Animal Husbandry

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन यामध्ये गाय व म्हशीचे पालन हे दूध उत्पादनासाठी केले जाते. परंतु पशुपालन व्यवसायामध्ये चांगला फायदा हवा असेल तर जनावरांची प्रजनन शक्ती तेवढीच चांगली असणे गरजेचे आहे.

Updated on 12 July, 2022 9:56 AM IST

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालन यामध्ये गाय व म्हशीचे पालन हे दूध उत्पादनासाठी केले जाते. परंतु पशुपालन व्यवसायामध्ये चांगला फायदा हवा असेल तर जनावरांची प्रजनन शक्ती तेवढीच चांगली असणे गरजेचे आहे.

यासाठी विविध गोष्टींचे नियोजन आणि निरीक्षण या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. आपल्याला माहित आहेच कि जनावरांच्या प्रजनन कार्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनावरांनी दाखवलेला माज ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

त्यामुळे यावर खूप बारकाईने लक्ष ठेवणे पशु पालकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. या लेखात आपण या बाबतीत माहिती घेऊ.

 गाय म्हशीनी दाखवलेला माज ओळखणे गरजेचे

 गाय व म्हशीनी दाखवलेला माज योग्य वेळी अचूक ओळखणे खूप गरजेचे आहे. माज ओळखल्यानंतर रेतन केल्यास जनावर गाभण राहिल्यावर,

गाई मध्ये कमीत कमी दोनशे सत्तर ते 280 दिवस, तर म्हशीमध्ये तीनशे पाच ते तीनशे दहा दिवसात  विण्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे. जनावर व्यायल्यानंतरपुढील 50 ते 60 दिवसात गाई आणि म्हशीनी पुन्हा माज दाखवला पाहिजे.

नक्की वाचा:Cow Information: अगदी कमीत कमी आहारात जास्त दूध देण्याची क्षमता आहे गाईच्या 'या' जातीत, वाचा वैशिष्ट्ये

हे जे काही एक चक्र आहे, हे अगदी व्यवस्थित चालले तर दूध व्यवसायात निश्चितपणे आर्थिक फायदा होतो. यामध्ये जेव्हा गाय किंवा म्हशीला भरवले जाते, त्यानंतर बाहेर टाकल्या जाणार्‍या सोटाचे निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे असते.

सोट चिकट आणि पारदर्शक असेल तर जनावर गाभण असल्याचे समजले जाते.परंतु जर बाहेर आलेल्या सोटा मध्ये इतर कोणतेही घटक किंवा काही बदल दृष्टीस येत असेल तर तात्काळ पशुवैद्यकीयला दाखवणे गरजेचे आहे.

 जनावर गाभण राहिल्याने होणारे आर्थिक नुकसान

1- जनावरांमधील दोन वेतातील अंतर वाढते.

2- वर्षाला वासराचे मिळणारे उत्पन्न मिळत नाही.

नक्की वाचा:दुधाचा व्यवसायसोबत डेअरीतून तुपाचा बिझनेस करायचा तर या म्हैशीची जात आहे फायदेशीर

3- तसेच जनावरांना खायला तर खाद्य लागतेच, त्यावरील खर्च अफाट प्रमाणात वाढतो. परंतु त्याच्या पासून उत्पन्न मिळत नाही.

4- दूध उत्पादनामध्ये घट होते.

5- यासाठी करावयाच्या औषधं वरील खर्च देखील वाढतो

महत्वाचे….

 जनावरांमध्ये तीनदा रेतन केले परंतु तरीदेखील जनावर गाभण राहत नसेल तर त्याला वारंवार उलटणे असे म्हणतात. गाय आणि म्हशीमध्ये माजाचे चक्र 21 दिवसांनी येते. रेतन केल्यानंतर फलनाची  क्रिया जर व्यवस्थित झाली असेल तर 21 दिवसांनी पुन्हा माज दिसून येत नाही.

जे दुधाळ जनावरे आहेत यामध्ये वारंवार उलटण्याची प्रमाण जास्त दिसून येते. जास्त दूध उत्पादन असते त्या ठिकाणी वारंवार उलटण्याची प्रमाण जास्त दिसते. मागे भरपूर अशी कारणे आहेत परंतु योग्य फलनातील दोष आणि भ्रूणदोष ही मुख्य कारणे सांगता येतील.

नक्की वाचा:Top Goat Breeds! या 2 जातीच्या शेळ्या तुमच्याकडे असतील तर होईल बंपर कमाई

English Summary: take care of cow and buffalo after and before pregnancy for good profit
Published on: 12 July 2022, 09:56 IST