आजकाल गावाकडील वडीलधाऱ्या लोकांकडून अनेक शेतीविषयक वाक्ये आपल्या कानी पडतात त्यामध्ये तोट्याचा व्यवसाय म्हणजे शेती, शेतकऱ्याच्या वाट्याला फक्त कष्ट आणि कष्ट शेती अजिबात परवडत नाही अशी वेगवेगळी वाक्ये आपल्या कानी पडतात. भारत हा आपला कृषी प्रधान देश असल्यामुळे देशातील 90 टक्के जनता ही शेती व्यवसाय करत आहे.सध्या पारंपरिक पद्धतीने शेती करणे अजिबात परवडत नाही त्यासाठी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता असणे खूप गरजेचे आणि महत्वाचे बनले आहे. याचबरोबर अधिक नफ्यासाठी शेतकरी काही शेतीसलग्न व्यवसाय सुद्धा करतात त्यामध्ये दुग्धव्यवसाय, शेतीपालन इत्यादी चा समावेश आहे.
दुधव्यवसाय वाढवण्यास सुरुवात आणि बक्कळ फायदा सुद्धा :
महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली या गावातील तरुण सतिष खडके यांनी संपूर्ण शेतकरी वर्गाला दाखवून दिले आहे. उस्मानाबाद मधील सतीश यांनी आपल्या जोड व्यवसायाला च मुख्य व्यवसाय बनवले आहे आणि दुग्धव्यवसाय करण्यासाठी HF जातीच्या म्हणजेच होल्सटीन फ़्रिसियन या गाईंचा वापर करून दूधव्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. गेल्या 4 वर्ष्यापासून सतीश दुग्धव्यवसाय करत आहे. सुरुवातीला 6 गाई च्या माध्यमातून सतीश ने दीड ते दोन लाख रुपये मिळवले. बक्कळ पैसे मिळत असल्याने सतीश ने चार वर्ष्यात सतीश ने 12 गाई केल्या. आणि त्यामधून बक्कळ पैसा कमवू लागला.
दुग्धव्यवसायाला अशी झाली सुरुवात:-
हॉलंड देशामधील असणाऱ्या HF या जातीच्या गाई आपल्या देशामधील शेतकरी विकत आणत आहेत. आपल्या देशात शेतीबरोबरच पूरक व्यवसाय असणे गरजेचे आहे तसेच उत्पनाचा नवीन मार्ग तयार होत असल्यामुळे 2018 साली उस्मानाबाद तालुक्यातील संतोष ने पंजाब मधील लुधियाना येथून 6 HF गाईंची खरेदि केली. 6 गाई साठी त्याने 6 लाख रुपये मोजले होते. त्या गाईंसाठी 2 लाख रुपये चे शेड सुद्धा उभारले आणि संतोष ने दुग्धव्यवसाय करण्यास सुरुवात केली.
दुधविक्री:-
दुधाचे उत्पन वाढवायचे असेल तर गाईंना खुराक आणि मुबलक चारा हा द्यावाच लागतो यासाठी संतोष आपल्या गाईंना मुरघास , सुपर निपिअर , ज्वारी कडबा , हरभरा भुसकट , सुगरास , पेंड , सरकी पेंड या प्रकारचे खाद्य देतात. या साठी त्यांना एका महिन्याला 40 ते 50 हजार रुपये खर्च येत असतो. सध्या दुधाला 21 रुपये ते 26 रुपये प्रतिलीटर एवढा दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना एका वर्षाला शेणखत आणि दुग्धविक्री करून 8 ते 9 लाख रुपये मिळतात. तसेच दूध घालण्यासाठी गावातच डेअरी असल्याने त्यांचा वाहतुकीचा सुद्धा खर्च वाचत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च यातून कमी झाला आहे.
कामाचे नियोजन:-
सतिष खडके सोबत MSc चे शिक्षण पूर्ण केलेला त्यांचा मुलगा आनंद खडके हे रोज पहाटे 4 ते सकाळी 7 वाजे पर्यंत व त्यानंतर दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत आपल्या गाईंचा गोठा स्वच्छ करतात आणि गाईंना चारा टाकून मशीन च्या साह्याने दूध काढतात. दोंघांची दिनचर्या अश्याच प्रकारे ठरलेली असते. यामधून ते बक्कळ नफा सुद्धा मिळवत आहे.
Published on: 05 March 2022, 06:05 IST