- मुरघास तंत्रज्ञान म्हणजे काय?
मुरघास (सायलेज)म्हणजे मुरलेला घास भरपूर अन्नद्रव्य असलेल्या वैरणी फुलोऱ्यात किंवा दाणे भरण्याच्या स्थितीतअसताना हवाबंद जागेत विशिष्ट पद्धतीने मुरवून टिकवतात त्यास मुरघास तंत्रज्ञान म्हणतात.
- मुरघास निर्मितीतील उत्कृष्ट तंत्र :-
- मुरघासासाठी मका, ज्वारी, बाजरी,हायब्रीड नेपियर, गिनीगवत प्रक्रियायुक्त उसाचे वाडे, गजराज, पॅरा गवत, कुरणातील हिरवे गवत,रताळ्याच्या वेली, ताग केळीची पाने, भाजीपाल्यांची पाने,ओट इत्यादी तसेच एकदल वर्गीय पासून उत्तम मुरघास बनतो.
- मका आणि ज्वारी तेल जीवनसत्वे मुरघास प्रक्रियेत टिकून राहतात.
- हिरव्या वैरणीची कुट्टी चांगल्या दर्जाच्या कुट्टी मशीन ने करावी कुटीचीलांबी 1-3 से.मी. असावी.
- हिरव्या वैरणीचा नेहमी जाड बुध्या च्यानिवडाव्यात कारण खोडात भरपूरशर्कराकर्बोदके असतात.
- रोगयुक्त तसेच लष्करी आळीचा प्रादुर्भाव असलेल्या मकाकिंवा इतर चारा मुरघासासाठी शक्यतो टाळावा.
- वैरणीची कापणी मका व ज्वारीचे दाणे दूधात असताना तसेच गवत/ द्विदल गवताला कळ्या असताना.
- चाऱ्याला फुलोरा आला असताना कापणी करावी कारण त्यावेळी त्या चाऱ्यात जास्तीत जास्त जीवनसत्व व अन्नघटक असतात.
- वैरण कापताना शक्यतो जमिनीपासून अर्धा फूट वरून कापावी त्यामुळे बुरशी वाढण्याचे प्रमाण रोखता येते.
- मुरघास करताना साखरेचे/गुळाचे/ मळीचे/ मिठाचे पाणी टाकण्याची तशी गरज नसते परंतु चाऱ्याची परत खालावलेली असेल तर योग्य प्रमाणात वापरावे. चाऱ्यातील ॲसिड त्यामुळे मुरघासालाबुरशी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- चारा कापल्यानंतर ओलाव्याचे प्रमाण जास्त असेल तर थोडा वेळचारा सावलीत सुकू द्यावा.
- दवबिंदू असताना चारा कधीही कापू नये त्यामुळे ओलाव्याचे प्रमाण वाढते.
- कुट्टी केल्यानंतर चारा वाळूदेऊ नयेत कारण त्यातील जीवनसत्त्वे नाहीशी होतात. म्हणून लगेच तो बंकर किंवा बॅगमध्ये हवाबंद करावा.
- मुरघासामध्ये गव्हाचा, तुरीचा कोंडा टाकून मुरघासाची प्रत वाढवता येते.
- मुरघास बनवण्याची प्रक्रिया 20-40 दिवसात पूर्ण होते तरीही मुरघास 45-50 दिवस हवा बंद राहील याची खबरदारी घ्यावी.
- बंकर बनवताना त्याची लांबी, उंची त्याची क्षमता गोठ्यापासूनचेअंतर इत्यादी बाबी लक्षात घ्याव्यात.
- बंकरला उतार 1 फुटाचा असावा कारण दबलेल्या चार्यातून निघालेले पाणी पुढे निघून येते. आणि तळ्याचा मुरघास खराब होत नाही.
- मुरघास शक्यतो बंकर मधेच करावा कारण सारा भरण्यास दाबल्यास, काढण्यास व देखरेखीसाठी सोपा जातो.
- मुरघासाची बंकर ताडपत्रीनेबंदकरावे व ताडपत्री ला उतार द्यावा जेणेकरून पावसाचे पाणी निघून जाईल.
- ट्रॅक्टरने मुरघास तुडवताना ट्रॅक्टर चे टायर चिखलाने भरलेले नसावेत.
- हवा आतजाऊ नये म्हणून तोंडाला शेड मातीचा लेप द्यावा. जेणेकरून भेगा पडणार नाहीत तसेच त्याच्यावर वजनदार विटा ठेवाव्यात.
- मुरघास तयार झाल्यानंतर त्याची सॅम्पल लॅबला चेक करून घ्यावेत.
- मुरघासाची बनकर उघडल्यानंतर 45-60 दिवसात वापर करावा व नंतर झाकून ठेवावा.
- मुरघासाला आगीपासून संरक्षित करावे.
- जनावरांना मुरघास किती प्रमाणात द्यावा?
- जनावरांना चारा देताना त्यांच्या वजनानुसार कमी जास्त प्रमाणात द्यावा.
- गाई (देशी)-12-14 किलो.
- गाई(होलस्टीन फ्रेशियन)-20-25 किल.
- म्हैस -15-20 किलो.
- शेळ्या (40 45 किलो वजन)-1-1.5 किलो प्रती शेळी.
- मेंढ्या (40 45 किलो वजन)-1-1.5 किलो प्रती मेंढी.
- सुरुवातीला मुरघास जास्त प्रमाणात न देता हळूहळू तो वाढवत न्यावा.
- ज्या जनावरांना आपण मुरघास देत आहोत त्या जनावरांना दररोज पन्नास ग्रॅम खा.सोडा द्यावा.त्यामुळे पोट दुखी होत नाही.
- मुरघासातील कमी-जास्त आम्लाच्या प्रमाणामुळे जनावरांना ऍसिडिटी होते.
- चांगला मुरघास कसा ओळखाल :-
मुरघासाचादर्जा त्याच्या रंगावरुन वासावरून,चवीवरून,स्पर्शावरून ओळखता येते.
- रंग:- चांगल्या मुरघासाच्या रंग तिखट हिरवट-पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो.
- वास:-चांगल्या प्रतीचा मुरघासाचा आंबट गोड वास येतो. सडका कुबट सहन न होणारा वास खराब मुरघासाचे निदर्शक आहे.
- चव :- मुरघासाची चव आंबट असेल तर तो चांगल्या दर्जाचा मानला जातो.
- बुरशी :-काळसर, पांढऱ्या रंगाची बुरशीची वाढ तेव्हाच होते जेव्हा भरतेवेळी bbवगव्ह्ह. प्रमाण जास्त असेल तसेच मुरघास व्यवस्थित दाबला गेला नसेल तेव्हा होतो.
- सामू :- चांगल्या मुरघासाचासामू 3.5-4.5असावा.
- टीप :- दुधाळ जनावरांना धारा काढल्यानंतर मूरघास द्यावा त्यामुळे मुरघासाचावास दुधातमिसळत नाही.
बुरशी युक्त मुरघास जनावरांना मुळीच देऊ नये त्यामुळे जनावरांची पचनशक्ती बिघडते परिणामी न पिण्यायोग्य दूध तयार होते.
English Summary: the benificial technique of making murghaas and method of identy superioer qulity of murghaas
Published on: 01 March 2022, 02:51 IST
Published on: 01 March 2022, 02:51 IST