आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता हे आधार कार्ड पशुंना मिळणार आहे. हो खरंच आता आपल्या जनावरांना आधार क्रमांक असणार आहे. याविषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्रद मोदी यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई -गोपाला ॲपची सुरुवात केली. तेव्हा माननीय नरेंद्र मोदी म्हणाले की जनावरांसाठी आधार नंबर आवश्यक आहे. त्याच्यामुळे जनावरांच्या बाबतीतील सगळी माहिती प्राप्त केली जाऊ शकते. या लेखामध्ये आपण जनावरांचे आधार कार्डविषयी सगळी माहिती घेणार आहोत. कोणत्या पद्धतीने आधार कार्ड असेल आणि शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होईल, त्याबद्दल माहिती घेऊ.
भारतामध्ये सगळ्यात जनावरांची टॅगिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक गाय आणि म्हैशींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा असा होईल, की पशुपालन आपल्या घरी बसून सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या जनावरांविषयी माहिती प्राप्त करू शकतात. तसेच जनावरांचे लसीकरण, चिकित्सा इत्यादी सगळ्या प्रकारची कामे करणे फार सोपे होणार आहे. भारतामध्ये सगळ्या पशुधनाच्या सखोल माहितीसाठी एक प्रचंड असा डाटाबेस तयार करण्यात येत आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, पशुपालनाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक आवक वाढवणे हा महत्वाचे उद्दिष्ट आहे. नेमके टॅगिंग म्हणजे काय समजून घेऊ.
या योजनेच्याद्वारे आधार नंबरसाठी गाय, म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांच्या कानामध्ये आठ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग लावला जाईल व या टॅबवर बारा अंकांचा आधार नंबर असेल. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत चार करोड गाय आणि म्हशींसाठी आधार कार्ड बनवले गेले आहे. भारतामध्ये कमीत कमी तीस कोटी पेक्षा जास्त गाय आणि म्हशीं आहेत. या योजनेद्वारे अभियान चालवून प्रत्येक जनावरांची टॅगिंग करण्यात येणार आहे. भारत जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे. एका सर्वेक्षणानुसार सन २०१८ मध्ये १७६.३ मिलियन टन उत्पादन झाले होते.
जगाच्या एकूण दूध उत्पादनापैकी २० टक्के उत्पादन भारतात होते. २० व्या पशुधन जनगणनेनुसार १४५.१२ मिलियन गायी आहेत. २०१२ मध्ये करण्यात आलेल्या गणनेच्या तुलनेमध्ये अठरा टक्के जास्त आहे. आपल्या भारतामध्ये दररोज कमीत-कमी ५० कोटी लिटर दूध उत्पादित होते. या दुधाची खरेदी २० टक्के ही संघटित क्षेत्रांमध्ये आणि ४० टक्के ही असंघटित क्षेत्रांमध्ये केली जाते. यामधून ४० टक्के दूध हे शेतकरी स्वतः वापरतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा, आंध्र प्रदेश, राजस्थान इत्यादी राज्य हे भारतातील प्रमुख दूध उत्पादक राज्य आहेत.
Published on: 14 September 2020, 04:44 IST