले आहे.

ह्या जातीची सरासरी दूध उत्पादन क्षमता प्रति वेत 1700-1800 लिटर आहे. ह्यांच्या दुधात चरबीचे प्रमाण 8 टक्के असते.  पंढरपुरी जाती त्यांच्या प्रजनन साठी प्रसिद्ध आहेत.  ह्या जातीत दर 12-13 महिन्यांनी वासराला जन्म देण्याची क्षमता आहे.  प्रजननानंतर ते 305 दिवसांपर्यंत दुध देऊ शकते, जे त्यांना इतर जातींपासून वेगळे करते. या जातीच्या म्हशीची शिंगे 45-50 सें.मी.लांब असतात.याला धारवाडी म्हणूनही ओळखले जाते. दुष्काळी व कोरड्या हवामान असलेल्या भागासाठी ही म्हैस उत्तम प्रकारे उपयुक्त आहे.  पंढरपुरी म्हशीचे वजन 450 ते 470 किलो आहे. ह्या म्हशीचा रंग गडद काळा व काळा असतो.

 

मेहसाणा म्हैस: दुधाची उत्पादन क्षमता 1500 लिटर

 मेहसाना जातीच्या म्हशी गुजरातच्या मेहसाना जिल्ह्यात आणि गुजरातच्या सीमेवरील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आढळतात.  त्याची सरासरी दूध उत्पादन क्षमता 1200 ते 1500 लिटर दुधाची आहे.  या म्हशीच्या जातीचा रंग काळा आहे, तर काहींचा रंग काळा आणि तपकिरी देखील आहे.  ही जात काहीशी मुऱ्हा म्हैससारखी दिसते.  त्याचे शरीर मुर्रा म्हशीपेक्षा मोठे आहे परंतु वजन कमी आहे.  नर मेहसानाचे सरासरी वजन 560 आणि मादीचे वजन सुमारे 480 किलो असते.  शिंगे सिकल-आकाराच्या आहेत आणि ती मुर्रा म्हैसपेक्षा कमी फिरलेली असतात.

सुरती म्हैस: दुधाची उत्पादन क्षमता 1300 लिटर

 गुजरातमधील खेडा आणि बडोदा जिल्ह्यात सुरती म्हशीची जात आढळते  त्याची सरासरी दूध उत्पादन क्षमता 900-1300 लिटर प्रति वेत असते.

 

या म्हशीच्या जातीच्या दुधात 8 ते 12 टक्के चरबी आढळते.  या जातीचा रंग तपकिरी, सिल्वर राखाडी किंवा काळा असतो.  यांचा आकार मध्यम असतो. शरीर हे लहान असते आणि डोके वाढलेले असते.त्यांचे शिंगे सिकलच्या आकाराचे आहेत.

चिलका म्हैस: दुधाची उत्पादन क्षमता 600 लिटर

 चिलका जातीची म्हशी ओरिसा राज्यातील कटक, गंजम, पुरी आणि खुर्दा जिल्ह्यात आढळतात.  त्याचे नाव ओरिसामधील चिलिका तलावाच्या नावावर ठेवण्यात आले असावे. या म्हशीला 'देसी' या नावाने देखील ओळखले जाते.  हे मुख्यतः खडबडीत भागात आढळते, यांचा रंग तपकिरी-काळा किंवा काळा असतो.

English Summary: the kind of buffalo useful for milk production
Published on: 12 September 2021, 01:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)