दुधाळ गाई आणि म्हशींना दुग्ध उत्पादन आणि प्रजनन टिकून ठेवण्यासाठी बरीच खनिज द्रव्य आवश्यक असतात. जनावरांच्या शरीरात खनिज तयार होत नसल्याने ती खनिजे मिश्रणाला द्वारे पुरवणे आवश्यक असते. क्षार हा घटक जनावरांना अल्प प्रमाणात लागतो. परंतु जनावरांच्या दूध उत्पादनासाठी आणि प्रजनन टिकून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. क्षारांची गरज भागविण्यासाठी जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणाचा वापर करावा लागतो. दुधाळ गाई आणि म्हशींना दूध उत्पादन आणि प्रजनन टिकून ठेवण्यासाठी बरीच खनिजद्रव्ये आवश्यक असतात. काही खनिज जास्त प्रमाणात तर काही कमी प्रमाणात आवश्यक असतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन आणि सल्फर ही खनिजे तुलनेने अधिक प्रमाणात तर लोह, झिंक, मॅगेनीज, तांबे, आयोडीन, कोबाल्ट इत्यादी खनिजे कमी प्रमाणात लागतात.
प्रजननासाठी महत्त्वाची खनिजे व त्यांचे कार्य
कॅल्शियम - दुग्धोत्पादन, हाडे व दातांच्या मजबुतीसाठी आणि स्नायूंच्या अंकुचन प्रसारणासाठी कॅल्शियम आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे प्रसूती सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो. कारण गर्भाशयाच्या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरण क्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो.
स्फुरद - दूध उत्पादन, चयापचय आणि दातांच्या मजबुतीसाठी एक खनिज आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतुचक् अनियमित होते. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते.
मॅग्नेशियम - हाडे व दातांची मजबुती आणि प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदकांवरील क्रियेसाठी मॅग्नेशियम आवश्यक असते.
सल्फर - सल्फर प्रथिनांचे उत्पादन आणि कर्बोदक का वरील क्रियासाठी उपयोगी आणि ब गटातील जीवनसत्त्वे, थायमिन आणि बायोटिन यांचा घटक, तसेच मिठी ओनिन आणि सिस्टीन या अमिनो आम्लांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.
सोडियम व पोटॅशियम-शरीरातील अभिसरणाचा तोल राखण्यासाठी आणि आम्लता टिकवून ठेवण्यासाठी सोडियम व पोटॅशियम आवश्यक असते.
तांबे/ कोबाल्ट- तांबे/ कोबाल्ट रक्तातील हिमोग्लोबिन उत्पादन, पेशी समूहांच्या रक्त छट्यांसाठी आवश्यक बऱ्याचशा धातू जन्य अंतस्रावांचे घटक आणि प्रजोत्पादन करण्यासाठी महत्त्वाचे असते. त्याच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये वांझपणा दिसून येतो.
झिंक – नर जनावरांमध्ये शुक्राणूच्या निर्मितीसाठी आणि लैंगिक अवयवाच्या प्राथमिक आणि त्यापुढील वाढीसाठी झिंक महत्वाचे असते. तसेच अजीवनसत्व कार्यान्वित करते. वळूंची प्रजननक्षमता टिकून ठेवण्यासाठी वळून कडून चांगले वीर्याची निर्मिती करण्यासाठी झिंक आवश्यक असते.
आयोडीन - आयोडीन कर्बोदकांच्या उत्पादनासाठी कार्य करणाऱ्या शरीरातील अनेक अंत सर्वांच्या निर्मितीसाठी, त्याचबरोबर शारीरिक वाढीसाठी आणि प्रजोत्पादनासाठी आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादन ऋतूचक्र अनियमित होते. गर्भपात होऊन, मृत आणि दुबळे आणि केस विरहित गालगुंड असलेले वासरू जन्माला येते. जनावर मुक्का माज दाखवते. खनिज कमतरतेमुळे होणारे परिणाम खनिजांच्या अभावामुळे जनावरांमध्ये अनियमित ऋतुचक्र व अ कार्यक्षम पुनरुत्पादन दिसून येते. क्षारांच्या कमतरतेमुळे गाई माजावर येत नाहीत. माज सुप्त स्वरूपात राहतो. हंगामी वांझपणा येतो. गर्भपात व गर्भामध्ये उपजत दोष उत्पन्न होतात. खनिजांच्या कमतरतेमुळे कालवडी माजा वर येत नाहीत.
माज सुप्त आणि अनियमित राहतो. कालवडीच्या पहिल्या वेताचे वय वाढते. गर्भधारणा झाली तर गर्भपात होतो किंवा अशक्त वासरू जन्माला येते. प्रसूती सुलभ होत नाही. गाईंचा भाकड काळ वाढतो, तसेच दोन सलग त्यांतील दोन वेतातील अंतर वाढते. खनिज आभावामुळे नर वासराच्या पुनरुत्पादन संस्थेला अवयवांची वाढ समाधानकारक होत नाहीत. वयात येण्यास उशीर लागतो. चांगल्या प्रकारचे वीर्यउत्पादन मिळत नाही. खनिज मिश्रणाच्या आवश्यकता जनावरांनी खाल्लेल्या खाद्यातून आणि वैरण इथून पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेली खनिजे जनावरांना खनिज मिश्रणातून पुरविणे गरजेचे असते. जी खनिजे खाद्य घटक कमी प्रमाणात असल्याचे आढळून येते त्यांच्या पुरवठा खनिज मिश्रणातून केला जातो.
खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण
सर्वसाधारणपणे खुराकामध्ये एक टक्के मीठ, दोन टक्के क्षार मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्षारांची गरज पूर्ण होते. किंवा प्रति किलो वजनाच्या प्रमाणात ४० मिलीग्राम क्षार मिश्रणाचे प्रमाण जनावरांसाठी पुरेशी असते. दुभत्या गाई आणि म्हशी त्यांच्यासाठी ६० ते ७० ग्रॅम जनावर प्रति दिवस
मोठी वासरे. कालवडी आणि भाकड जनावरे ४० ते ५० ग्रॅम प्रति जनावर प्रतिदिवस
लहान वासरे २० ते २५ ग्रॅम प्रति वासरू प्रति दिवस योग्य वाढीसाठी आवश्यक असते.
खनिज मिश्रण देण्याच्या पद्धती
खनिज मिश्रण अंबोन आतून जनावरांना खाऊ दिले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या खुराकात निरनिराळ्या प्रमाणात खनिज मिश्रण मिसळलेले असते. परंतु खनिजांचा योग्य पुरवठा होण्यासाठी खनिज मिश्रण देणे योग्य ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण वापरणे जास्त परिणामकारक आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरते. क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण ठराविक भागातील जमिनीमधील आणि पिकांमधील खनिजांच्या प्रमाण याचा अभ्यास करून बनवली जातात. जे खनिज जमिनी आणि पिकांमध्ये कमी असतील अशा खनिजांचा क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण अवलंब केला जातो.
Published on: 19 September 2020, 04:08 IST