Animal Husbandry

शेतीव्यवसायामध्ये दुग्धव्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेल्या महत्त्वाचा व्यवसाय आहे.दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, गावठी दुधाळ गाय आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. जुन्या पद्धतीने दूध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्र आणि व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चि तपणे शाश्वत धंदा असून आर्थिक दृष्ट्या चांगला परवडतो.

Updated on 17 November, 2021 8:33 PM IST

शेतीव्यवसायामध्ये दुग्धव्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेल्या महत्त्वाचा व्यवसाय आहे.दूध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरित गाई, गावठी दुधाळ गाय आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. जुन्या पद्धतीने दूध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्र आणि व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्‍चितपणे शाश्वत धंदा असून आर्थिक दृष्ट्या चांगला परवडतो.

 जर आपल्या आहाराचा विचार केला तर प्रत्येकाला प्रतिदिन 300 मिली दुधाची गरज असते.आपल्याकडे गाईपासून 45 टक्के तर म्हशीकडून 52 टक्के दूध मिळते.दुधामध्ये पाणी,कर्बोदके,स्निग्धांश,क्षारजीवनसत्वे व भरपूर प्रमाणात कॅलरीज असल्याने दूध हे पूर्णान्न आहे. यामहत्वाच्या असलेल्या दुधाची काळजी व्यवस्थित घेतली तर स्वच्छ दूध मिळते.स्वच्छ दूधनिर्मिती साठी काय करावे व कोणते उपाय योजावेत, याविषयी या लेखात माहिती घेऊ.

 स्वच्छ दूध उत्पादनासाठी ही काळजी घ्यावी:

1-यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा आणि दूध काढण्याची जागा शक्यतो वेगवेगळ्या असावे.दूध काढण्यासाठी स्वच्छ मोकळी जागा वापरली तरी चालण्यासारखेआहे.ज्या ठिकाणी आपण दूध काढतो त्या ठिकाणचा परिसर व आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.

2- दुभते जनावर वेगळे करून त्याच्या कमरेचा भाग, शक्ती व मागील मांड्या यावरून पाणी मारून खरारा करावा व कास आणि सड खरबरीत स्वच्छ फडक्याने पुसून स्वच्छ करावे.यामुळे रक्ताभिसरण वाढून जनावर ताजेतवाने आणि तरतरीत होती.

- जनावराला बांधल्यानंतर कोमट पाण्यात अगदी कमी प्रमाणात पोटॅशियम परमॅग्नेट चे खडे टाकून तयार केलेल्या सौम्य द्रावणाने त्याचीकासव सडधुवावे व लगेच स्वच्छ फडक्यान पुसावे.

4- दरम्यान दूध काढण्यासाठी स्वच्छ व निर्जंतुक केलेली भांडी, एक छोटा कप दूध गाळण्याचे स्वच्छ मलमलपांढरे कापड जागेवर आणून ठेवावे.

5- कोमट पाण्याने कास धुतल्यानंतर गाय किंवा म्हैस पान्हा सोडण्यास सुरुवात करते.

6-दूध काढणाऱ्या व्यक्तीने आपले हात पोटॅशियम परमॅग्नेट च्या द्रावणात धुऊन  स्वच्छ करावेव दूध काढण्यास सुरुवात करावी.

7- सर्वप्रथम प्रत्येक सडातील पहिल्या काही धारा वेगवेगळ्या स्वतंत्र कपात काढावेत व स्तनदाह याची चाचणी करावी.

8-दूध काढण्याची क्रिया सुमारे सात ते आठ मिनिटांत पूर्ण करावी व दूध मुठ पद्धतीने काढावी.

9- दूध काढण्यासाठीडोन शेपम्हणजेच विशिष्ट आकार असणारी भांडे वापरावे.

10-

दूध काढणे संपल्यानंतर दुधाचे भांडे वेगळ्या खोलीत न्यावे.

11-दूध काढताना जनावरास शक्यतो वाळलेली वैरण,घास इत्यादी प्रकारचे खाद्य घालू नये फक्त आंबवून द्यावे.

12- दूध स्वच्छ व कोरडा शक्यतो स्टीलच्या भांड्यातमलमलच्या पांढऱ्या फडक्यातून गाळून साठवावे.

13-शक्य असेल तर काढलेल्या दुधाचे भांडे बर्फाच्या पाण्यात लगेच बुडवून ठेवावे.हे शक्य नसेल तर आपल्या घरातील माठातील किंवा रांजण आतील गार पाणी वापरावे. थोड्या थोड्या वेळाने पाणी बदलावे.

14- गाळून थंड पाण्यात साठवलेल्या दुधाचा लवकरात लवकर वापर किंवा विक्री करावी.

English Summary: take important precaution of clean milk follow them
Published on: 17 November 2021, 08:33 IST