आपल्या देशात बहुसंख्य शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करतात. या जोड धंदा मध्ये कमी खर्चात व कमी वेळात अधिक उत्पन्न देणारी जोडव्यवसाय म्हणजे शेळी पालन आणि मेंढी पालन हे होय बहुतांश शेतकऱ्यांचा कल आता मेंढीपालनकडे देखीलवळतआहे.
जर तुम्हाला पशुपालनाचे आवड असेल तर आपण मेंढीपालन करावे. मेंढी पालन ना मध्ये सगळ्या प्रकारची कमाई होऊ शकते.या लेखात आपण मेंढ्यांच्या काही जास्त फायदेशीर जातींचा विचार करणार होतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत.
मेंढी पालणासाठी मेंढ्यांच्या उपयुक्त जाती..
मुजफ्फर नगरी-या जातीच्या मेंढ्या दिल्ली,हरियाणा,उत्तरप्रदेशाच्या मुझफ्फरनगर,बुलंदशहर, सहारनपुर, मेरठ आणि बिजनोर येथे आढळतात.या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो. यांच्या शरीरावर भुरक्या रंगाचे व काळ रंगाचे ठिपके असतात
- पुछी- या जातीच्या मेंढ्या यामुळे जम्मु प्रांतातील पूंच आणि राजौरीभागात आढळतात. या मेंढ्या गद्दी जाती सारख्या असतात. परंतु यांचा आकार छोटा असतो तर रंग पांढरा असतो शेपटीलहान असते.
- करणाह- या जाती उत्तरी काश्मीरच्या डोंगराळ भागातील करणाह येथे आढळतात यांचा आकार मोठा असतो. या मेंढ्या तील नरांची शिंगे असतात. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो.
- मारवाडी- जातीच्या मेंढ्या राजस्थानच्या जोधपूर, नागौर, जालौर, पाली या परिसरात आढळतात.
- यांचा आकार लहान असतो परंतु यांच्यापासून मिळणारी लोकर ही पांढ-या रंगाचे असते. लोकर खूप दाट असल्याने वजनदार असते.
- गदी मेंढी- या मेंढ्या मध्यम आकाराच्या असतात तसेच त्यांचा रंग पांढरा, लाल आणि हलका काळा असतो. या मेंढ्या पासून वर्षातून तीनदा आपल्याला लोकर मिळत असते. साधारण एक ते दीड किलो वजनाची लोकर आपल्याला मिळते. या जातीच्या मेंढ्या हिमाचल प्रदेशाच्या रामनगर, उधमपुर, कुलू,जम्मू-काश्मीर आणि कांगडा खोऱ्यात तसेच उत्तराखंडच्या नैनिताल,तेहरी, गडवाल आणि चीमोली जिल्ह्यात आढळतात.या मेंढ्यामधील नरांना शिंगे असतात. याशिवाय 10 ते 15 टक्के मादी मेंढ्यांना पणशिंगे असतात.
Published on: 31 December 2021, 09:30 IST