जनावरांमध्ये कासदाहाची लक्षणे, प्रतिबंध व उपचार

04 April 2020 08:06 AM


गायी व म्हशीमध्ये कासदाह हा प्रामुख्याने होणारा रोग असुन तो जीवाणूजन्य रोग आहे. हा आजार म्हशींपेक्षा गायींमध्ये जास्त प्रमाणात होतो, ज्या गायी जास्त दूध देतात. देशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या प्रसुतीपेक्षा नंतरच्या प्रसुतींच्या काही दिवसांनतर किंवा काही दिवस आधी कासदाह अधिक होतो. जिथे जनावरांची संख्या जास्त असते तिथ कासदाहाचा संभव जास्त असतो. ज्या जातींमध्ये कास छोटी आणि सडे मोठी असतात त्यांच्यात कासदाह अधिक होतो.

ज्या जनावरांना खाद्यातून प्रथिने अधिक दिली जातात व ज्या जनावरांचा जार पडत नाही त्यांच्यामध्ये कासदाह होण्याची जास्त शक्यता असते. या आजारात दूध गोठते, कास उष्ण (गरम) होते, वेदना होतात आणि दाह सुजतो व कधी कधी रक्तस्राव ही होतो.

कासदाहाची कारणे

 • कासेमध्ये जिवाणू आत प्रवेश करतात. जीवाणू मध्ये मुख्यतः staphylococci, streptococci, corynebacteria, coli आणि Bacillus यामुळे कासदाह होतो.
 • हा एक संसर्गजन्य रोग आहे.
 • प्राण्यांमध्ये जीवाणू कासेला झालेल्या जखमा, दुखापतींमधुन सडांच्या माध्यमातून कासेमध्ये प्रवेश करतात.
 • रक्त शोषणाऱ्या मोठ्या आकाराच्या माशाही या आजाराला फैलावतात.

रोगाची आणखी काही कारणे खालीप्रमाणे आहेत 

 • कासेला दुखापत होणे.
 • दूध काढणाऱ्याचे अस्वच्छ हात व कपडे.
 • गोठ्याची अस्वच्छता.
 • माशांचा बेसुमारपणा.
 • दूध काढण्याची चूकीची पद्धत.
 • दूध पुर्ण न काढणे.
 • गोठ्याची फरशी ओली असणे व गोठ्यात स्वच्छता नसणे.
 • कासदाह जास्त दूध देणाऱ्या प्राण्यांमध्ये जास्त होतो. कारण मोठ्या कासेमुळे सडांना व कासेला दुखापत होण्याची अधिक संभावना असते.
 • जार लटकणे (पूर्णपणे न पडणे) किंवा प्रसुतीच्यावेळी झालेला संसर्ग.
 • अन्य आजारांचा प्रभाव.

कासदाहाची लक्षणे 

 • जनावरांमध्ये अस्वस्थता व ताप येणे.
 • कास गरम, लाल व वेदनादायक होतात, काही वेळाने ताप येतो व कास थंड आणि कठोर होतात.
 • दूध येणं बंद होते, त्याचबरोबर स्राव उत्पन्न होतो. जो सुरुवातीला पिवळा असतो व नंतर रक्तामुळे लालसर होतो.
 • नेहमीच्या (सामान्य) दुधापेक्षा दह्यासारख सारखं स्वरूप असणारा स्राव, पिवळ्या, भुऱ्या स्रावासोबत पांढरे (गोठलेले) कण व एपिथेलियम टिश्यू (पेशी) येतात.

तीक्ष्ण कासदाह

 • तीव्र कासदाहा मध्ये दूध हळूहळू येणं बंद होत.
 • दुधामध्ये छीद्रे येतात.
 • कास सूजते.

दिर्घकालीन कासदाह

 • कास अधिक कठोर व लहान होते.
 • दूध पातळ व पाण्यासारखे येते.
 • कधी कधी कासेला फोड येतात.
 • कास दाबल्यानंतर वेदना होतात.
 • अंतिम टप्यात दूध पूर्णपणे बंद होते (सुखून जाते).

