स्टायलो गवत हे द्विदल वर्गीय असून कमी पावसाच्या प्रदेशात मध्ये याची लागवड फायदेशीर ठरते.याची लागवड वनशेती मध्ये आंतरपीक म्हणून देखील करता येते.
एक उत्तम प्रकारचे चारा पीक असूनयापासून जनावरांना पौष्टिक चारा मिळण्यास मदत होते.या लेखामध्ये आपण स्टायलोगवता विषयी माहिती आणि त्याचे लागवड तंत्र या बद्दल माहितीघेऊ.
स्टायलो गवताची वैशिष्ट्ये
1-हे गवत द्विदल वर्गीय असून बहुवार्षिक
आहे.
2- या गवताचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे सरळ वाढते व त्याला जास्त प्रमाणात फुटवे येतात.
3- कमी पावसाच्या प्रदेशात या गवताची लागवड फायदेशीर ठरते.
4-या गवताला पाण्याचा निचरा होणारी तसेच पडीक,मुरमाड तसेच माळरानाची जमीन आवश्यक असते.
5- हे गवतपौष्टिक घटकांनी समृद्ध असे आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 12 ते 15 टक्के, कॅल्शियमचे प्रमाण 0.70 ते 1.90 आणि फॉस्फरसचे प्रमाण 0.10 ते 0.15 टक्के असते.
6- स्टायलो गवत लागवड करायची असेल तर स्टायलोसन्थस हमाटा, स्टायलोसन्थस स्क्रबा या दोन जातींची लागवड फायदेशीर ठरते. एवढेच नाही तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले क्रांती ही जात प्रसारित केली आहे.
स्टायलो गवताची लागवड पद्धत
1- पेरणीसाठी चालू वर्षातील बियाणे वापरणे महत्त्वाचे आहे.
2-एक हेक्टर लागवड करायचे असेल तर आठ ते दहा किलो बियाणे पुरेसे होते. बीज प्रक्रिया करत असताना बियाणे गरम पाण्यात तीन ते चार मिनिटे भिजवून घ्यावी.
3- 30 बाय 15 सेंटिमीटर अंतर हे लागवडीसाठी उत्तम आहे. बियाणे लागवड करताना जास्त खोलवर टाकू नये तसेच त्याचा उगवण शक्तीवर परिणाम होतो. जमिनीमध्ये लागवडीच्या अगोदर शेणखत मिसळावे. 20 किलो नत्र व 30 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.
स्टायलो गवताचे उत्पादन
1-पेरणी केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी हे गवत कापणी वर येते.जमिनीपासून 10 ते 15 सेंटिमीटर उंचीवर कापणी करावी.
2- कोरडवाहू क्षेत्रांमध्ये हिरव्या चाऱ्याचे 15 ते 20 टन आणि बागायती क्षेत्रामध्ये 30 ते 35 टन उत्पादन मिळते.
Published on: 26 March 2022, 09:24 IST