सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस बरसत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे अगदी चैतन्य बहरलेलं वातावरण आहे. परंतु या चैतन्याने भरलेल्या वातावरणात पशुपालकांनी मात्र त्यांच्या पशुधनाची व्यवस्थित काळजी घेणे खूप गरजेचे आहे.
कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध प्रकारांचा आजारांचा प्रादुर्भाव पशूंना होण्याचा धोका जास्त असतो. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा अगोदरच नीट व्यवस्थापन केले तर जनावरांना कुठल्याही प्रकारच्या आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही.
पावसाळ्यामध्ये विविध प्रकारच्या आजार जनावरांना होतात. त्या आजारांची आणि ते होऊ नयेत यासाठी करावयाचे उपाययोजना यांची या लेखात माहिती घेऊ.
पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार
1- कासेचे आजार होण्याची शक्यता- पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाणी पाणी झाल्याने ओलसरपणा जास्त प्रमाणात आढळतो. या अशा वातावरणामुळे जनावरांना कासेचे आजार होऊ शकतात.
जेव्हा आपण दुभत्या जनावरांचे दूध काढतो तेव्हा सडाचे छिद्र जवळजवळ पंचेचाळीस मिनिटे बंद होत नाही. त्यामुळे ओलसर जागा असली तर अशा जागेवर जनावर बसल्यावर दगडी चे जिवाणू या छीद्रामार्फत कासेत प्रवेश करतात.
या दगडी मुळे जनावरांच्या कासेतून लाल रंगाचे दूध बाहेर येते. कासेला खालच्या बाजूला सूज देखील येते. तसेच इ कोलाय जिवाणू मुळे जनावरांना खूप जास्त ताप येतो.
नक्की वाचा:महत्वाचे! या 'टिप्स' वापरा आणि ओळखा गोठ्यातील जनावर आजारी आहे की निरोगी
2- पोटफुगी- पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवेगार लुसलुशीत गवत होते. असेल लुसलुशीत गवत जर जनावरांनी जास्त खाल्ले तर त्यांना पोटफुगीचा त्रास होतो.
दुसरे विपरीत परिणाम म्हणजे हे गवत खाल्ल्याने जनावरांना नायट्रेटची विषबाधा होण्याची शक्यता असते. ही विषबाधा जास्त प्रमाणात झाली तर जनावराला चक्कर येते व ते खाली पडते. यासोबतच डायरिया किंवा जंतांचाप्रादुर्भाव देखील होण्याची दाट शक्यता असते.
3- गोचिडांचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांना थायलेरिया, बाबेशिया यासारख्या आजारांचे बाधा होते व जनावरे अस्वस्थ होतात. गोचीड जनावरांचे रक्त पीत असल्यामुळे जनावरांना गोचीड तापाची बाधा होते. या तापाची तीव्रता जास्त असली तर जनावरांना रक्ताचा कावीळ होण्याची दाट शक्यता असते.
नक्की वाचा:शेळीपालनात A टू z मदत करतील 'हे' 5 मोबाईल ॲप, शेळीपालन व्यवसाय होईल यशस्वी
पावसाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन
1- कासेचा आजार होऊ नये यासाठी जनावरांचे दूध काढल्याबरोबर त्यांना चारा आणि खुराक खायला देणे गरजेचे असते. कारण यामुळे जनावर खाली बसत नाही.
त्यामुळे सडाच्या छीद्रातून जिवाणू आत जाण्यास अटकाव होतो व कासेच्या आजारापासून बचाव होतो.
2- पोटफुगी होऊ नये म्हणून जनावरांना जास्त प्रमाणात पावसाळ्यात उगवलेले हिरवे गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नये.
3- गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी दुधाळ जनावरे बांधतात अशा ठिकाणी चुन्याची भुकटी पसरवून द्यावी. त्यामुळे गोठ्याचा जो काही परिसर आहे तो निर्जंतक राहण्यास मदत होते. तसेच जिवाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण करणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:दुधाचा व्यवसायसोबत डेअरीतून तुपाचा बिझनेस करायचा तर या म्हैशीची जात आहे फायदेशीर
Published on: 10 July 2022, 01:24 IST