म्हशींच्या संगोपनात विशेषतः गरोदरपणात पशुपालकाने जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. दुर्लक्ष केले तर पशुपालकाचे बरेच नुकसान होऊ शकते. गरोदरपणाच्या शेवटच्या ३ महिन्यांत अतिरिक्त पोषक द्रव्यांची आवश्यकता असते, कारण यावेळी म्हशीचे वजन २० ते ३० किलोने वाढते. गाभण काळात म्हशींची कशी काळजी घ्यायची ते या लेखातून जाणून घेणार आहोत.
गर्भधारणेच्या शेवटच्या 3 महिन्यांत काळजी घ्या
- म्हशींला धावू न देणे व जास्त चालण्यापासून रोखले पाहिजे.
- म्हैस कुठेही घसरू नये याची दक्षता घ्यावी.
- गर्भधारणा केलेल्या म्हशीला इतर प्राण्यांशी भांडू देऊ नका, शक्य असल्यास इतर प्राण्यापासून बाजूला बांधा
- आहारात ३ किलो अतिरिक्त धान्य देणे आवश्यक आहे.
- पिण्यासाठी नेहमीच स्वच्छ नवीन पाणी द्या.
- उन्हाळ्यात म्हशीला दिवसातून २ ते ३ वेळा आंघोळ घाला.
- म्हशींचे घर खाणे वेगळे असले पाहिजे. यासाठी कव्हर केलेले क्षेत्र १०० ते १२० चौरस फूट आणि १८० ते २०० चौरस फूट मोकळे क्षेत्र पाहिजे.
गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यात व्यवस्थापन
- म्हशी दूध देत असेल तर म्हशीचे दूध काढणे थांबवा.
- म्हशीला प्रसुतीपर्यंत दररोज २ ते ३ किलो धान्य द्या.
- म्हशीला प्रसूतीच्या २० ते ३० दिवस आधी गव्हाचा कोंडा आहारात आहार द्या.
गर्भधारणा असताना म्हशीत होत असलेले बदलाचे लक्षणे
- प्रसूतीच्या २ ते ३ दिवस आधी म्हशी काहीशी सुस्त होते.
- आहार कमी होतो.
- पोटातील स्नायू संकुचित होऊ लागतात.
- योनीमध्ये सूज येते.
- प्राणी वारंवार लघवी करतात.
- पुढच्या खुराणे माती कोरायला सुरुवात करतात.
प्रसूती दरम्यान म्हशीची काळजी
- प्रसूतीच्या वेळी जनावरांभोवती कोणताही आवाज होऊ नये.
- पाण्याची पिशवी दिसल्यानंतर एक तास होईपर्यंत रेडकू बाहेर येत नसेल तर पशुवैद्याची मदत घ्यावी.
- स्वच्छ, मऊ कपड्याने रेडकूला पुसून घ्या.
- जहार पडल्याशिवाय म्हशीला खायला देऊ नये.
- म्हशीला १ ते २ दिवस गूळ आणि बार्लीच्या लापशी खायला घाला.
- प्रसूतीनंतर म्हशींची चांगली तपासणी करुन घ्या की कोणत्याही प्रकारच्या प्रजनन रोग आपल्या म्हशीला झाला नाही ना याची खात्री करा.
English Summary: Take care of the pregnant buffalo
Published on: 20 August 2020, 11:58 IST
Published on: 20 August 2020, 11:58 IST