रोग प्रतिबंध

 • कासदाह मुख्यता अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे गोठ्याची पुर्ण स्वच्छता ठेवावी व दर १५ दिवसांनी जंतुनाशक फवारावे.
 • दूध काढण्यापर्वी व नंतर आयोडीन सोल्युशन (०.२५%) ने स्तनांना धुवावे व स्वच्छ हाताने दूध काढावे.
 • दूध काढताना पुर्ण हाताचा उपयोग करावा, अंगठ्याने दूध काढू नये.
 • दूध काढताना सडांमधून संपूर्ण दूध काढावे.
 • गाय व म्हशींना दूध काढल्यानंतर अर्धा तास बसू देऊ नये.
 • आजारी जनावरांचे दूध त्यांच्या वासरांना पाजू नये.
 • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे व त्यांचे दूध शेवटी काढावे.
 • वेळोवेळी सर्व जनावरांच्या दुधाची चाचणी करावी.
 • स्ट्रिपकप पद्धतीने दुधाची चाचणी करावी.
 • वेळेवरती कासदाहचा उपचार झाला नाही तर टी.बीरोगाचे जीवाणू देखील आत प्रवेश करतात व त्यामुळे रोग आणखी गंभीर होतो.
 • उपचार सुरू झाल्यानंतर तीन ते पाच दिवस ट्यूब व इंजेक्शन सोडले पाहिजे. एक किंवा दोन दिवसात पूर्णपणे उपचार होत नाही.
 • कासदाहाच्या उपचारासाठी प्रतिजैविके पशुवैद्यकाच्या सल्यानुसार द्यावी.
 • दूध कमी होताना गायी म्हशींच्या चारही सडानंमधून संपूर्णपणे दूध काढावे व प्रत्येक सडामध्ये ट्यूबने औषधे सोडावीत.

कासदाहावर उपचार

 • कोणतेही प्रतिजैविके वापरण्यापूर्वी, दुग्धप्रतिजैविक संवेदनशीलता तपासावी व तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्यानुसार द्यावे.
 • सडामधून पूर्णपणे खराब दूध काढून टाकावे. दिवसातून एकदा प्रतिजैविके ट्यूबद्वारे द्यावीत व जर संसर्ग अधिक असेल तर सकाळी व संध्याकाळी दिवसातून दोनदा द्यावीत.
 • जेव्हा तीव्र कासदाहामध्ये कास गरम होतात तेव्हा शेक मध्ये मॅग्नेशियम सल्फेट चा वापर केला जातो, या अवस्थेत कासेला थंड करावे आणि दीर्घ कालावधीतील कासदाह असेल जेव्हा कास थंड व कडक होतात तेव्हा उबदार शेक द्यावा.

हर्बल (वनस्पतीजन्य औषधांचा वापर)

 • २० ग्रॅम नौशादर किंवा साधे लिंबुचे द्रावण ४ दिवस दिल्याने दुधाचा pH कमी होतो. त्यामुळे जिवाणूंची वृध्दी थांबते.
 • २० ग्रॅम लवंगाच्या बियांना १ लिटर पाण्यामध्ये उकळवून संसर्ग झालेल्या जनावरांना चार दिवसांसाठी दोन वेळा पाजावे.
 • २०० ग्रॅम कढीपत्याची पेस्ट करून १० लिंबाच्या रसामध्ये मिसळवून जनावरांना दिवसातून दोन वेळा ४ दिवसांसाठी द्यावे.
 • जास्वंदीची फुले व पानांना स्तनांवर लावावे.
लेखक:
डॉ. सागर जाधव
M.V.Sc (पशु पोषणशास्त्र)
9004361784

English Summary: Symptoms prevention and treatment of mastitis in livestock

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.