- निरणातून सोट/स्त्राव दिसून येणे किंवा माजाची बाह्य लक्षणे आणि लैंगिक वर्तणूक दिसून येणे म्हणजे माजाची अवस्था नव्हे.
- बीजाची वाढ परिपक्वता होऊन सुटण्याची स्थिती म्हणजे माज होय.
- माजाची खात्री प्रत्येक वेळी पशुवैद्यकाकडून होणार्या प्रजनन तपासणीद्वारेच करून घेता येते.
- माजाची लक्षणे आणि अवस्था असणार्या जनावरात कृत्रिम रेतन करायचे किंवा टाळायचे याचे निदान केवळ पशुवैद्यक करू शकतो.
- फक्त सामान्य, नियमित माजात गर्भधारणेची खात्री असते. म्हणूनच विकृत, सदोष, अनियमित माजास कृत्रिम रेतनाचा आग्रह करून नये.
- माजाच्या काळात कृत्रिम रेतनाची अचूक वेळ त्या जनावराची तपासणी केलेला पशुवैद्यक करू शकतो. म्हणून योग्य वेळीच रेतनाचा आग्रह असावा.
- एकाच जनावरातील कोणत्याही दोन माजाच्या काळात रेतनासाठी ठराविक एक वेळ/निश्चित वेळ असू शकत नाही.
- माजाचा कालावधी स्त्रीबीज/अंडे सुटण्याच्या विलंबामुळे लांबू शकतो. मात्र, माजाचा काळ संपल्यानंतर बारा तासात अंडे सुटते.
- सामान्यत: माज संपण्यापुर्वी बारा तास आगोदर कृत्रिम रेतन करणे अपेक्षित असते.
- माजाचा काळ सुरू होण्याची अथवा संपण्याची अवस्था निश्चित घड्याळ वेळ मांडता येत नाही. त्यामुळे पहिले माजाचे लक्षण निदर्शनास येणे हीच माज सुरू झाल्याची वेळ असे गृहीत धरणे अपेक्षित असते.
- दूषित/धुसर/पूमिश्रीत माजाचा स्त्रव असणार्या जनावरात कृत्रिम रेतन करून घेणे टाळून उपचाराचा पुरावा करावा.
- माज ओळखण्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी गोठ्यातील प्रत्येक जनावराचे बारकाईने निरिक्षण करावे, ही पशुपालकाची जबाबदारी असते.
- कृत्रिम रेतनाचे तंत्र पशुपालकांसाठी उपलब्ध जैवतंत्रज्ञान असून, त्याचा अवलंब करणे सर्वच जनावरात अपेक्षित असते.
- प्रजननाचे व्यवस्थापन आणि प्रजनन आहार हा आधुनिक मंत्र कृत्रिम रेतनासह स्विकारल्यास दूध व्यवसाय शाश्वत फायदेशीर ठरतो.
- स्वच्छता निर्जंतुकीकरण आणि शास्त्रोक्त पद्धतीचा सहयोग पशुवैद्यकास दिल्यासच यशस्वी फलनाद्वारे खात्रीशीर गर्भधारणा मिळू शकते.
लेखक:
डॉ. नितीन मार्कंडेय
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)
English Summary: Symptoms of Livestock on Heat and Artificial Insemination
Published on: 16 October 2019, 02:32 IST
Published on: 16 October 2019, 02:32 IST